Thursday, November 14, 2024

  वृत्त क्र. 1091

जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा

नांदेड, दि. 14 नोव्हेंबर :- आज १४ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “जागतिक मधुमेह दिन” साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांचे  नातेवाईक यांना  तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

सर्वप्रथम डॉ. विखारुनिसा खान यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून मधुमेहा संदर्भात रुग्णांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मधुमेह तज्ञ डॉ. दत्तात्रय इंदुरकर यांनी उपस्थित रुग्णांना मधुमेह म्हणजे काय? तो कसा होतो? त्याची कारणे कोणती ? मधुमेह झालेल्या रुग्णांनी आहार कोणता घ्यावा इत्यादी संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. तजमुल पटेल यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. शारीरिक कष्टाची कामे दिवसेंदिवस कमी होत आहेत, त्यामुळे जनतेला मधुमेहासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम करावा, आहारात मिठ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवावे, संतुलित आहार घ्यावा. जेणेकरून रुग्णांना मधुमेह सारखा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल असे अध्यक्षीय समारोपात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांनी सांगितले.

या कार्यक्रमास एनसीडी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनिता बोथीकर, श्रीमती नारवाड, श्रीमती बंडेवार, तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, महाविद्यालयाचे विध्यार्थी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश आहेर, सदाशिव सुवर्णकार, सुनिल तोटेवाड यांनी परिश्रम घेतले.

00000

No comments:

Post a Comment

जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा

    वृत्त क्र.   1206 जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू   नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा ल...