Thursday, July 12, 2018


नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड
श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या सभासद
निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 12 :- नांदेड शीख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍य निवडणुकीची  मतदार यादी तयार करणे व प्रसिध्‍दीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार नोंदणीचे अर्ज संबंधीत तहसिल कार्यालयात 20 जुलै ते 18 ऑगस्ट 2018 या कालावधीत करता येणार आहे. दिनांक 1 जुलै 2018 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्‍या मतदार यादीत ज्‍यांची नावे आहेत व जे सामान्‍यत: जुन्‍या हैद्राबाद संस्‍थानचा भाग महाराष्‍ट्र राज्‍यात समाविष्‍ट केलेल्‍या भागात राहतात ( औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील) अशा सर्व शिख मतदारांना या निवडणूकीसाठी तयार होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.    
नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाची निवडणूक घेण्‍याचे शासनाने ठ‍रविले असून नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब अधिनियम 1956 च्‍या कलम 6 पोटकलम दोन अन्‍वये बोर्डाचे तीन सदस्‍य निवडून देण्‍यासाठी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. मतदार यादीत आपले नाव दाखल करुन घेण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्‍यात आल्या आहेत. नियम तीन खाली शासनाने दिनांक 1 जूलै 2018 ही अर्हता तारीख निर्दिष्‍ट केली आहे. मतदार यादीत नाव दाखल करण्‍यास पात्र असलेल्‍या मतदारांना दिनांक 20 जूलै 2018 या तारखेपासून 30 दिवसात त्‍यांचे नाव मतदार यादीत नोंदविता येईल. महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्‍या मतदार यादीत दिनांक 1 जुलै 2018 रोजी ज्‍यांची नावे आहेत व जे सामान्‍यत: जून्‍या हैद्राबाद संस्‍थानचा भाग महाराष्‍ट्र राज्‍यात समाविष्‍ट केलेल्‍या भागात राहतात. (औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील) अशा सर्व शिख मतदारांना या निवडणूकीसाठी तयार होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल. महाराष्‍ट्र राज्‍यात सामील झालेल्‍या भूतपुर्व हैद्राबाद राज्‍यांच्‍या भागात अर्थात  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील भाग हा मतदारसंघ आहे. सामान्‍यत: या क्षेत्राबाहेर राहणा-या शिख मतदारांना मतदार यादीत नांवे नोंदविता येणार नाहीत. मतदार यादीत नाव नोंदणीसाठीचे अर्जाचे नमुने संबंधीत तालुक्‍याच्‍या तहसीलदारांकडे देण्‍यात आले आहेत. मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठीचा अर्ज नमुना नं. 1 मध्‍ये संबं‍धीत तहसीलदार यांचेकडे दिनांक 20 जूलै 2018 ते दिनांक 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत स्विकारले जातील. प्रारुप मतदार यादी तयार झाल्‍यानंतर मतदार संघातील सर्व संबंधीत जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयात, जिल्‍हाधिकारी, नांदेड यांच्‍या www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) व गुरुव्‍दारा बोर्डाच्‍या कार्यालयात नियम आठ प्रमाणे उक्‍त मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल. नियम 9 व 10 प्रमाणे कार्यवाही झाल्‍यानंतर नियम 11 नुसार अंतिम मतदार यादी  प्रसिध्‍द करण्‍यात येईल.
मतदार यादी कार्यक्रम
  • अर्हता दिनांक 1 जूलै 2018 रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदार यादी- महाराष्ट्र विधानसभेसाठी दिनांक 1 जूलै 2018 रोजी तयार केलेल्या व प्रसिध्द केलेल्या मतदारांच्या यादीवरुन.
  • मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म-1 भरुन देणे (नियम 5)- दिनांक 20 जूलै ते 18 ऑगस्ट 2018 (30 दिवस) स्थळ संबंधीत तहसील कार्यालय. 
  • प्रारुप मतदार यादी तयार करणे ( नियम 6 7)- दिनांक 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2018 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी नांदेड.
  • प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे (नियम 8)- दिनांक 27 ऑगस्ट 2018.
  • दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी (नियम 9) फॉर्म-2 नुसार - दिनांक 28 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर 2018 सक्षम अधिकारी संबंधीत तहसीलदार.
  • दावे व हरकती निकाली काढणे (नियम 10 (i) ) - दिनांक 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2018 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी नांदेड.
  • जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्णयाविरुध्द अपील दाखल करण्याचा कालावधी ( नियम 10 (2) )- दिनांक 5 ऑक्टोंबर ते 19 ऑक्टोबर 2018 सक्षम अधिकारी विभागीय आयुक्त औरंगाबाद.
  • विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेली अपील प्रकरणे निकाली काढण्याचा कालावधी- दिनांक 20 ऑक्टोंबर ते 26 ऑक्टोंबर 2018 सक्षम अधिकारी विभागीय आयुक्त औरंगाबाद.
  • अंतिम मतदार यादी प्रसिध्दीबाबत (नियम 11)- दिनांक 3 नोव्हेंबर 2018.

