Tuesday, October 20, 2020

 

तात्पुरते फटाका परवाना अर्ज

विक्री व स्विकारण्यास मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- सन 2020 मध्‍ये दिपावली उत्‍सव 14 ते 16 नोव्‍हेंबर 2020  या कालावधीत साजरा होणार आहे. त्‍याअनुषंगाने तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीस मंगळवार 27 ऑक्‍टोंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे. 

नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार 7 ते  20  ऑक्‍टोंबर 2020 या कालावधीत विक्री व स्विकारण्याची मुदत देण्यात आली होती. परंतू तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍याच्‍या कालावधीची मुदतवाढ आता 27 ऑक्‍टोंबर पर्यंत देण्‍यात आली आहे. याव्‍यतीरिक्‍त 6 ऑक्‍टोंबर 2020 रोजी दिलेल्या जाहीर प्रगटनातील अटी व शर्ती कायम राहतील. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

0000

 

 

 

171 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

111 बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मंगळवार 20 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 171 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 111 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 20 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 91 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 154अहवालापैकी 1 हजार 28 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 291 एवढी झाली असून यातील  16  हजार 301 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 381 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात दोघाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सोमवार 19 ऑक्टोंबर रोजी नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील 55 वर्षाचा एका पुरुषाचा तर उमरी तालुक्यातील सावरगाव कला येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 490 झाली आहे.  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 10, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 5, उमरी कोविड केंअर सेंटर 23, किनवट कोविड केंअर सेंटर 12, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 7, मुदखेड कोविड केंअर सेंटर 6, मुखेड कोविड केंअर सेंटर 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, बिलोली कोविड केंअर सेंटर 14, भोकर कोविड केंअर सेंटर 5, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 55, हदगाव कोविड केंअर सेंटर 5, लोहा कोविड केंअर सेंटर 3, खाजगी रुग्णालय 17 असे 171 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.18 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 8, हदगाव तालुक्यात 1, उमरी 3, मुखेड 2, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1, नायगाव 1, कंधार 1, हिंगोली 1 असे एकुण 20 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 66, लोहा तालुक्यात 1,  हदगाव 2, उमरी 5, कंधार 3, बिलोली 2, नांदेड ग्रामीण 5, किनवट 1, देगलूर 2, धर्माबाद 1, मुखेड 1, हिंगोली 2 असे एकूण 91 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 381 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 166, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 796, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 44, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 40, हदगाव कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 14, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 8,  मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 7, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, बारड कोविड केअर सेंटर 2, मुदखेड कोविड केअर सेटर 4, माहूर कोविड केअर सेंटर 19, किनवट कोविड केअर सेंटर येथे 24, धर्माबाद कोविड केअर सेंटर 14, उमरी कोविड केअर सेंटर 11, कंधार कोविड केअर सेंटर येथे 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 14, भोकर कोविड केअर सेंटर 17, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 131, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्रबाद येथे संदर्भीत 2 झाले आहेत. 

मंगळवार 20 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 78, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 86 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 644,

निगेटिव्ह स्वॅब- 79 हजार 006,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 291,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 16 हजार 301,

एकूण मृत्यू संख्या- 490,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.18

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 479, 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 381,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 45.  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

0000

 

 

 जवान गणेश पिराजी चव्हाण यांना

कुरुळा ग्रामस्थांचा अखेरचा निरोप 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- कंधार तालुक्यातील कुरुळा येथील बीएसएफचे जवान गणेश पिराजी चव्हाण हे मेघालय येथे सेवा बजावत होते. मागील काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आजारातून ते सावरु न शकल्याने 18 ऑक्टोंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे शव मेघालय येथून हैद्राबाद येथे व हैद्राबाद येथून ते आज कुरुळा या गावी पोहचले. कुरुळा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना आज साश्रृनयनाने निरोप दिला. त्यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्याने मातृभूमिच्यासेवेत तैनात असलेला एक जवान आपण गमविला आहे या शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात मी सहभागी  आहे, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. शासनाच्यावतीने कंधारचे उपविभागीय दंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसिलदार विजय चव्हाण यांनी जवानाच्या पार्थीवाला पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मास्क व इतर सुरक्षितता घेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी दिली.

00000




 

 

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्‍या मतदार यादीतील

दिव्‍यांग मतदार व 80 वर्षापेक्षा जास्‍त वय असलेल्‍या

मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार आगामी होणाऱ्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक- 2020 या  निवडणूकीच्‍या अनुषंगाने नांदेड जिल्‍हयातील पदवीधर मतदार संघाच्‍या मतदार यादीतील दिव्‍यांग मतदार व 80 वर्षापेक्षा जास्‍त वय असलेल्‍या मतदारांना सदर निवडणूकीत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करावयाचे आहे. या मतदारांनी आपली माहिती संबंधित बीएलओ यांना द्यावी अथवा संबंधित तहसिलदार यांच्या कार्यालयशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 05 पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 नांदेड यांनी केले आहे. 

