Friday, January 19, 2024

 वृत्त क्र. 247

श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त

राज्यात २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर

 

          मुंबईदि. १९ : श्री रामलल्ला प्राण- प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने सोमवार, दि.२२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 


 वृत्त क्र. 62

 

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत

विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती

 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड शहरातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयनागार्जुना पब्लिक स्कूलजिल्हा व सत्र न्यायालयछत्रपती चौक आदी ठिकाणी वाहनचालकनागरिकांना नो हॉकिंग ध्वनी प्रदूषणाला आळा विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी रस्ता सुरक्षेसंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन व माहितीपत्रके वाटप केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक किशोर भोसलेसहायक मोटार वाहन निरीक्षक सचिन मगरेश्रीमती सायली शंकरवारसुनिल जारवालसंजय भोसलेगजानन पवळेश्रीमती राधा जेलेवाडदिलीप गडचेलवार आदींनी परिश्रम घेतले.

 

नांदेड शहरातील डॉक्टरलेन भागातील आदित्य हार्ट क्लिनीकवेदांता डायग्नोस्टिक आदी ठिकाणी नागरिकांमध्ये ध्वनिप्रदूषण विषयी जनजागृती केली. वायुवेग पथकातील श्रीमती मंजुषा भोसलेनंदकुमार सावंतआशिष जाधव यांनी आसना पुलाजवळ कर्कश आवाजात हॉर्न वाजविणाऱ्या 10 वाहनांची तपासणी केली. त्यात वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. तर उर्वरीत वाहनचालकांना थांबवून समुपदेशन करण्यात आले.

 

नांदेड शहरातील प्रियदर्शन हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियान-2024 अंतर्गत रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थीपालकशिक्षकउपस्थित नागरिकांना वॉक ऑन राईटअपघात होऊ नये यासाठी व अपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजने याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. गुड सेमिरीटन व हेल्मेटयुक्तअपघातमुक्त गाव संकल्पनेची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबतची माहिती पुस्तिका व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षकविद्यार्थीनागरिक उपस्थित होते. शाळेजवळील परिसरात ध्वनीप्रदूषण बाबत भित्तीपत्रके / स्टिकर लावण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्षक विजय राठोडश्रीमती मंजुषा भोसले व सहायक वाहन निरीक्षक सागर गुरव यांनी परिश्रम घेतले.

0000




 वृत्त क्र. 61

सुट्टीच्या दिवशी असलेल्या शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी सुधारित वेळापत्रक  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- श्री राम लल्ला  प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सोमवार 22 जानेवारी 2024  रोजी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी 22 जानेवारी  रोजीचे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदारांचे या दिवसाचे सुधारित अपॉईंमेंट वेळापत्रक करण्यात आले आहे. तरी संबंधीत अर्जदाराने आपली अपॉईंटमेंट तारीख sarathi.parivahan.gov.in या संकेतस्थळावर तपासून मिळालेल्या दिनांकास शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

तसेच योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी 22 जानेवारी 2024 रोजीचे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदार व वाहन मालक/चालक यांचे या दिवसाचे अपॉईंमेंट सुधारित वेळापत्रक  करण्यात आले आहे. तरी त्यांनी त्यांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी सुट्टी लगतच्या पुढील सात दिवसात या कार्यालयाच्या मौजे वाघी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे सादर करावेत. तसेच अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व अर्जदार व वाहनधारक यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 वृत्त क्र. 60

बारावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेश पत्राबाबत आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापकप्राचार्यशिक्षकविद्यार्थी व पालक आदींसाठी आवाहन करण्यात आले आहे कीउच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परिक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2024 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार 22 जानेवारी 2024 कॉलेज लॉगईन मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता बारावी परिक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र हॉल तिकिट ऑनलाईन पद्धतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. या प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेश पत्रावरील फोटोस्वाक्षरीविद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधीत मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यावयाचे आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थीपालकशिक्षकमुख्याध्यापकप्राचार्यसर्व उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावीअसे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 59

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी 

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा जिल्ह्यातील 50 केंद्रावर शनिवार 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहे. जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये या 50 परीक्षा केंद्रावर नवोदय चाचणी परीक्षा चालू असतांना परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात प्रवेश करता येणार नाही.  परीक्षा कालावधीत सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 यावेळेत परीक्षा केंद्र परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्सएसटीडीआयएसडीभ्रमणध्वनीफॅक्सझेरॉक्सपेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध केले आहे.

00000

 वृत्त क्र. 58 

ओबीसी महामंडळातील कर्जाची एकरकमी परतफेड

करणाऱ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबतची सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2024 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड 431605, दु.क्र. (02462) 220865 वर संपर्क साधावा, असेही महामंडळाच्या वतीने कळविले आहे.

 

0000  

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...