प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Friday, July 9, 2021
नांदेड जिल्ह्यात 15 व्यक्ती कोरोना बाधित तर 12 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 880 अहवालापैकी 15 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 तर अँटिजेन तपासणीद्वारे 7 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 320 एवढी झाली असून यातील 88 हजार 753 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 63 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, धर्माबाद तालुक्यांतर्गत 1, मुखेड 1, देगलूर 1, किनवट 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, मुदखेड 2, हदगाव 1, कंधार 1 असे एकूण 15 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 12 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 10 तर खाजगी रुग्णालयातील 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 63 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 10, किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 24, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 138 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 25 हजार 667
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 22 हजार 596
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91
हजार 320
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 753
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-75
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-63
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1
00000
जिल्ह्यातील 59 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण
नांदेड
(जिमाका) दि. 9 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 59 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे
लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44
वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा
डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 10 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध
असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा
क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात कोविशील्ड लसीचे 100 डोस,
स्त्री रुग्णालय कोविशील्ड लसीचे 80 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा
रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक
महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा,
श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली,
तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे
हॉस्पिटल येथे 60 डोस, स्त्री रुग्णालयात 40 डोस उपलब्ध आहेत.
शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे
आहेत. ग्रामीण रुग्णालय बिलोली, मुदखेड या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100
डोस, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 50 डोस, उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, देगलूर,
हदगाव, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी,
माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी
100 डोस उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील 20 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100
डोस तर 7 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन
दिले आहेत.
वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना
कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण
केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
जिल्ह्यात 8 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 66 हजार 592 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात
आले. तर 9 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे.
कोविशिल्डचे 5 लाख 31 हजार 830 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 11 हजार 190
डोस प्राप्त झाले आहेत.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे
त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये
कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला
व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल.
मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात
येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा
उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या
उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
00000
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास
कार्यक्रमांतर्गत
नांदेड जिल्ह्यातील 600 युवकांना
मिळणार प्रशिक्षण
नांदेड (जिमाका) दि.9
:- कोविड-19 मुळे वैद्यकीय क्षेत्रात विविध मनुष्यबळाची निर्माण
झालेली गरज लक्षात घेवून आवश्यक असलेली तंत्र कुशलता इच्छूक विद्यार्थ्यांना
मिळावी यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम हाती
घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते
आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय
शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य
सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा,
कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्य
सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास,
वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, विभागीय
आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा
परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयांचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच
प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थी उमेदवार उपस्थित होते.
हे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास
रोजगार व उद्योजगता विभागातर्गंत महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी
क्षेत्रातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांचा प्रशिक्षण केंद्र म्हणून समावेश करण्यात आला
आहे. यानुसार नांदेड जिल्ह्यात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याच बरोबर एसजीजीएस
स्मारक शासकीय रुग्णालय नांदेड, शासकीय महिला रुग्णालय शामनगर नांदेड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड आणि क्रिसेंट ब्लड सेंटर येथे हे
प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक केंद्रावर वेगवेगळया विषयाचे प्रशिक्षण
पुढीलप्रमाणे आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय
विष्णुपूरी नांदेड येथे 12 विज्ञान
शाखेसाठी एमरजंसी मेडीकल टेक्निशीएन बेसीक, फ्लेबोटॉमीस्ट मेडिकल,
रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन 8 वी उत्तीर्ण युवकांसाठी जनरल ड्यूटी असिस्टंटõ, होम हेल्थ एड÷, एसजीजीएस स्मारक शासकीय
रूग्णालय येथे 12 विज्ञान युवकांसाठी सेंन्ट्रल
स्ट्राइल सर्व्हिस डिपार्टमेंट असिस्टंट, हॉस्पीटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, मेडिकल
रिकॉर्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन तसेच आयटीआय / डीप्लोमा क्षेत्राशी मेडिकल
इक्युपमेंट टेक्नालॉजी असिस्टंट. शासकीय महिला रूग्णालय श्यामनगर नांदेड 12 वी फ्लेबोटॉमीस्ट, 12 विज्ञानसाठी मेडिकल रिकॉर्ड ॲन्ड हेल्थ इंन्फॉरमेशन टेक्निशिअन, 10 वीसाठी जनरल ड्यूटी असिस्टंट-ॲडव्हॉन्स, सॅनेटरी हेल्थ ॲड,
ड्रेसर (मेडीकल), 8 वीसाठी
जनरल ड्यूटी असिस्टंट तर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय
वजिराबाद येथे 12 वी साठी योगा वेलनेस ट्रेनरú, योगा थेरपी असिस्टंट,
पंचकर्मा टेक्निशियन, 10 वीच्या
युवकांसाठी क्षारा कर्मा टेक्निशियन, कूपिंग थेरपी असिस्टंट, आयुर्वेदा आहार ॲन्ड पोशक
सहायक, 8 वीच्या युवकांसाठी असिस्टंट योगा
इंन्स्ट्रक्टर, बीएएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदा डायटीशीयन तर द क्रिसेंट ब्लड
सेंटर येथे 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी
जनरल डयुटी असिटंट (ॲडव्हान्स) या
अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण होणार आहे.
नांदेड
येथून या कार्यक्रमास डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयचे
डॉ. पी. टी. जमदाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ.
आय. एफ. ईनामदार, जिल्हा माहिती अधिकारी
विनोद रापतवार, शासकीय आर्युवेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, डॉ. शितल चव्हाण तसेच संबंधित सर्व कोर्सेसचे प्राध्यापक व सहायक प्राध्यापक, कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता,
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार, गौरव इंगोले, जिल्हा
कौशल्य विकास समन्वयक इरफान खान, राहुल गजभारे, विरेंद्र चव्हाण, रजाक सय्यद हे उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील
इच्छूक पात्र युवक-युवतीनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा 02462-251674 या दूरध्वनीवर
कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी
केले आहे.
0000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...