महाराष्‍ट्र शासन महसल व वन विभाग अधिसुचना क्रमांक जीयुआर-2018/ प्र.क्र.67/ज-7(अ) दिनांक 27 जून 2018 नुसार नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्‍या तीन सदस्‍यांना निवडुन देण्‍यासाठी 1 जलै 2018 रोजी महाराष्‍ट्र विधासभा मतदार यादी प्रसिध्‍द केल्‍यानुसार या यादीला अर्हता दिनांक मानुन औरंगाबाद, बीड, जालना, लातुर, उस्‍मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या संपुर्ण जिल्‍हयांचा आणि चंद्रपुर जिल्‍हयातील राजुरा, कोरपना व जीवती या तालुक्‍यांचा समावेश होतो. सदर भाग हा तत्‍कालीन हैद्राबाद राज्‍यात समाविष्‍ट होता या भागातील शिख मतदार यादी तयार करण्‍याबाबत वरील प्रमाणे निर्देशीत  केल्‍यानुसार नांदेड शिख गुरुव्‍दारा श्री सचखंड हजूर अपचलनगर साहिब बोर्ड निवडणुक नियम 1963 मधील तरतुदीनुसार हा मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्‍यात आला आहे, असेही जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000


जिल्ह्यात शनिवारी
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन
नांदेड दि. 12 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड तर्फे शनिवार 14 जुलै 2018 रोजी जिल्हा न्यायालय, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
            या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आज पर्यंत न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी 2 हजार 82 प्रकरणे त्यात 739 दिवाणी 1 हजार 343 फौजदारी प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यात दिवाणी प्रकरण, मो.. दावा प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे तसेच इतर दिवाणी प्रकरणे, बॅंक कर्ज वसुली प्रकरण इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याच बरोबर फौजदारी प्रकरणेही जी तडजोड पात्र आहेत अशी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
            याशिवाय, या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार असुन आतापर्यंत 5 हजार 679 दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
            या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अमरीकसिंघ वासरीकर, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व  विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच सर्व संबंध पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.    
00000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात मंगळवार 24 जुलै 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 जुलै 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे.  
000000


जिल्हा रुग्णालयात
जागतिक डेंगू दिन साजरा  
           
नांदेड, दि. 12 :- श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक डेंगू दिन व साप्तह साजरा करण्यात आला.
या दिनाच्या अनुषंगाने विद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीपक, डॉ. सभा खान यांनी उपस्थित रुग्ण व त्यांची नातेवाईक यांना डेंगू म्हणजे काय तो कसा होतो, तो होऊ नये यासाठी प्रतीबधात्मक उपाय कोणती याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. ए. पी. वाघमारे व बाह्य रुग्ण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000


इतर मागासवर्गीय महामंडळाच्या
बीज भांडवल योजनेबाबत आवाहन
            नांदेड, दि. 12 : - राज्य इतर  मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इतर  मागासवर्गीय  समाजातील  नागरिकांनी  महामंडळाच्या या कर्ज योजनेची  माहिती  घ्यावी    कर्ज  योजनेचा  जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधीक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेच्या  समोर  नांदेड  येथे संपर्क साधावा , असे  आवाहन  महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे  यांनी  केले आहे.
इतर मागासवर्गीय समाजाच्या पात्र उमेदवारांसाठी महामंडळाच्या 20 टक्के बीज भांडवल  कर्ज  योजनेसाठी  यावर्षाचे  उद्दीष्ट  प्रस्ताव संख्या 50 असून  त्याकरीता  लागणारे भागभांडवल 20 लाख रुपये आहे. या योजनेमध्ये प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत आहे. त्यामध्ये  2 लाख 50 हजारापर्यंतचे कर्ज प्रस्ताव 40 असून त्यासाठी निधी 12 लाख व त्यापेक्षा जास्त रुपये 5 लाखापर्यंत कर्ज प्रस्ताव 10 व त्याकरीता निधी 8 लाख याप्रमाणे आहे. या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची (बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर) 20 टक्के रक्कम महामंडळाची त्यावर 6 टक्के व्याज दर राहील. पाच टक्के स्वत:चा सहभाग राहील. परतफेडीचा कालावधी हा 60 महिन्याचा आहे.
            थेट  कर्ज  योजनेअंतर्गत  छोट्या  उद्योगासाठी महामंडळामार्फत 25 हजार रुपयापर्यंत थेट कर्ज दिल्या जाते. यावर्षाचे उद्दीष्ट कर्ज प्रस्ताव 150 असून त्याकरीता भागभांडवल 37 लाख 50 हजार रुपये आहे. यामध्ये 2 टक्के व्याज आकारल्या जाते व कर्ज परतफेड ही 36 महिन्यात केली जाते.
या योजनेकरीता अर्जदार लाभार्थ्याची अर्हता पुढील प्रमाणे आहे. लाभार्थी हा इतर मागासवर्गीय असावा. तो महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा. त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे तो कोणत्याही बँकेचा महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा तसेच कुटंबातील सर्व सदस्याचे एकत्रीत वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. या योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येईल.
0000000

