Monday, December 7, 2020

 32 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी


नांदेड (जिमाका) दि. 7 :- सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 16 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 16 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 667 अहवालापैकी 632 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 626 एवढी झाली असून यातील 19 हजार 539 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 342 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 20 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 6 डिसेंबर रोजी लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 551 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मुखेड कोविड रुग्णालय 2, कंधार तालुक्यांतर्गत 16 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.72 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 11, धर्माबाद तालुक्यात 3, अर्धापूर 1, परभणी 1 असे एकुण 16 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, देगलूर तालुक्यात 1, मुखेड 1, उत्तर प्रदेश 1, भोकर 1, लोहा 1, गुजरात 1 असे एकुण 16 बाधित आढळले.

जिल्ह्यात 342 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 30, मुखेड कोविड रुग्णालय 24, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 70, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 145, खाजगी रुग्णालय 22 आहेत.

सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 190, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 79 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 58 हजार 436
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 33 हजार 864
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 626
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 539
एकूण मृत्यू संख्या- 551
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.72 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-394
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-342
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-20.

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000

 

17 तंबाखू विक्रेत्यावर कारवाई

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्षास प्राप्त तक्रारीवर पथकामार्फत 5 डिसेंबर रोजी मुसलमानवाडी पाटी, स्वारातीम विद्यापीठ गेट व शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेट येथे अचानक धाडी टाकून 17 तंबाखू विक्रेत्यावर कारवाई करुन 12 हजार 900 रुपये दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय नांदेड यांना प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील मुजळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली.  सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यास अथवा धुम्रपान केल्यास कोरोना संक्रमनाचा धोका वाढतो. स्वारातीम विद्यापीठ गेट व शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेट तसेच मुसलमानवाडी पाटी परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. या पथकात नोडल अधिकारी             डॉ. पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. अर्चना तिवारी , मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक श्री पठाण आदी होते.

00000

 

आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी

9 डिसेंबरला विकेल ते पिकेल कार्यशाळा 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  ‘विकेल ते पिकेल’ अभियानातंर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, प्रधानमंत्री सुक्ष्‍म खाद्य उद्योग उन्‍नयन योजना, केंद्र पुरस्‍कृत कृषि पायाभुत विकास निधी योजना, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प या योजनेची जिल्‍हास्‍तरीय कार्यशाळा बुधवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्‍हा नियोजन सभागृह, येथे जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली येथे होणार आहे.   

या कार्यशाळेसाठी जास्‍तीत जास्‍त आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी उपस्थित राहावे असे, आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक आत्‍मा रविशंकर चलवदे यांनी केले आहे. या कार्यशाळेसाठी जिल्‍हयातील नाबार्ड, पशुसंवर्धन, जिल्‍हा उद्योग केंद्र, माहिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्‍हा उपनिबंधक, मत्‍स्‍यविभाग, दुग्‍धव्‍यवसाय, जिल्‍हा अग्रणी व्‍यवस्‍थापक, जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागातील अधिकारी यांची उपस्थिती आहे, असेही या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 8 डिसेंबर 2020 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...