Friday, July 24, 2020

मुख्यालय मुंबई वृत्त 23 जुलै 2020



राज्यात गेल्या 10 वर्षातील विक्रमी कापूस खरेदी; मंत्रिमंडळाने केले अभिनंदन
राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असूनदेखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.
या खरेदीचे एकूण मूल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआयने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.
राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोविड-19 च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे 91.90 54.03 लाख क्विंटल कापूस खरेदी. अशा प्रकारे एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली.
कोविड-19 च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.  त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोविड-19 च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आजपर्यंत अनुक्रमे 35.70 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पाहता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती.  एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.
—–—–



वृत्त क्र. 684   
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात मंगळवार 4 ऑगस्ट 2020 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मंगळवार 4 ऑगस्ट 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


वृत्त क्र. 683
कृषि उद्योग व रोजगाराची संधीबाबत करिअर मार्गदर्शन
नांदेड (जिमाका) दि. 24 :- कृषी व कृषीपुरक उद्योग आणि रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन मंगळवार 28 जुलै 2020 रोजी सायं. 7 वा. करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी कोरोना प्रादुर्भाची स्थिती लक्षात घेऊन ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड  यांनी केले आहे.
समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन google meet वर Meeting   https://meet.google.com/vxq-dogf-yvf  या  लिंकवर आयोजीत करण्यात आली आहे. या ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्रात कृषी व कृषी पूरक उद्योग आणि रोजगाराच्या संधी या विषयावर पोखर्णी नांदेड येथील कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख डोंगरगावकर व सहाय्यक आयुक्त प्र. सो. खंदारे हे समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे. https://meet.google.com/vxq-dogf-yvf  या लिंक वर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर  install करून घ्यावे. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंक मधून connect झाल्यावर लगेच आपला video mice mute/ बंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक  unmute / सुरु करून विचारावे व लगेच माईक mute /  बंद करावा. प्रश्न विचारतांना मोजक्या शब्दात विचारावेत. वेबिनारबाबत काही अडचण आल्यास 02462-251674 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000


वृत्त क्र. 682
वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरणासाठी तपासणी तारखा जाहिर
नांदेड (जिमाका) दि. 24 :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबदी कालावधीत परिवहन संवर्गातील वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाबाबत कार्यवाही करता आली नाही. संचारबंदी कालावधीत ज्यांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या तारखा देण्यात आल्या होत्या त्यांना नवीन तारखा जाहिर करण्यात आल्या आहेत. संबंधित वाहनधारकांनी याची नोंद घेऊन खालीलप्रमाणे दिलेल्या तारखांना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.   
दिनांक 13 जुलै 2020 रोजी ज्यांची जुनी तारीख होती त्यांनी येत्या 27 जुलै 2020 रोजी तपासणीसाठी जावे. याचबरोबर ज्यांना 14 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांच्यासाठी 28 जुलै, ज्यांना 15 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांना 29 जुलै,ज्यांना 16 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांना 30 जुलै,ज्यांना 17 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांना 31 जुलै, ज्यांना 20 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांना 3 ऑगस्ट, ज्यांना 21 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांना 4 ऑगस्ट, ज्यांना 22 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांना 5 ऑगस्ट, ज्यांना 23 जुलै तारीख देण्यात आली होती त्यांना 6 ऑगस्ट रोजी तपासणीसाठी उपस्थित रहावे.
000000


