Friday, May 8, 2020


आतापर्यंत 1 हजार 376 स्वॅब निगेटिव्ह
63 व्यक्तींचा तपासणी अहवाल प्रलंबित  
बाधित 25 रुग्णांवर औषधोपचार सुरु प्रकृती स्थीर
नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  कोरोना विषाणु संदर्भात शुक्रवार 8 मे 2020 रोजी सायं 5 पर्यंत नांदेड जिल्ह्यात प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एकुण 93 हजार 623 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तर 1 हजार 502 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 376 स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून 63 व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. तर यातील 38 व्यक्तीचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  
यापैकी सहा रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 25 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्ण हे मृत झाले आहेत. शुक्रवार 8 मे रोजी रविनगर भागातील आणि एनआरआय भवन येथील 33 आणि इतर असे एकुण 63 थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. त्यामुळे या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्याची आकडेवारी 
आत्तापर्यंत एकूण संशयित – 1601 एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 1492 क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 505 अजून निरीक्षणाखाली असलेले – 105 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 253 घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले – 1239 आज तपासणीसाठी नमुने घेतले- 62 एकुण नमुने तपासणी- 1502 एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 38 पैकी निगेटीव्ह – 1376 नमुने तपासणी अहवाल बाकी- 63 नाकारण्यात आलेले नमुने – 5 अनिर्णित अहवाल – 19 कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 4 नांदेड जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 93 हजार 623 असून त्यांना त्यांच्या घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.
00000


कंटेनमेंट झोन मधील नागरिकांच्या
समुपदेशनासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड, (जिमाका) दि. 8 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील पाच कंटेनमेंट झोन मधील नागरिकांच्या समुपदेशानासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केली आहे.  
महानगरपालिका हद्दीत कोविड 19 चे रुग्ण आढळून आल्यामुळे अशा क्षेत्रात संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कंटनमेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. या कंटनमेंट झोन पिरबुऱ्हाण येथे जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण) राजेंद्र शिंगणे. अंबानगर सांगवी येथे जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) व्ही. आर. पाटील. अबचलनगर येथे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, रहमतनगर येथे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर, लंगरसाहिब येथे मनपाचे सहाय्यक आयुक्त रितेश बैरागी या अधिकाऱ्यांची समुपदेशनासाठी नियुक्ती करण्यात आाली आहे.
कंटनमेंट क्षेत्रात रोगाचा प्रसार रोखण्यासंबंधाने तपशीलवार धोरण व करावयाचे उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्यात आले असून त्याबाबत आरोग्य विभागाने कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने कंटनमेंट झोन मधील नगारिकांना मानसिक आधार देण्याच्यादृष्टिने समपुदेशन करण्यासाठी पुढील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्त अधिकारी हे वेळोवेळी भेट देवून तेथील नागरिकांच्या अडचणीबाबत माहिती घेतील. नियुक्त समन्वय अधिकारी यांच्या समन्वयाने ते दूर करण्याची कार्यवाही करतील. नागरिकांना आजाराबाबत समुपदेशन करुन त्यांना मानसिक आधार देवून त्यांच्या कामाचे क्षणचित्रे काढतील. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या संनियंत्रणेत सोपविलेले कामे वेळेत जबाबदारीने पार पाडावीत. दररोज वेळोवेळी भेटी दिल्याचा अहवाल क्षणचित्रासह त्यांच्याकडे सादर करावा. तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय बिरादार, अव्वल कारकुन विजय महाजन हे याकामी अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कक्षात सहाय्य करतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन


लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना  
वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी
राज्य परिवहन महामंडळाकडून नियंत्रण कक्ष स्थापन
नांदेड, (जिमाका) दि. 8 :-  लॉकाडाऊनमुळे अडकलेल्या प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वाहतूक सुविधेची माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालय राज्य परिवहन नांदेड येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-260621 असून  यावर संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.  
कोराना विषाणुचा संसर्ग वाढू नये म्हणून  शासनाने 23 मार्च 2020 पासून लॉकडाऊन जारी केला आहे. परिणामी नौकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्यात विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत. या नागरिकांना त्यांचे इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे.
तसेच नांदेड विभागातील प्रत्येक आगारात वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. विभाग नियंत्रक अ. र. कचरे (कंसात भ्रमणध्वनी क्रमांक) कंसाबाहेर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक- (8275038417) 02462-260175. विभागीय वाहतूक अधिकारी सं. बा. वाळवे- (9422185619) 02462-260621. आगार प्रमुख (वरिष्ठ) नांदेड आगार पु. ता. व्यवहारे- (9070706024) 02462-234466.आगार प्रमुख भोकर सु. धु. पवार (8390168613) 02467-202633. आगार प्रमुख किनवट मि. पु. सोनाळे (9881391958) 02469-222050.आगार प्रमुख मुखेड सं. तु. शिंदे (9307786083) 02461-202547. आगार प्रमुख देगलूर अ. रा. चव्हाण (7588523782) 9422878417. आगार प्रमुख कंधार ह. म. ठाकुर (9823533890) 02466-223435.आगार प्रमुख हदगाव सं. बा. अकुलवार (9420461711) 02468-222344.आगार प्रमुख बिलोली च. र. समर्थवाड (8698094565), 02465-223323. आगार प्रमुख माहूर वि. तु. धुतमल (8668482504) 02460-268424 या संपर्क क्रमांकावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इच्छुक नागरिकांनी प्रवासाबाबत संपर्क साधावा, असेही आवाहन राज्य परिवहन नांदेड विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...