Sunday, September 27, 2020

 

275 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

182 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 27 :- रविवार 27 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 275 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 182 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 106 बाधित आले. 

आजच्या एकुण 879 अहवालापैकी  642 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 15  हजार 72 एवढी झाली असून यातील 11  हजार 227 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 382 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 62 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.                                                                  

या अहवालात एकुण चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शनिवार 26 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी परिसरातील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, चैतन्यनगर नांदेड येथील 56 वर्षाच्या एका पुरुषाचा, विणकर कॉलनी नांदेड येथील 62 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तर रविवार 27 सप्टेंबर रोजी भोकर तालुक्यातील पाळज येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 390 झाली आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड 23, बिलोली कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर 3, मुखेड कोविड केअर सेंटर 17, भोकर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड 19, किनवट कोविड केअर सेंटर 30, माहूर कोविड केअर सेंटर 10, नायगाव कोविड केअर सेंटर 8, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 115, हदगाव कोविड केअर सेंटर 8 असे 275 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 46, लोहा तालुक्यात  1, किनवट तालुक्यात  4, कंधार तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, लातूर 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव तालुक्यात  3, उमरी तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 4, परभणी 3, हिंगोली 3 असे एकुण 76 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 52,  हदगाव तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 5, किनवट तालुक्यात 8, भोकर तालुक्यात  2, माहूर तालुक्यात  3, उमरी तालुक्यात 4, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड तालुक्यात 2, लोहा तालुक्यात 6, मुखेड तालुक्यात 7, नायगाव तालुक्यात 6, कंधार तालुक्यात 6, हिंगोली 2असे एकूण 106 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 382 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 296, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 721, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 95, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 64,  आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 26, नायगाव कोविड केअर सेंटर 67, बिलोली कोविड केअर सेंटर 28, मुखेड कोविड केअर सेंटर 134, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केअर सेंटर 75, लोहा कोविड केअर सेंटर 46, हदगाव कोविड केअर सेंटर 32, भोकर कोविड केअर सेंटर 32, कंधार कोविड केअर सेंटर 29, बारड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 113, मुदखेड कोविड केअर सेटर 46,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 16, किनवट कोविड केअर सेंटर येथे 102, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 58, उमरी कोविड केअर सेंटर 61, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 24,  खाजगी रुग्णालयात 297 बाधित, हैद्राबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद 2, निजामाबाद 1, लातूर 2, अकोला 1, आदिलाबाद येथे संदर्भित 1 झाले आहे.   

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 80 हजार 474,

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 60 हजार 302,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 15 हजार 72,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 11 हजार 227,

एकूण मृत्यू संख्या- 390,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 76.84 टक्के.

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 11,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 726,                     

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 382,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 62. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले

त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारलाही साकडे घालू

-         कृषि मंत्री दादाजी भुसे

 

नांदेड (जिमाका) दि. 27:-  मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. मी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही संवाद साधतो आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती केंद्र सरकारच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले. नांदेड तालुक्यातील कासारखेडा या गावातील शिवारांची त्यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.   

 

पूरभाजी तुकाराम शिंदे या शेतकऱ्याने कृषि मंत्र्यांचे लक्ष वेधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यांनी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबिन हातचे गेले आहे. शिंदे व इतर शेतकऱ्यांना कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी धीर देत जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल याबाबत दक्षता घेण्याचे आदेश कृषि विभागाला दिले.

 

परभणी,‍ हिंगोली आणि आता नांदेड येथील अतिवृष्टीच्या भागात मी पाहणी करत असून लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. शासनस्तरावरुन याबाबत आम्ही योग्य तो विचार करत असून केंद्र सरकारला लवकरच याबाबत आहे ती वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

00000

 





  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...