Thursday, September 14, 2023

लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव प्रतिबंधनियंत्रणासाठी

तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आदेश

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राज्यामध्ये उद्भवलेल्या गोवर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यासाठी आदेश निर्गमीत केले आहेत.  

या आदेशात म्हटले आहे कीनांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात लम्‍पी चर्मरोग हा विषाणूजन्य सांसर्गिक रोग प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात गोवंशीय पशुधन बाधित झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याने मर्तुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिनियमातील तरतुदी आधारे अधिसूचनेद्वारे संपूर्ण नांदेड जिल्हा हा नियंत्रित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गोवंशीय पशुधनास गोटपॉक्स लसीकरणइनाफटॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील जनावरांचे संपूर्ण आठवडी बाजार व आंतरराज्य सीमा बंद करण्यात आल्या असून वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. बैल पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर गोवंशीय पशुधनास एकत्र येण्यास व सण साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सद्यपरिस्थितीचे अवलोकन करता पशुपालक अथवा स्थानिक प्रशासनामार्फत बाधित अथवा संशयित पशुरुग्नाची माहिती तात्काळ पशुसंवर्धन विभागास देण्यात येत नाही. स्थानिक प्रशासना मार्फत रोग प्रतिबंधासाठी अनुसरावयाची इतर अनुषंगिक प्रतिबंधात्मक कार्यवाही जसे की बाधित पशुचे विलगीकरण देखील पुरेशा गांभीर्याने केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अधिनियमातील तरतूद क्र. 4 (1) व (2) नुसार संबधित पशुपालकांनीइतर कोणत्याही व्यक्तीशासनेत्तर  संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी माहिती नजीकच्या पशुसंवर्धन विभागास कळविणे बंधनकारक आहे. अधिनियमातील तरतूद 26 नुसार अनुसूचित आजाराने मृत झालेल्या पशूची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे हे पशुपालकांचे कर्तव्य आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने खात्री करावी.

महानगरपालिका, सर्व नगरपालिकानगरपंचायत व ग्रामपंचायती यांनी या अधिनियमातील कलम 30 (अ) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित रोगाचा रोग प्रादुर्भाव झाल्याबाबत संबंधित कार्यक्षेत्राच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ अवगत करावे. कलम 30  नुसार कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करणे तसेच कलम क नुसार पशुवैद्यकांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात किंवा या कायद्याखाली त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यात मदत करणे या संपूर्ण जबाबदाऱ्या स्थानिक प्रशासनाच्या आहेत.

सर्व खाजगी पदविकाधारक यांनी / पशुपालकांनी लम्पी स्किन रोगांची माहिती शासकीय पशुवैद्यकीय संस्थेस देणे बंधनकारक आहे. लम्पी स्किन रोगाचा उपचार पशुधन विकास अधिकारी किंवा त्यांच्या मार्गदर्शना नुसारच करण्यात यावे. खाजगी पदविकाधारक यांनी लम्पी स्किन रोगांचा परस्पर उपचार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात  येईल.

या सर्व बाबी विचारात घेऊन लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव प्रभावी नियंत्रणासाठी शासन अधिसूचनेनुसार पशुधनाची वाहतूकजनावरांचा बाजार भरवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच बाधित जनावरांच्या हालचालीवर निर्बंध आणणे व पशुवरील बाह्यकीटकाच्या नियंत्रणासाठी तसेच परीसरातील स्वच्छतेबाबत आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. रोग प्रादुर्भाव अनुषंगाने आवश्यक जनजागृती तसेच पशुपालकांचे प्रबोधन करण्यासाठी उचित कार्यवाही करावी. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये उपरोक्त कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालकव्यक्तीसंस्था प्रतिनिधी यांच्या विरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत. असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि. 14 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमीत केलेल्या आदेश स्पष्ट केले आहे.  

000000

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त 

गाथा मुक्तिसंग्रामाची दोन अंकी नाटकाचा प्रयोग   

नांदेड (जिमाका) दि. 14 :- मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारीत गाथ मुक्तिसंग्रामची या दोन अंकी नाटकाचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. 

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, किनवट, माहूर, हिमायतनगर, बिलोली, नायगाव, मुदखेड आणि उमरी या 10 तालुक्यात हैदराबाद स्वातंत्र्याचा रणसंग्राम या नाटकाच्या सादरीकरण व नांदेड जिल्ह्याच्या  समन्वयासाठी नाथा चितळे यांची समन्वयक म्हणून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नियुक्ती केली आहे. अमृत नाट्य महोत्सवात गाथा मुक्तिसंग्रामाची हे नाटक मराठवाड्यातील 10 तालुक्यात 18 सप्टेंबर 2023 पासून सादर केली जातील.  

0000

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी करण्याचा अंतिम दिनांक हा 15 सप्टेंबर, 2023 असा आहे.

 राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे यांनी दिली आहे.

