Friday, November 19, 2021

 नांदेड जिल्ह्यात 5 लाख 88 हजार व्यक्तीची मधुमेह चाचणी 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मधुमेह दिवसाचे औचित्य साधून नांदेड जिल्हृयात 5 लाख 88 हजार व्यक्तींची मधुमेह तपासणी करण्यात आली. त्यापैकी 12 हजार  999 व्यक्तींना मधुमेह असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर मोफत औषध उपचार करण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये दररोज मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. 

मधुमेह होण्याची कारणे आणि लक्षणे तसेच रूग्णांना मधुमेह होवू नये किंवा झाल्यास काय काळजी घ्यावी याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच मधुमेह सप्ताह दिनानिमित्त 30 वर्षावरील व्यक्तींनी मधुमेह तपासणी करून घ्यावी, असे आवाहन  शल्य चिकित्सक डॉ.निलकंठ भोसीकर यांनी केले.

00000

 नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 822 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 460 एवढी झाली असून यातील 87 हजार 779 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 28 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, उमरखेड 1 असे एकुण 3  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 28 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालयात 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 67 हजार 493

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 63 हजार 617

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 460

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 779

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-28

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...