Sunday, August 14, 2022

 राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

 

          मुंबईदि. 14:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

          त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासननगर विकासमाहिती व तंत्रज्ञानमाहिती व जनसंपर्कसार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प)परिवहनपणनसामाजिक न्याय व विशेष सहाय्यमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापनमृद व जलसंधारणपर्यावरण व वातावरणीय बदलअल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहवित्त व नियोजनविधी व न्यायजलसंपदा व लाभक्षेत्र विकासगृहनिर्माणऊर्जाराजशिष्टाचार ही खाती असतील.

 राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

 

सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील - महसूलपशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार-वनेसांस्कृतिक कार्यव मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षणवस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राजवैद्यकीय शिक्षणक्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे-कामगार

 संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

 उदय सामंत-उद्योग,

प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण -सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार-कृषी

दीपक केसरकर-शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे- सहकारइतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- पर्यटनकौशल्य विकास व  उद्योजकतामहिला व बालविकास

००००००

स्वातंत्र्य दिन मुख्य समारंभात जिल्हाधिकारी

डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजवंदन 

नांदेड (जिमाका) दि. 14  :- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त सोमवार 15 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9.05 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. 

सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या दृष्टीने इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

00000


 फाळणीतील वेदना अधोरेखित

करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

 

·  15 ऑगस्टपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- देशाच्या फाळणीमुळे लाखो लोकांनी झेललेले दु:खयातना या न विसरता येणाऱ्या आहेत. अनेकांनी यात बलिदान दिले. त्या ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ आज 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्यात आला. फाळणीतील महत्वपूर्ण घटनांचे छायाचित्र व त्यासंदर्भातील माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या उद्देशाने खास तयार करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ आज करण्यात आला.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरस्वातंत्र्य सैनिकांच्या वारसपत्नी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनीचे प्रातिनिधीक उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळेमनपा आयुक्त डॉ. सुनिल लहानेनिवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णीउपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळेउपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरीउपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळेउपविभागीय अधिकारी विकास मानेजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले आदी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस पत्नी सुमन त्रिंबकराव कुलकर्णीसिंधुबाई गगनराव देशमूखकस्तुराबाई श्रीकिशन पारीखयमुनाबाई मारोती कुरुडेसुंदराबाई मारोतराव देशमुखप्रभावती दत्तात्रय टेळकीकरसाधनाबाई रामराव पांडेकुमुदिनी राहेगावकरप्रेमलाबाई रामराव अंबुलगेकर यांना शाल श्रीफळ देवून गौरव केला. हे प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000


 








 नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न 

·   5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली

·8 कोटी 82 लाख 19 हजार 691 रक्कमेतील विविध प्रकरणात तडजोड    


नांदेड (जिमाका) दि. 14  :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात एकुण   5 हजार 455 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 8 कोटी 82 लाख 19 हजार 691 एवढ्या रक्कमेबाबत विविध प्रकरणात तडजोड झाली.  

 

या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये इंदिराबाई वय 100 वर्ष यांचे तीन पिढींपासून वाटणी संबंधी प्रलंबीत असलेल्या दाव्यात आपसी सामोपचाराने समझोता होवून सदर प्रकरणाचा निराकरण करण्यात आला. हा दावा श्रीमती के.पी. जैन, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड यांच्या पॅनलवर ठेवण्यात आला होता. त्यात त्यांनी संबंधीतांचा समझोता घडवून आणून प्रकरण निकाली काढले.

 

विविध प्रकरणात दिवाणी, फौजदारी, एन.आय. अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन व इतर तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, ग्राहक तक्रार मंच यांच्या प्रकरणांचा व महसूल विभागाचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्रकरणे व रमाई आवास योजना अंतर्गत प्रकरणे, विविध बँकांचे प्रकरणे, एम.एस.ई.बी. विद्युत प्रकरणे, बी.एस.एन.एल. यांचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष श्रीकांत ल. आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्रीमती डी.एम. जज यांनी विशेष प्रयत्न केले.

 

ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, तसेच पॅनलवरील न्यायाधीश व वकील सदस्य, तसेच पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे सुध्दा त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहीमेअतंर्गत 1 हजार 819 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, विविध बॅंकांचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव  श्रीमती डी. एम. जज, तसेच सर्व न्यायाधीश, विधीज्ञ, सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले. विशेष म्हणजे सदर लोकअदालतमध्ये सहभागी पक्षकार, विधीज्ञ, न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी इत्यादीसाठी गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील बाबा बलविंदर सिंहजी यांच्याकडून लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीमती डी. एम. जज यांनी लंगर साहिब गुरुद्वारा व राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी ज्यांनीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. यापुढेही असेच सहकार्य सर्वांकडून मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

00000

 मंत्री संजय राठोड यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजय राठोड हे 15 व 16 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.

 

सोमवार 15 ऑगस्ट 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पहूर येथून सांय. 7.30 वा. बोथतांडा ता. किनवट येथे आगमन व मुक्काम (राखीव). मंगळवार 16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 वा. बोथतांडा येथून शासकीय वाहनाने यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...