Saturday, December 9, 2017

जिल्हास्तरीय निवडणूक
ज्ञान स्पर्धेचे आज आयोजन
नांदेड, दि. 9 :- भविष्यातील नवमतदारांना निवडणूक विषयक विविध बाबीचे ज्ञान व्हावे या उद्देशाने निवडणूक ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका स्तरावरील स्पर्धेतून पात्र ठरलेल्या प्रत्येक शाळेच्या प्रथम व द्वितीय परिक्षार्थीची जिल्हापातळीवर परिक्षा रविवार 10 डिसेंबर 2017 रोजी केंब्रीज हायस्कूल शिवाजीनगर नांदेड येथे दुपारी 1 ते 1.30 या कालावधीत आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांनी या परिक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या परिक्षेत एकूण 30 वस्तुनिष्ठ स्वरुपातील प्रश्न असून त्यासाठी 20 मिनिटे इतका वेळ परिक्षार्थीना देण्यात येणार आहे. या परिक्षेत प्रथम व द्वितीय येणाऱ्या परिक्षार्थ्यांची राज्य स्तरावरील परिक्षा औरंगाबाद येथे होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने अखिल भारतीय स्तरावर 14 ते 17 या वयोगटातील इयत्‍ता 9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांसाठी निवडणूक ज्ञान स्पर्धा सन 2017-18 आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालयातील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांची शालेय स्तरावरील परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली होती, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

000000
सधन कुक्कुट विकास गटासाठी
अर्ज करण्याची 30 डिसेंबर मुदत
नांदेड दि. 9 :- जिल्ह्यातील अर्धापूर तालुका वगळुन उर्वरीत 15 तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे सार्वजनीक खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गट 50 टक्के अनुदानावर स्थापन करण्यासाठी सर्वसाधारण, अनुसुचित जाती व जनजाती क्षेत्रातील लाभधारकाकडून अर्ज शनिवार 30 डिसेंबर 2017 पर्यंत मागविण्यात आले आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.
अर्ज भरण्यासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे राहतील. सन 2017-18 पासून या योजनेंतर्गत सधन कुक्कुट विकास गटाची स्थान निश्चिती व लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सन 2018-19 पासून सन 2020-21 पर्यंत टप्प्याटप्याने करण्यात येणार आहे. प्रती तालुका एक लाभधारक निवडला जाईल. लाभार्थीकडे 2 हजार 500 चौ. फुट जागा स्वत:च्या मालकीची तसेच त्याठिकाणी दळणवळण, पाणी, विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी. प्रकल्प कार्यान्वित करताना अनुदान एकदाच देय असून त्यानंतर प्रकल्पाचा पुढील खर्च संपुर्ण लाभार्थ्यांना करावयाचा आहे. लाभधारकाने विहित नमुन्यात अर्ज भरुन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेकडे शनिवार 30 डिसेंबर पर्यंत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नांदेड यांनी केले आहे.

00000
प्रलंबीत शिष्यवृत्तीचे प्रस्ताव
सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 9 :- मुख्याध्यापकांनी प्रलंबीत शिष्यवृत्तीचे ऑनलाईन केलेल्या प्रस्तावाची हार्ड कॉपी व विद्यार्थ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केल्याची पोच पावती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयास त्वरीत सादर करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
राज्य शासनाने सन 2017-18 पासून सर्व शिष्यवृत्त्या महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्याचा निर्णय घेतला असल्याने सामाजिक न्याय विभागाचे ई-स्कॉलरशीप संकेतस्थळ बंद केले आहे. काही लाभार्थ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती 8 ते 10, अनुसुचित जाती, विजाभज, विमाप्रव प्रवर्गातील सन 2016-17 कालावधीत शिष्यवृत्ती प्रलंबीत ठेवण्यात आली होती. प्रलंबीत शिष्यवृत्ती देण्यासाठी मर्यादीत कालावधीसाठी mhaeschol हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.

000000
जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 9 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 डिसेंबर 2017 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने केले आहे.

000000
अध्यापक महाविद्यालयात
महापरिनिर्वाण दिन संपन्न
नांदेड, दि. 9 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान हे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी सदैव उपयोगी राहील, असे प्रतिपादन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांनी केले. येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.
यावेळी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विचारावर प्रकाश टाकला. तसेच भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. एस. सोळुंके यांनी तर आभार संगमेश्वर देवशटवार यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील बीएड, एमएडचे प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक, शिक्ष्‍ाक, कर्मचारी उपस्थित होते.
000000


मानवी हक्क दिनानिमित्त आज
विविध उपक्रमांच्या आयोजनाचे निर्देश
नांदेड दि. 9 :-  जिल्ह्यात रविवार 10 डिसेंबर 2017 रोजी मानवी हक्क दिन साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहेत
जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शिक्षण, कारागृह, निरीक्षकगृह आदी विभागांनी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 21 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करावी असे राज्य मानवी हक्क आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे सूचित केले आहे. या कायदाअंतर्गत समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान व्हावे त्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यानुसार न्यायालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस विभाग, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, महसूल विभागाची सर्व कार्यालये शिक्षणाधिकारी, कारागृह अधीक्षक, बालगृह मुलांचे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती करावी याविषयी पत्राद्वारे निर्देशीत केले आहे.
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...