त्‍याअनुषंगाने नांदेड जिल्‍हयातील पदवीधर मतदार संघाच्‍या मतदार यादीतील मतदारांना बीएलओ (मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी) मार्फत प्रत्‍यक्ष भेटी देऊन दिव्‍यांग मतदार तसेच 80 वर्षपेक्षा जास्‍त वय असलेले मतदार यांची माहिती संकलीत करण्‍यात येत आहे. जेणेकरुन टपाली मतदानाचे प्रमाण वाढुन मतदानाचे टक्‍केवारीत वाढ होईल. 

निवडणूकीचे जिल्‍हयातील मतदानाचे प्रमाण वाढविण्‍याच्‍या अनुषंगाने  पदवीधर मतदार संघाच्‍या मतदार यादीतील दिव्‍यांग मतदार व 80 वर्षापेक्षा जास्‍त वय असलेल्‍या मतदारांनी आपली माहिती संबंधित बीएलओ यांना द्यावी अथवा संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी 05 पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 नांदेड यांनी केले आहे.

0000

 

केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश

नांदेड (जिमाका) दि. 20 :- केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर अस केळी पिक संरक्षणसाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश दिला आहे. केळी पिकावरील ठिपके आढळ आल्यास रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढ टाकावे बागेबाहेर आणुन ष्ट  करावा. बागेत वाळलेली पाने झाडावर लटकणारी काढ टाकावेत. केळीची बाग स्वच्छ तणविरहीत ठेवावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी  आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

0000

 

आपणच आपली होऊ यात दुर्गा !

-         सहशिक्षिका अपर्णा जाधव लाडेकर 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- आम्हा शिक्षकांसाठी शाळेची घंटा हीच प्रार्थनेची घंटा आणि विद्यार्थी हे दैवत. कोरोनामुळे मागील आठ महिन्यापासून आमची प्रार्थना थांबली आहे. आठवडयातील काही दिवस आम्ही शाळेत जावून शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे सुरु ठेवली आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी आम्ही आता सारे काही शिकून घेतले आहे. ऑनलाईन वर्गामध्ये एखादी दुर्गा जेव्हा, ‘मॅडम शाळा केव्हा सुरु होते’ ? असा प्रश्न विचारते तेंव्हा गलबलून व्हायला होते. हा काळ आपणच आपली दुर्गा होण्याचा आहे, या शब्दात सहशिक्षिका अपर्णा जाधव यांनी आपल्या भावनांना वाहते केले. त्या येथील शिवाजी प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहे.  

आठवडयातील काही दिवस गर्दीतून वाट करीत शाळेत पोहचावे लागते. शाळेत असलेल्या 82 विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संपर्कात असल्याशिवाय आमचे भागत नाही. काही विद्यार्थीनी घरी येण्याचा खूप हट्ट धरतात. शक्य तेंव्हा जमेल तसे त्यांच्या घरी जावून त्याची समजूतही काढावी लागते. त्यांच्याकडून दिलेल्या अभ्यासक्रमांची होमवर्कही पाहीले म्हणजे पुन्हा हे विद्यार्थी तेवढयाच जोमाने घरी बसून अभ्यासाकडे वळतात असा अनुभवही त्यांनी मोकळेपणाने सांगितला.

 

माझ्या घरी छोटी मुलगी व परिवार आहे. सारे काही सर्वांची काळजी घेवून करावे लागते. शासनाने वेळोवेळी आरोग्याबाबतचे जे निर्देश दिले आहेत त्यांचे काटेकोर पालन आजवर आम्ही करत आलो आहोत. सतत मास्क चेहऱ्यावर ठेवणे, वेळोवेळी हात धुवणे, हात धुवायला जिथे जागा नसेल तिथे सॅनिटायझर वापरणे, कारण नसताना बाहेर न जाणे, सुरक्षित अंतर ठेवणे यामुळे आम्ही सर्व सुरक्षित झालो आहोत. माझे कुटूंब 82 विद्यार्थ्यांसह असल्याने माझी अधिक जबाबदारी असल्याचेही अपर्णा जाधव यांनी सांगून सर्वांच्या आरोग्याचा दृढसंकल्प जाहिर करीत त्या माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या दूत झाल्या.

00000




 

 

 

 

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...