Wednesday, March 20, 2024

वृत्त क्र. 259

 सकाळी सहा पूर्वी आणि रात्री 10 नंतर लाऊडस्पिकर्सचा आवाज नको

आदर्श आचारसंहितेचे पालन करा

नांदेडदि. 20 :- निवडणूक आचार संहिता काळामध्ये पहाटे सहा पूर्वी आणि रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर अर्थात भोंगे वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम १६ मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केलेल्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. निवडणुकीच्या कालावधीत ध्वनी प्रदूषणामुळे सर्वसामान्य लोकांची शांतता व स्वास्थ्यास बाधा होऊ नये. उशिरा रात्रीपर्यत ध्वनीक्षपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध आणण्यात आले आहेतअसे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.

मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) अन्‍वये अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध आदेश 16 मार्च रोजी निर्गमीत केले आहेत. या आदेशात ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावाध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारीसंबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील. हे सर्व आदेश 6 जून 2024 पर्यत लागू राहतील.

0000

वृत्त क्र. 258

 राजकीय पक्षउमेदवारांना निवडणूक खर्चासाठी नव्याने खाते उघडावे लागणार

·         बँकानी रोख रक्कम हस्तांतरणासाठी क्युआर कोड तयार करावेत

नांदेडदि. 20 :- निवडणूक आचारसंहितेमध्ये निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्ष/अपक्ष यांचे उमेदवारांना निवडणूक खर्चाचे नव्याने खाते उघडून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व राजकीय पक्षअपक्ष उमेदवारांनी निवडणूक खर्चासाठी नवीन खाते उघडून खर्च त्या खात्यातून करावा. उमेदवारांनी खर्च सादर करतांना भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार खर्च सादर करावाअसे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांसोबत बैठक संपन्न झालीयावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार मानेमनपाचे मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दनन पक्वानेजिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार आणि 25 बँकचे व्यवस्थापकअधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. सर्व राजकीय पक्षअपक्ष उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी लागणारा सर्व खर्च नव्याने उघडण्यात आलेल्या खात्यामधून करावा लागेल. उमेदवारांना खर्च सादर करतांना भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सादर करावा लागेलअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

तसेच कॅश व्हॅन सोबत असलेल्या आउटसोर्स एजन्सी कंपन्याच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित एजन्सीने जारी केलेले ओळखपत्रआदेश सोबत ठेवावेत. निवडणुका दरम्यान बँकाकडून रोख रक्कम हस्तांतरण करण्यासाठी सर्व बँकानी क्युआर कोड तयार करुनच रोख रक्कम हस्तांतरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व बँकानी व राजकीय पक्षउमेदवारांनी कार्यवाही करावीअसेही त्यांनी सांगितले.

00000

 वृत्त क्र. 257 

नांदेडमध्ये तपास यंत्रणाची तस्करीवर करडी नजर

44 लाखाची रोकड, 7 लाखाचे मद्य, 16 लाखाचे साहित्य जप्त

 

·         इडी, आयटी, आरटीओ,उत्पादन शुल्क, वन व अन्य विभागांकडून जप्ती सुरू

 

नांदेड दि. 20 : आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असून या यंत्रणांनी कोणाचीही हयगय न करता जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. जिल्ह्यात सायंकाळपर्यंत 44 लाखाची रोकड, 7 लाखाचे मद्य व 16 लाखाचे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

निवडणूक कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. पोलीस,अंमलबजावणी संचालनालय, इन्कम टॅक्स, परिवहन, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क,प्राप्तीकर, महसुल, अंमली पदार्थ नियंत्रण दल, सिमा सुरक्षा बल, अंमलबजावणी संचालनालय, परिवहन, डाक विभाग, नागरी उड्डयन विभाग विभागाचे अधिकारी उपस्थिती होते.

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या कालावधीसाठी ‘इलेकशन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम ॲपची निर्मिती आयोगाने केली आहे. निवडणूक काळात कुठलेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून यात सर्व सहभागी शासकीय यंत्रणा, पथके बारकाईने लक्ष ठेऊन कारवाई करतात. रोकड, अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ वा शस्त्र अशी कुठलीही जप्तीची कारवाई केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ती माहिती त्वरित या ॲपमध्ये समाविष्ट करावी लागणार आहे. त्यामुळे या कारवाईची माहिती लगेचच निवडणूक आयोगाला मिळणार आहे. तथापि, या यंत्रणेचा आणखी सक्रिय वापर करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले.

 

44 लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, 16 लाखाचे अन्य साहित्य आतापर्यंत जप्त करण्यात आले या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व सीमांवर ज्यांचे ज्यांचे तपासणी कक्ष आहेत त्या ठिकाणी काटेकोरपणे कारवाई करण्यात यावी, तपासणी दरम्यान ज्या यंत्रणेचे घटनास्थळावर पोहोचणे आवश्यक असेल त्यांनी तातडीने त्या ठिकाणी पोहोचावे यासंदर्भात नियुक्त फ्लाईंग स्क्वाडला माहिती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यामध्ये अवैध वाहतूक दारूची तस्करी आणि बेनामी रोकडीचे वहन होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी डोळ्यात तेल घालून काम करावे असे सक्त निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

 

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, मनपाचे मुख्य लेखाधिकारी डॉ. जनार्दन पक्वाने, आयटीचे संतोष निलेवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000








 वृत्त क्र. 256


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी

9 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या नियुक्त्या

 

नांदेड, दि. 20 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये जिल्ह्यातील 9 मतदारसंघात निवडणूक कामासाठी 9 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून केल्या आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी केल्या आहेत.  

 

नांदेड जिल्ह्यातील 15- हिंगोली लोकसभा मतदार संघातील (83-किनवट84-हदगाव विधानसभा मतदार संघ) व 16-नांदेड लोकसभा मतदार संघातील (85- भोकर86-नांदेड उत्तर97-नांदेड दक्षिण89-नायगाव90-देगलूर91- मुखेड विधानसभा मतदार संघ) तसेच 41-लातूर लोकसभा मतदार संघातील 88-लोहा विधानसभा मतदार संघ असे एकूण 9 विधानसभा मतदार संघामध्‍ये, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्‍या कामासाठी, 09 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियूक्‍ती झाली असून त्‍यापैकी 08 सहाय्यक निवडणूक अधिकारी हे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पदी कार्यरत असल्‍याने विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदसिध्‍द आहेत. उर्वरित (01)  86- नांदेड उत्‍तर मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) विभाग नांदेड ललितकुमार एस. वऱ्हाडे  यांना तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्‍या कामासाठी 09 विधानसभा मतदार संघातील सर्व  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्‍त केलेल्‍या सर्व स्‍थायी निगराणी पथक आणि फिरते पथक यांचे प्रमुखांना विधानसभा कार्यक्षेत्र हद्दीपावेतो 16 मार्च ते 6 जून 2024 या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नेमणूक करण्यात आली आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...