Wednesday, October 4, 2023

 वृत्त

मोटार सायकल वाहनांच्या नोंदणीसाठी वीन मालिका सुरू  

नांदेड (जिमाका) दि. 4 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26- सीके ही नवीन मालिका ऑक्टोंबर 2023 पासून सुरू होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह)  अर्ज ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्विकारण्यात येणार आहे. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेज द्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. याबाबत सर्वांनी नोंद घ्यावीअसे आवाहन प्रादेशिक  परिवहन अधिकारीनांदेड यांनी केले आहे.

0000

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात

गत 24 तासात 29 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया

 

·  सद्यस्थितीत 823 रुग्ण रुग्णालयात भरती

·  सहा रुग्णांचा मृत्यू

 

नांदेड, (जिमाका) दि. 4 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात एकुण 1 हजार 585 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 823 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 2 ऑक्टोंबर ते 3 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 221 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 118 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, याचबरोबर या 24 तासात 6 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 2 नवजात बालक व 4 प्रौढ पुरूष यांचा समावेश आहे. गत 24 तासात 29 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 10 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 26 प्रसुती करण्यात आल्या. यात 12 सीझर होत्या तर 14 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...