Friday, December 10, 2021

नांदेड जिल्ह्यात 3 कोरोना बाधित झाले बरे तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 851 अहवालापैकी एकही अहवाल कोरोना बाधित आला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 502 एवढी झाली असून यातील 87 हजार 832 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून एका बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील भोक्रम्बा येथील 86 वर्षाच्या पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आज जिल्ह्यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 3  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.   

आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 3 अशा एकूण 15 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 83 हजार 917

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 79 हजार 917

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 502

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 832

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000


 उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाविद्यालयीन व विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या शिष्यवृत्ती नुतनीकरणाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्डवरील माहिती अद्यायावत केली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 29 नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची सुविधा एनएसपी पोर्टलवर देण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास केंद्र शासनाकडून 15 डिसेंबर 2021 पर्यत अंतीम मुदतवाढ दिली आहे. तर महाविद्यालयांनी अर्जाची ऑनलाईन पडताळणी करण्यास अंतीम मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचे एनएसपी पोर्टलवरील अर्ज महाविद्यालयांनी आवश्यक असलेल्या कागदपत्राची तपासणी करुन अर्जावर विनाविलंब कार्यवाही करावी, असे  आवाहन उच्च शिक्षण नांदेड विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी ग. वा. पाटील यांनी केले आहे. 

केंद्रशासन  पुरस्कृत  अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोष्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना,  महाविद्यालयीन व विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक  शिष्यवृत्ती योजना या तीन योजना ऑनलाईन पध्दतीने सन 2021-22  साठी राबविण्यात येत आहे. नांदेड विभागांतर्गत स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या  जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यावसायिक महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात एनएसपी पोर्टलद्वारे केंद्रशासन  पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनांची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येते, अशी माहिती उच्च शिक्षण विभागाने दिली आहे.

00000

 राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार 11 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीकांत आणेकर व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व न्यायाधीश राजेंद्र रोटे यांनी केले आहे. 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बॅंकांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असलेली आदी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय या लोकअदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येण्याबाबतची दाखल पूर्व प्रकरणे तसेच विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.  या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीकांत ल. आणेकर व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश राजेंद्र एस. रोटे यांनी केले आहे.

00000

युवक-युवतींसाठी रोजगारांची संधी

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्रातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी 12 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत इंडिया@75 मिशन आपुलकी व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये इच्छूक युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पुढील स्टेप्स वापरावे rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन नोकरी साधकाने जॉब सिकर (Job Seeker) नोंदणी करावी. त्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्हा निवडून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे. व्हॅकन्सी लिस्टींग Vacancy Listing हा पर्याय निवडून पात्रतेनुसार इच्छुक पदासाठी अर्ज करावे. काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक (02462)-251674 किंवा या कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

 

 

विशेष लेख -

दृष्टी गमावण्याच्या काठावर असलेल्यांना दृष्टी देण्याची किमया !

नांदेड जिल्हा सोळा तालुक्यात विस्तारलेला असून आकाराने तेवढाच मोठा आहे. जिल्ह्यास तेलंगना आणि कर्नाटक राज्याच्या सिमा लागून आहेत. अशा या विस्तीर्ण नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा हा काळ शासन व प्रशासनासाठी आव्हानात्मक होता. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाला अनेक निर्णय घ्यावे लागले. जिल्हा प्रशासनाने शासनाच्या या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करुन कोरोना साथीला आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आरोग्य सेवेसाठी तर हा काळ कस लावणारा होता. याकाळात प्रशासनात सर्वात जास्त ताण आरोग्य विभागावर पडला. जिल्ह्यात अनेक रुग्णांलयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करुन 90 हजार 502 रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन आतापर्यत 87 हजार 829 बाधितांना घरी पाठविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. जिल्ह्यात 7 लाख 83 हजार 66 बाधिताचे स्वॅब तपासणी करण्यात येवून उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के एवढे आहे. अतिगंभीर असलेल्या 2 हजार 654 कोरोना बाधितांनी जीव गमावला आहे.