खरीप हंगामात प्रधानमंत्री पिक विमा
योजनेत सहभागासाठी 24 जुलै मुदत
शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 12 :- जिल्हयात खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप-2018 मध्ये लागू करण्यात आला आहे.  बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकऱ्यांसाठी 31 जुलै 2018 ही असुन बिगर कर्जदार शेतक-यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2018 ही आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हयात खरीप हंगाम 2018 मध्ये ही योजना इफ्को टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पहिला मजला, आगळे मार्ग, डॉक्टर लेन, नांदेड (दूरध्वनी क्र. 02462 / 247111) यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2017 मध्ये नांदेड जिल्हयामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली असुन या योजनेंतर्गत रक्कम 542.752 कोटी एवढी नुकसान भरपाई शेतक-यांना मिळाली आहे. मागील वर्षी शेतक-यांना ऑनलाईन विमा भरतेवेळी तांत्रीक अडचणी आल्या होत्या. यावर्षी सदर परिस्थिती पुन्हा उद्भवणार  नाही  याकरीता शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्यासाठी अंतिम तारखेची वाट न पाहता आतापासुनच नलाईन पध्दतीने सीएससी सेंटरच्या माध्यमातुन अथवा स्वत: अर्ज भरावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एकदम शेवटच्या दिवशी विमा अर्ज भरण्यासाठी गेल्यास गर्दी होऊ शकते. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास शेतक-यांना विम्याचा लाभ मिळणार नाही असे कृषि आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
शेतक-यांना विमा अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजीटल सेवा केंद्र) जावे लागेल. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीत ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत देखील सहभागी होता येणार नाही.  त्यामुळे शेतक-यांनी मुदतीपुर्वीच बँकेत किंवा आपले  सरकार सेवा केंद्रावर पिक पेऱ्याचे स्वंयघोषणा पत्र, सातबारा, 8-, आधारकार्ड, बँकेचे पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरुन अर्ज सादर करावेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2018 अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता
पीक
विमा संरक्षीत रक्कम रु./हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)/ हेक्टर
भात
37,000/-
740/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
31,500/-
630/-
मुग
18,900/-
378/-
उडीद
18,900/-
378/-
सोयाबीन
42,000/-
840/-
तीळ
23,100/-
462/-
कापुस
42,000/-
2100/-
इफको टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनी, लिमीटेड कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनीधी यांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. जिल्हा प्रतिनिधी - सचिन तांबे, मोबाईल क्र - 8454944726कपील दवणे, मोबाईल क्र - 9096696333 गौतम जळबाजी कदम मोबाईल क्र -8329390770, 9890846283.
जिल्हा
तालुका
तालुका प्रतिनिधी
मोबाईल क्रमांक
नांदेड
हदगाव
मारेाती भालेराव
9049493100
9284217013
अर्धापूर
अनिल जगदाळे
9527491358
9325542080
नांदेड
नितीन कोल्हे
8999598376
9970202819
मुखेड
ज्ञानेश्वर हराळे
8600408454
7410712220
लोहा
पदमाकर आवळे
9823292660
7020835815
कंधार
दिपक बेटीवार
9011114171
8888333506
नायगाव



देगलूर
सुनिल शिंदे
7066249548
7620837020
बिलोली


भोकर
दत्तात्रय खिरे
9527213665

मुदखेड


हिमायतनगर
सचिन घुले
7875063660
8329176485
किनवट


माहूर
फुले खंडु
9049673962
7887757150
धर्माबाद
नागेश जाधव
7507829920

उमरी


            ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी विमा काढण्याचे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...