राज्यात सन 2022 मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन 2023 मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांव्यतिरिक्त उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओ ग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक 8169882898, 022-243122956 / 022-24365990 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत ( सकाळी 10 ते सायंकाळी 6) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

खरीप हंगाम 2023 ची ई-पिक पाहणी तात्काळ पूर्ण करण्याचे कृषी व संबंधित विभागांना निर्देश

                                                रीप हंगाम 2023 ची ई-पिक पाहणी

तात्काळ पूर्ण करण्याचे कृषी व संबंधित विभागांना निर्देश

नांदेड (जिमाका) दि. 14 :- खरीप हंगाम 2023 मध्ये मान्सूमचे आगमन उशिरा झाले आहे. तसेच संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसामध्ये दिर्घ खंड पडल्यामुळे राज्यातील अनेक महसुली विभागामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी ई-पीक पाहणीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तरी जिल्ह्यातील ख्ररीप हंगाम 2023 ची ई-पीक पाहणी तात्काळ करण्याचे, निर्देश कृषी व संबंधित विभागाला जिल्हा प्रशासनाने दिले.

नांदेड जिल्ह्याची ई-पीक पाहणी टक्केवारी 16.13 असल्याचे दिसून येत आहे. त्यापैकी भोकर-6.96 टक्के, उमरी 7.19 टक्के, अर्धापूर 7.61 टक्के, या तालुक्याची टक्केवारी 10 पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मुदखेड 10.95 टक्के, मुखेड 11.64, नांदेड 12.52 टक्के व माहूर 13.47 टक्के या तालुक्याची टक्केवारी 15 पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने 100 टक्के खातेदाराची खरीप 2023 हंगामातील ई-पिक पाहणी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभाग व महसूल विभागाने संयुक्तपणे विशेष मोहिमेचे आयोजन करुन ई-पीक पाहणी पूर्ण करावी,  असे जिल्हाप्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

लेंडी प्रकल्पांतर्गत चार बुडीत गावातील 1 हजार 44 लाभार्थ्यांना 38 कोटी 52 लाख 36 हजार रुपये वितरीत - सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

 लेंडी प्रकल्पांतर्गत चार बुडीत गावातील 1 हजार 44 लाभार्थ्यांना

38 कोटी 52 लाख 36 हजार रुपये वितरीत

-  सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम

§  उर्वरित गावांना अनुदान वितरणाची कार्यवाही सुरु

नांदेड (जिमाका) दि. 14 :-लेंडी प्रकल्पांतर्गत बुडीत गावातील वाढीव कुटूंबास प्रति कुटूंब 3 लाख 69 हजार रुपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. मंजूर अनुदान उपविभागीय अधिकारी कार्यालय, देगलूर यांचे स्तरावरुन वितरीत करण्यात येत आहे. लेंडी प्रकल्पांतर्गत मुखेड तालुक्यातील मौ. रावणगाव, मौ. भाटापुर, मौ. हसनाळ, मौ. मारजवाडी या चार गावांच्या एकूण 1 हजार 44 लाभार्थ्यांना प्रत्येकी 3 लक्ष 69 हजार याप्रमाणे एकूण 38 कोटी 52 लाख 36 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती देगलूरचे सहायक जिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.

या प्रकल्पात मुखेड तालुक्यातील मौ. रावणगाव, भाटापुर, हसनाळ, भेंडेगाव, इटग्याळ प.मु., वळंकी, कोळनुर, भिंगोली, मारजवाडी, भासवाडी, मुक्रमाबाद या गावाचा समावेश आहे.  मुखेड तालुक्यातील मौ. रावणगाव येथील 519 लाभार्थ्यांना एकूण 19 कोटी 15 लाख 11 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. भाटापुर येथील 42 लाभार्थ्यांना एकूण 15 कोटी 49 लाख 8 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. हसनाळ येथील 255 लाभार्थ्यांना एकूण 9 कोटी 4 लाख 5 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मौ. मारजवाडी येथील 228 लाभार्थ्यांना एकूण 8 कोटी 41 लाख 32 हजार रुपये वाढीव कुटूंब पुनर्वसन अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित गावांचे अनुदान वितरीत करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती देगलूरचे सहायक जिल्हाधिकारी तथा भुसंपादन अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

नजीकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात टपाल सेवेचा लाभ घेण्याचे डाक विभागाचे आवाहन

 नजीकच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात टपाल सेवेचा

लाभ घेण्याचे डाक विभागाचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- नांदेड शहरात एकूण 15 पोस्ट ऑफिस कार्यालय कार्यरत आहेत. सर्व पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (एसबी), आवर्ती खाते (आरडी),राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससीजारी करणेकिसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक आवर्ती ठेवी (एमआयएस), सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान बचत पत्र इ. बँकिंग सेवा तसेच पोस्टल जीवन विमा (पीएलआय)मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, पार्सल इ. सुविधा उपलब्ध/ कार्यरत आहेत. नांदेड प्रधान डाकघर येथील गर्दी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयात जाऊन टपाल सेवेचा लाभ घ्यावा. वरील प्रकारच्या सेवेस कार्यालयीन वेळेत कुणीही टाळाटाळ केल्यास अधीक्षक डाकघर, नांदेड विभाग यांना दुरध्वनी क्र. ०२४६२-२३१५२१/ २३१८७७ या क्रमांकावर ( सकाळी  10 ते  सायं. 6 यावेळेत )  संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागाचे अधिक्षक यांनी केले आहे.

