स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा सत्कार सोहळा
शासकीय
सेवेत काम करतांना
जनसेवेच्या
कामांची जाणीव ठेवावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 20 :- शासकीय सेवेत आपण खुर्चीवर बसतो तेंव्हा समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. लोकांच्या अडचणी ऐकुण
त्यांचे प्रश्न सोडविले तर त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. शासकीय सेवेत काम
करतांना जनसेवेच्या कामांची जाणीव ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे यांनी केले.
केंद्रीय
लोकसेवा आयोग व राज्यसेवेतील विविध परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी चांगल्या
गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आई-वडील, नातेवाईकांसह
परीक्षेतील यशस्वीतांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे आज
करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन
जिल्हाधिकारी श्री डोंगरे बोलत होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस
अधीक्षक चंद्रकिशोर मीना, मनपा आयुक्त लहुराज माळी, केंद्रीय उत्पादन शुल्कचे
सहाय्यक आयुक्त धीरजकुमार कांबळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी
उपजिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम
कुरेशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सबीनवार, जवाहर नवोदय
विद्यालयाचे प्राचार्य आर. व्ही. प्रसाद, जी. रमेश राव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी
सुनिल हुसे, तहसिलदार किरण अंबेकर, सुरेश घोळवे, अरुणा संगेवार, सुरेखा नांदे, सुनीत
शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी
श्री. डोंगरे म्हणाले, स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे परिश्रम
समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षेची तयारी यशस्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करुन केल्यास
मनातील भिती, अतीउत्साह कमी होतो आणि अभ्यासाची पद्धत समजण्यास मदत होते. कोणतेही
काम अवघड नाही, सकारात्मक रहा, परिस्थितीला दोष देऊ नका त्यातून चांगला मार्ग निवडला
पाहिजे. समाजाने आपल्याला बरेच काही दिले आहे, समाजाचे आपण देणे लागतो याची जाणीव
ठेवून यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लोकसेवा केली पाहिजे. जिल्ह्यातील अनेक
विद्यार्थी जीद्य, परिश्रमाने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत आहेत. "उज्ज्वल
नांदेड" अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्याचे प्रयत्न केले जात
आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अभ्यासासाठी
ग्रंथालय उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन चांगल्या गोष्टीसाठी आपल्या सोबत असल्याचे
सांगून श्री. डोंगरे यांनी चांगले संस्कार दिलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या
आई-वडिलांचे अभिनंदन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना
यशासाठी शुभेच्छा दिल्या.
विशेष
पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद म्हणाले, स्पर्धा परीक्षेकडे अनेक मुले जात आहेत.
विद्यार्थ्यांनी आपला कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे क्षेत्र निवडावे. जीवनात आत्मविश्वास
कमी होऊ न देता सकारात्मक राहणे आवश्यक आहे, असेही सांगितले.
पोलीस
अधीक्षक चंद्रकिशोर मीना म्हणाले, परीक्षेबद्दल भिती न बाळगता स्वत:ला ओळखून
स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यशस्वी विद्यार्थ्यांनी कशा आभ्यास केला यापेक्षा
त्यांनी काय चुका केला याची माहिती घ्यावी त्यामुळे तुमच्या त्या चुका होणार
नाहीत. इतरांशी तुलना करु नका. कुठलाही न्युनगंड न ठेवता परीक्षा दिल्यास यश
मिळण्यास मदत होते.
भारतीय
प्रशासकीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेले डॉ. चव्हाण म्हणाले, तीव्र व कठीण स्पर्धा
परीक्षेची जाणीव ठेवून पहिल्या प्रयत्नात परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वस्व
अर्पण करण्याची तयारी ठेवावी. नुसती स्वप्ने पाहून नका, काटेकोर नियोजन करा. ध्येय
उच्च ठेवा त्यासाठी मार्गदर्शन, नियोजन, प्रेरणा आवश्यक आहे, असे मत त्यांनी
व्यक्त केले.
अशिष
येरेकर म्हणाले, गरीब परिस्थिती असली तरी पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा. काय
अभ्यास केला यापेक्षा कसा अभ्यास केला हे महत्वाचे आहे. इच्छा शक्तीच्या जोरावर
संधी भरपूर मिळतात. गुणवत्ता वाया जाऊ देऊ नका. सकारात्मक राहून दृष्टिकोन विकसित
करणे महत्वाचे आहे, असे सांगितले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेले दिग्वीजय बोडके, डॉ. सुयश चव्हाण, रोहन घुगे, श्रीनिवास पाटील, अशिष येरेकर. MBA –ENT राज्यातून पहिली आलेली दिव्या गोवर्धन बियाणी, जेईई देशातून तिसरा
आलेला पार्थ सतीश लटुरिया. राज्यकर निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण शिवाजी जाकापुरे, कु. नेहा पवार, अमोल किशनराव हनवते, विवेक मधुकरराव क्षिरसागर, योगेश टोंपे, गाडेवाड माणिक रामचंद्र, कु. गिरे मीरा अशोकराव, सुमित्रा मसलगे, महंमद अरीफ, अभिजित देशमुख, अजय वाघमारे, रवी खिल्लारे, मुंजेष कांबळे. कृषि सेवा परीक्षेत विठ्ठल किशनराव मखपल्ले- मंडळ कृषी अधिकारी, कर सहाय्यक परीक्षेत गंगाधर शेषेराव पाटील, कु.भाग्यश्री गंगाधर मोरे, कु. चंद्रसेना शिवाजी सुर्यवंशी, व्यंकटी नंदकिशोर पुयड, कु. अंजली काळे. पोस्टल असिस्टंट- लक्ष्मण शिवाजी सोळुंके. मंत्रालय लिपीक परीक्षा- कु. चंद्रसेना शिवाजी सुर्यवंशी, सविता गणेशराव मंगरुळे, तेलंगे राजश्री दिगांबर, सुरेखा सटवा आंबेपवाड, ज्योती कावळे, कु. लक्ष्मी चिटटेबोईनवाड, कु. भाग्यश्री कांबळे, काळोजी परसराम शिंदे. पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा लक्ष्मण शेन्नेवाड, कु.गायत्री कांबळे, कु.राधाबाई एम.केंद्रे यातील
उपस्थित विद्यार्थ्यांचा पालक, कुटुंबासह सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक
निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची
संकल्पना सांगितली. यावेळी उपस्थित अधिकारी, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा. सचिन नरगंले, सुनिल हुसे
यांनी केले.
आभार
मीना सोलापूरे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन संजय कर्वे, अजय वट्टमवार,
कोडींबा गादेवाड, आरती कोकुलवार, संजय पाटील, श्रीनिवास शेजूळे, मनोज अरुडवार,
संजीव कार्लेु, सोपान यनगुलवाड, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, दत्ता सीरमवाड
यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
000000