Wednesday, July 3, 2019

प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी सुविधा केंद्राचे उद्घाटन



नांदेड, दि. 3 :- कृषि विभाग व कृषि पीक विमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड तालुका कृषि अधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी सुविधा कक्ष उघडण्यात आला आहे.
नांदेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरताना येणारी अडचण दूर व्हावी. त्यांना मार्गदर्शन व्हावे व माहिती भरताना मदत होण्यासाठी नांदेड तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकरी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली. या सुविधा केंद्राचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
यावेळी नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, तालुका कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे, मंडळ कृषि अधिकारी सतीश सावंत, प्रकाश पाटील, कृषि अधिकारी पुनम चालरमल, कृषि पर्यवेक्षक शिवाजी बारसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे यांनी शेतकऱ्यांना पीक विमाचा भरणा करुन संभाव्य जोखमीपासून संरक्षण घ्यावे व पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
पीक विमा शेतकरी सुविधा केंद्राची स्थापन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि सहायक वसंत जारीकोटे, शंकर पवार, मनोहर वडवळे, रामदास कमठेवाड, श्रीमती एस. डी. देशमुख, सहायक अधिक्षक नजीर अहेमद, बी. एल. हाते, के. बी. गायकवाड, डी. एस. सरदार, एम. एम. बेरजे, आत्मा यंत्रणेचे शेखर कदम आदींने प्रयत्न केले. पिक विमा कक्षात शेतकऱ्यांना माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी कृषि पिक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी रवी थोरात, लोकेश कांबळे यांनी नियुक्ती केली आहे.
00000


प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करुन घ्यावे - जिल्हाधिकारी अरुण डोंगरे



नांदेड, दि. 3 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी करुन घ्यावे यासाठी गावपातळीवर ग्रामसभा, चावडीवाचन आदी माध्यमाद्वारे शेतकऱ्यांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसुल, कृषि, जिल्हा परिषद तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधींना दिले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस, जिल्हा अग्रणी बँकचे नितीन कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकचे एम. टी. शिंदे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे किरण निकम, कृषि विकास अधिकारी कार्यालयाचे श्री शिरफुले, विमा कंपनीचे प्रतिनिधी गौतम कदम, सी.एस.सी. चे प्रतिनिधी सदाशिव पवार यांची उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी प्रधानमंत्री पिक विमा येाजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना तांत्रीक अडचणी आल्यास त्या विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तात्काळ दुर कराव्यात, अशा सुचना दिल्या.
यावेळी नांदेड जिल्ह्याची पावसाची वार्षीक सरासरी 955.55 मि.मी. एवढी आहे. जिल्हयाचे सर्वसाधारण क्षेत्र 8 लाख 24 हजार 820 हेक्टर असुन त्यापैकी 67,131 हेक्टर (8.14 टक्के) क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.  शासन निर्णय 22 मे 2019 नुसार खरीप हंगाम सन 2019 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्हयात राबविण्यासाठी ॲग्रीकल्चर इंन्शुरस कंपनी ऑफ इंडिया मुंबई या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) सहभागी होण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2019 आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक आहे. योजनेंतर्गत 70 जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे यांनी दिली. तर खरीप हंगाम 2019 मध्ये आतापर्यंत 900 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत अशी माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी दिली.
00000

गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना



नांदेड, दि. 3 :-  उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2019-20 साठी  www.dtemaharashtra.gov.in / foreignscholarship2019 या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी शनिवार 13 जुलै 2019 पर्यंत सायं. 5.30 वाजेपर्यंत मुदत आहे. तर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत, आवश्यक प्रमाणपत्र, कागदपत्रे साक्षांकित प्रतीसोबत मुळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी सोमवार 15 जुलै 2019 पर्यंत उच्च शिक्षण विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.  
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी जे पदव्युत्तर, पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी THE (Time Higher Education) किंवा Qs (Quacquarelli Symonde) रॅकिंग 200 च्या आतील असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल अथवा प्रवेश घेणार असतील अशा 20 विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्षे 2018-19 पासून राबविण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 4 ऑक्टोंबर 2018 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे.  
उच्च शिक्षण विभागामार्फत कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी दोन संच मंजूर आहेत. परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून शैक्षणिक वर्षे सन 2019-20 साठी ही योजना राबविण्यात येत आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान व विधी अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण विभागाचे नांदेड विभागीय कार्यालय येथे अर्ज सादर करावीत. तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाचे अर्ज तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाकडे सादर करावीत. इच्छूक विद्यार्थ्यांनी www.dtemaharashtra.gov.in / foreignscholarship2019 या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहे, असे आवाहन उच्च शिक्षण नांदेड विभागाचे सहसंचालक डॉ. बळीराम लहाने यांनी केले आहे.  
000000

जिल्हातील सर्व गावांचे ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाचे काम पूर्ण होणार



नांदेड, दि. 3 :- राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, भूमी अभिलेख विभाग भारती सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राज्यातील गावठाण मापन झालेल्या सर्व गावांचे गावठाण भूमापनाचे काम ड्रोनच्या सहाय्याने होणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 जुलै 2019 पासून नांदेड जिल्हयातील 1 हजार 203 गावांच्या गावठाण द्दीचे काम प्रत्यक्षपणे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी नागरिकांनी सर्वे करणाऱ्या पथकांना सहकार्य करावे, असे अहवान नांदेड जिल्हा अधीक्षक  भूमि अभिलेख श्रीमती सुरेखा सेठिया यांनी केले आहे.
याबाबतचा राज्य शासन ग्रामविकास विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे. याअनुषंगाने जीआयएस आधारे गावाच्या गाव ठाणातील मिळकतीचे सर्व्हेक्षण ुर्ण करुन संगणीकृत नकाशे मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. या योजनेमुळे जिल्हयातील प्रत्येक गावातील शासनाचे मालकीच्या मिळकतीचे संरक्षण, मिळकतीचा नकाशा सिमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे त्याची नोंद होईल, ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल, गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सिमा निश्चित होवून अतिक्रमण रोकता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकत धारकांना घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेत तरलता ये गावाची आर्थिक पत उंचावेल, ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख नकाशा उपलब्ध होईल, असेही जिल्हा अधीक्षक  भूमि अभिलेख श्रीमती सेठिया यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

00000



पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा

नांदेड, दि. 3 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 6 जुलै 2019 रोजी दादर रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.45 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने नांदेड विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायं. 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5.45 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...