भारतीय डाक विभागाचे सर्व काम ऑनलाईन चालु असल्याने बचत खात्याचे काम कुठेही करता येते. नांदेड शहरातील पोस्ट ऑफिसचे नाव व कार्यालयाचा पत्ता पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे. नांदेड प्रधान डाकघर कार्यालय, पत्ता शिवाजी पुतळ्या जवळ, रेल्वे स्टेशन रोड नांदेड -431601 याप्रमाणे आहे. शिवाजीनगर उप डाकघर निमा भवन, गणेश नगर,  नांदेड -431602, सिडको उप डाकघर, शिवाजी पुतळ्याजवळ, राम नगर, सिडको -431603 येथे आहे. इतवारा उप डाकघराचा पत्ता प्रतिभा निकेतन शाळे जवळ, होळी, नांदेड -431604 याप्रमाणे आहे. तरोडा रोड उप डाकघरचा पत्ता भावसार चौक, तरोडा बु. नांदेड -430605 याप्रमाणे आहे. मिलगेट उप डाकघराचा पत्ता एनटीसी  मिल जवळ, मिलगेट,नांदेड -431601 असा आहे. सचखंड उप डाकघराचा पत्ता गुरुद्वारा चौक नांदेड -431601 असा आहे. नांदेड टाउन उप डाकघर कार्यालयाचा पत्ता गुरुद्वारा चौक नांदेड -431601 याप्रमाणे आहे. चौफाळा उप डाकघर कार्यालयाचा पत्ता हनुमान मंदिर जवळ, चौफाळा नांदेड -431604 याप्रमाणे आहे. करीमाबाद उप डाकघर कार्यालयाचा पत्ता खोज्जा कॉलोनी रोड कारीमाबाद 431604 याप्रमाणे आहे. नया मोंढा उप डाकघर कार्यालयाचा पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत नया मोंढा नांदेड 431602 याप्रमाणे आहे.. अशोकनगर उप डाकघर कार्यालयाचा पत्ता जि. प. शाळे जवळ, वसंत नगर नांदेड -431605 याप्रमाणे आहे. यशवंतनगर उप डाकघर कार्यालयाचा पत्ता यशवंत नगर हाउसिंग सोसायटी, यशवंत नगर नांदेड 431602 याप्रमाणे आहे. चैतन्यनगर उप डाकघर कार्यालयाचा पत्ता कॅनॉल रोड, चैतन्य नगर नांदेड 431605 याप्रमाणे आहे. श्री छत्रपती  चौक उप डाकघर कार्यालयाचा पत्ता बजाज फंक्शन हॉल जवळ नांदेड 431605  याप्रमाणे आहे. नागरिकांनी डाक विभागाच्या सेवेसाठी आपल्या जवळच्या डाक विभागाच्या कार्यालयात संपर्क करावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापन दिनानिमित्त प्रतिबंधात्मक आदेश

 मराठवाडा मुक्ती संग्राम 

वर्धापन दिनानिमित्त प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 14 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 17 सप्टेंबर 2023 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम माता गुजरीजी विसावा उद्यान येथे होणार आहे. या अनुषंगाने नांदेड शहरातील माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा ते चिखलवाडी कॉर्नर, महाविर चौक पर्यंतच्या परिसरातील मुख्य रस्त्यावर (15 सप्टेंबर 2023 रोजीच्या मध्यरात्री) 16 सप्टेंबर 2023 पासून ते 17 सप्टेंबर 2023 रोजीच्या 24 वाजेपर्यंत  प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. 

रविवार 17 सप्टेंबर रोजी माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी कोणताही अनुचीत प्रकार घडू नयेकायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केला आहे. हा आदेश (15 सप्टेंबर 2023 रोजीच्या मध्यरात्री) 16 सप्टेंबर 2023 पासून ते 17 सप्टेंबर 2023 रोजीच्या 24 वाजेपर्यंत वरील नमूद परिसरात उपोषणेधरणेमोर्चारॅलीरास्ता रोकोआंदोलने इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात प्रतिबंध करण्यात आले आहे.

0000

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

                                              उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी

मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :-  राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. नावनोंदणी करण्याचा अंतिम दिनांक हा 15 सप्टेंबर, 2023 असा आहे.

 राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे यांनी दिली आहे.

राज्यात सन 2022 मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन 2023 मध्ये राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या 44 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांव्यतिरिक्त उर्वरित 41 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेले कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा विविध निकषांसाठी गुणांकन दिले जाणार आहे.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओ ग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी 1 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

अधिक माहितीसाठी नोंदणीकृत गणेश मंडळांनी संपर्क क्रमांक 8169882898, 022-243122956 / 022-24365990 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत ( सकाळी 10 ते सायंकाळी 6) अथवा स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0000

 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई

·       ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- राष्ट्रीय कार्यक्रम,  महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये. 

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...