Tuesday, November 26, 2019


जिल्हाधिकारी कार्यालयात
संविधान दिन साजरा  

            नांदेड, दि. 26:- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक कक्षात दिनांक 26 नोव्हेंबर, संविधाननिमित्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून परिशिष्ट -1 उद्देशिकेचे वाचन करुन घेतले. तसेच अव्वल कारकून प्रकाश कांबळे यांनी संविधान विषयावर मनोगत व्यक्त केले . तसेच कार्यक्रमाच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
0000


माहे ऑक्‍टोबर, 2019 मधील पावसामुळे झालेल्या
शेतीपिकांच्‍या नुकसान बाधित शेतकऱ्यांना
पहिल्‍या टप्‍यातील अनुदानाचे 90 टक्‍के वाटप

            नांदेड, दि. 26:- माहे ऑक्‍टोबर 2019 मधील पावसामुळेझालेल्या पिकांच्‍या नुकसानी बाबत33 % किंवा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना शासनाने दिनांक 18 नोव्हेंबर, 2019 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये मदत निधी जाहीर केला आहे. ज्‍यानुसार शेती पिकांच्‍या नुकसानीसाठी हेक्‍टरी रुपये 8 हजार  व बहुवार्षीक /फळपिक नुकसानीसाठी हेक्‍टरी रु.18 हजार दराने दोन हेक्‍टरच्‍या मर्यादेत रक्‍कम अनुज्ञेय आहे. सदर मदत निधीच्‍या पहिला टप्‍यात नांदेड जिल्‍ह्यास एकूण रु.123,14,23,000/- इतका निधी प्राप्त झाला आहे. सदरचा निधी जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यांना वितरीत करण्‍यात आला असुन आजपर्यंत 90.01 टक्‍के निधीचे बाधित शेतकरी यांना खालील प्रमाणे वाटप करण्‍यात आले आहे.  

अ.क्र.
तालुका
पहिला टप्‍पा
वितरीत निधी
पहिला टप्‍पयातील शेतक-यांची संख्‍या
शेतक-यांना वितरीत निधी (रूपये)
टक्‍केवारी
1
देगलूर
83,801,014
11,180
83,801,014
100.00
2
बिलोली
63,789,354
10,872
63,789,354
100.00
3
भोकर
76,632,339
9,250
76,632,339
100.00
4
उमरी
54,083,271
6,630
54,083,271
100.00
5
किनवट
83,977,850
13,206
83,967,475
99.99
6
अर्धापूर
49,137,196
8,189
49,123,716
99.97
7
हदगांव
125,340,075
15,690
125,194,097
99.88
8
माहूर
41,610,476
5,951
41,505,334
99.75
9
नांदेड
54,836,769
7,942
54,566,000
99.51
10
कंधार
122,619,515
16,755
121,967,199
99.47
11
नायगांव
87,230,862
12,023
85,478,080
97.99
12
धर्माबाद
46,754,763
4,943
37,736,640
80.71
13
मुदखेड
31,877,188
3,701
25,608,320
80.33
14
हि.नगर
66,857,756
5,628
50,398,030
75.38
15
लोहा
117,061,800
10,772
84,177,804
71.91
16
मुखेड
125,812,772
13,099
86,714,717
68.92
एकूण
1,231,423,000
153,812
1,108,394,750
90.01

            प्रकरणात माहे ऑक्‍टोबर 2019 मधील पावसामुळे झालेल्या पिकांच्‍या नुकसानीबाबत 33 % किंवा अधिक नुकसान झालेल्या शिल्‍लक बाधित शेतक-यांना पुढील टप्‍प्‍यात प्राप्‍त होणारी रक्‍कम तात्‍काळ वितरीत करण्‍यासाठी अशा शेतकऱ्यांच्‍या याद्या तात्‍काळ तयार ठेवण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सर्व तहसिलदार जि. नांदेड यांना दिल्‍या आहेत.  
00000


लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 26 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 2 डिसेंबर 2019 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे.
यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000





जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा

नांदेड, दि.26:- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित संविधानातील उददेशिकेचे सामुहिक वाचन,संविधान त्यासंबंधीत वाचन साहित्याचे ग्रंथाचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आलेले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन संविधान उददेशिकेच्या फलकाचे अनावरन विधी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. विकास खाकरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्याक्रमास विधी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.राजीव वाघमारे सर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ..ढोक , श्री प्रताप सुर्यवंशी   विद्यार्थी सभासद वाचकवर्ग  उपस्थीत होते. या कार्यक्रमा दरम्यान श्री खाकरे यांनी उपस्थितांना संविधान उददेशिकेचे महत्व विषद करुन मार्गदर्शन केले. तसेच 26/11 या भ्याड आंतकवादी हल्यामध्ये शहीद जवानाकरिता दोन मिनीट मौन पाळुन श्रध्दांजली देखील वाहीली. 
         या ग्रंथ प्रदर्शनामध्ये इंग्रजी मराठी भाषेमधील संविधानाच्या प्रती तसेच संविधाननिर्मीती कालावधीत त्यावर झालेले डीबेटस् याबददलची महत्वाची माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...