दीड वर्षाच्या काळात कोरोना संसर्गासोबतच इतर आजारावरही उपचार सुरुच होते. जिल्ह्यातील आरोग्य विभाग कोरोना व्यतिरिक्त इतर सेवा-सुविधा देण्यात तसुभरही कमी पडले नाही. मानवी आरोग्यात डोळयाचे अन्यन साधारण महत्व आहे. इतर आजाराच्या मानाने डोळयाचे आजार व समस्या या अधिक नाजूक व गंभीर असतात. दुर्लक्ष करुन चालत नाही. वेळीच उपचार नाही केले तर कायमचा अधुंकपणा येण्याची शक्यता असते. अशावेळी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र चिकित्सा विभागातील सर्व डॉक्टर व नर्सच्या टीमने दृष्टी गमावण्याच्या काठावर असलेल्यां अनेक रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले. कोरोना कोरोना कालावधीत नेत्रविकार आणि विशेषत: मोतीबिंदू शस्त्रक्रियावरही भर देण्यात आला. अनेक नेत्रविकार रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करुन घरी पाठविले.

जिल्हा नेत्र चिकित्सा विभागाच्यावतीने शासकीय सेवेच्या पलिकडे जावून डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी टीमवर्क ने कार्य केले.  या विभागात 5 नेत्र सर्जन व 5 नर्स कार्यरत असा स्टाफ कार्यरत आहेत. कोरोनाची पहिली लाट कमी झाल्यानंतर माहे जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 1 हजार 182 शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या. तसेच दुसरी लाट ओसरल्यानंतर एप्रिल 2021 ते ऑक्टोंबर 2021 या कालावधीत 730 शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  कोरोनाचा कहर जास्त असलेल्या कालावधीत शस्त्रक्रीया करणे थांबवले होते. डोळयावरील प्राथमिक उपचार ओपीडीत करणे सुरु होते. ओपीडीत रुग्णांवर स्क्रिनींग उपचार करण्यात येत होते. कारण मोतीबिंदू अधिक दिवस राहीला तर त्यांचे काचबिंदुत रुपांतर होवून दृष्टी कायमस्वरुपी गमावण्याचा धोका असतो. त्यामूळे कोरोना कालावधीत ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक होती. त्या रुग्णांना स्क्रिंनीग उपचार करण्यात आले. त्यामूळे शस्त्रक्रियेस विलंब झाला तरी डोळयाना काहीही धोका होत नाही असे नेत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिरसीकर यांनी सांगितले. या सर्व टीमने रुग्णांवर उपचार करताना रुग्णांची खुप काळजी घेतली.

शस्त्रक्रियेसाठी दाखल केल्यानंतर रुग्णांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणेवेळोवेळी सॅनिटायझर करणेसोशल डिस्टन्स पाळणे या सर्व बाबी करण्यासाठी वेळप्रसंगी त्यांना कठोर वागावे लागले. यासोबतच लसीकरण करण्यावर जास्त भर देण्यात आला. रुग्णांचे लसीकरण केल्यानंतर डोळ्यांवर शस्त्रक्रीया करण्यात आली. माहे ऑक्टोंबर मध्ये एका रुग्णांवर बुबुळ प्रत्यारोपन शस्त्रक्रीयाही करुन एका दृष्टीहिनाला दृष्टी देण्याचे काम करण्यात आले. तर या कालावधीत शाळेतील 145 विद्यार्थ्यांच्या डोळयाची तपासणी करुन शालेय विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले. 

रुग्णांवर उपचार करताना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य साक्षरता व लसीकरणासाठी समुपदेशन करण्यात आले. याचबरोबर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर देण्यात आला. आरोग्य विभागाने जिल्ह्याबरोबर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ञाच्या माध्यमातून मोतीबिंदु शस्त्रक्रीया व डोळयावर उपचार सुरु होते. यासाठी मागील वर्षात त्रिसुत्रीचा वापर करुन जिल्ह्यात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिनता कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. नेत्रदान व डोळ्याच्या उपचारासाठी  नेत्रदान पंधरवडादृष्टिदान दिन कार्यक्रमाचे आयोजनकाचबिंदु जनजागृती आठवडा अभियान राबविले. जेणेकरून नागरिकांमध्ये नेत्रदानाचे महत्व वाढवून गरजूंना दृष्टी देण्याची किमया साधता येईल.

अलका पाटील,

माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालयनांदेड

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...