कोरोनातून आज 43 बाधित व्यक्ती बरे 
जिल्ह्यात 39 बाधितांची भर तर एका व्यक्तीचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 24 :-  जिल्ह्यात आज 24  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 39 व्यक्तींचे अहवाल बाधित आले. आज 43 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 458 अहवालापैकी 391 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 169 एवढी झाली असून यातील 653 एवढे बाधित बरे झाले आहेत. 451 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे. गुरुवार 23 जुलै रोजी गोवर्धन घाट रोड नांदेड येथील 67 वर्षीय पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 54 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 43 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 3, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 3, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 10, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथील 2, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 18, देगलूर कोविड केअर सेंटर येथील 4 व खाजगी रुग्णालयातील 2 बाधितांचा  यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 653 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
आरटीपीसीआर तपसणीद्वारे 32 व्यक्तींमध्ये नांदेड आनंदनगर येथील 48 व 59 वर्षाचे 2 पुरुष, शक्तीनगर नांदेड येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, पांडुरंग नांदेड येथील 36 वर्षाची 1 महिला, एमजीएम कॉलेज रोड नांदेड येथील 43 वर्षाचा 1 पुरुष, सिडको नांदेड येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, विसावानगर नांदेड येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, राहुल कॉलनी तरोडा बु नांदेड येथील 67 वर्षाचा 1 पुरुष, दिलीप सिंघ कॉलनी गोवर्धन घाट रोड नांदेड येथील 67 वर्षाचा 1 पुरुष, वजिराबाद नांदेड येथील 40 वर्षाचा 1 पुरुष व 48 वर्षाची 1 महिला, हडको नांदेड येथील 63 वर्षाचा 1 पुरुष व 60 वर्षाची 1 महिला, ग्रा. रु. भोकर येथील 36 वर्षाचा 1 पुरुष, भोकर तालुक्यातील रिठा 57 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील मरखेल येथील 4 वर्षाची 1 बालिका, देगलूर तालुक्यातील शारदानगर येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, मुखेड तालुक्यातील खैरका 27 वर्षाची 1 महिला, मुक्रमाबाद येथील 12 व 25 वर्षाचे 2 पुरुष, मुखेड शिवाजीनगर 30 वर्षाचा 1 पुरुष, 60 वर्षाचे 2 महिला, मुदखेड तालुक्यातील धनज येथील 25 वर्षाचा 1 पुरुष, धर्माबाद बालाजी गल्ली येथील 78 वर्षाचे 1 पुरुष, धर्माबाद येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, कंधार नवीन मारोती मंदिर येथील 37 वर्षाची 1 महिला, परभणी जिल्ह्यातील चौंडी येथील 65 वर्षाचा 1 पुरुष, गंगाखेड येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, 53 वर्षाची 1 महिला, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बसस्थानक येथील 78 वर्षाचा 1 पुरुष, हिंगोली तालुक्याती विनायकनगर येथील 60 वर्षाची एका महिलेचा समावेश आहे.
अँटिजेन टेस्ट किट तपासणीद्वारे सुंदरनगर नांदेड येथील 53 वर्षाचा 1 पुरुष, भाग्यनगर नांदेड येथील 49 वर्षाचा 1 पुरुष, पद्मजा सिटी नांदेड येथील 63 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड गणेशनगर येथील 42 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड गोकुळधाम समोर भावसार चौक येथील 49 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली तालुक्यातील खतगाव येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील 56 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात 451 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 97, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 191, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 24, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 3, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 24, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 16, उमरी कोविड केअर सेंटर 9, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 1, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, हदगाव कोविड केअर सेंटर 2, भोकर कोविड केअर सेंटर येथे 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 11, खाजगी रुग्णालयात 40, बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 487,
घेतलेले स्वॅब- 11 हजार 743,
निगेटिव्ह स्वॅब- 9 हजार 326,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 39
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 169,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 13,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,
मृत्यू संख्या- 54,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 653,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 451,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 459. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000

वृत्त क्र. 676



नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 14.97 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 14.97 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 239.52 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 375.93 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 42.18 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 6.13 (426.84), मुदखेड- 6.67 (283.00), अर्धापूर-4.33 (357.33), भोकर- 13.50 (401.73), उमरी- 8.00 (262.63), कंधार- 11.67 (284.17), लोहा- 1.83 (345.49), किनवट- 20.43 (433.39), माहूर- 26.75 (389.75), हदगाव- 17.71 (373.43), हिमायतनगर- 10.33 (582.99), देगलूर- 39.50 (386.77), बिलोली- 17.00 (341.40), धर्माबाद- 7.33 (380.98), नायगाव- 6.20 (332.60), मुखेड- 42.14 (432.41). आज अखेर पावसाची सरासरी 239.52 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6014.91) मिलीमीटर आहे.
000000





वृत्त क्र. 675


पिक विमा भरण्यासाठी महा ई-सेवा,
सीएससी केंद्र 31 जुलैपर्यंत 24 तास सुरु
नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील उर्वरीत सर्व महा ई-सेवा केंद्र व सि.एस.सी केंद्र हे शुक्रवार 31 जुलै 2020 पर्यत 24 तास चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे.  यापुर्वी निर्गमीत केलेले निर्देश व अटी व शर्ती इतर दुकाने, आस्थापना जशाच तसे लागू राहतील.
शेतकऱ्यांना पिकविमा भरण्यासाठी शिल्लक असलेला अत्यल्प कालावधीत विचारात घेऊन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पिकविमा भरण्यापासून वंचित राहून नये यासाठी हा आदेश निर्गमीत केला आहे. जिल्हादंडाधिकारी यांनी 24 जुलै पासून निर्गमीत केलेल्या आदेशातील नियमावलीसह पुढील आदेशा पर्यंत नांदेड जिल्हा हा नॉन रेड झोनमध्ये आहे. या आदेशानुसार आस्थापने व दुकाने प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील दुकाने व खाजगी आस्थापनांना केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा दिली आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...