Monday, December 16, 2024

 वृत्त क्र. 1201

"अल्पसंख्याक हक्क दिवस" 

बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड दि. 16 डिसेंबर :- अल्पसंख्याक हक्क दिवसा निमित्ताने अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने बुधवार 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात व्याख्याता म्हणून सेवानिवृत सहसचिव अॅड. देविंदरसिंघ निर्मले व नांदेड सामाजिक विज्ञान नारायणा ई-टेक्नो स्कुलचे विभाग प्रमुख इरशाद अहमद हे संबोधित करणार आहेत. अल्पसंख्यांक समाजातील नागरीकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केला आहे. 

संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तुत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येकवर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्हा प्रशासनाच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिवस" म्हणून राबविण्यात येतो. 

अल्पसंख्याक विकास विभाग परिपत्रक क्र. अविवि' 2022/प्र.क्र.51/का-8 दि.16.12.2024 नुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कंची जाणीव / माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे सूचना प्राप्त आहेत.

0000

 

 वृत्त क्र. 1200 

एकलव्य निवासी इंग्रजी शाळेसाठी

23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्व परीक्षा  

 

नांदेड दि. 16 डिसेंबर :- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशाकरीता रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेचा लाभ सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी, सहावी, सातवी व आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या अनुसूचित आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीमती कावली मेघना यांनी केले आहे.

 

किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती कावली मेघना यांच्या कार्यालयाने त्यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये हे आवाहन करण्यात आले आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिकणारी मुले या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

 

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत सदर प्रवेश स्पर्धा परीक्षा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोधडी येथे होणार आहे. एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल सहस्त्रकुंड ता. किनवट यांच्याकडे यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. पूर्ण भरलेले अर्ज 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुख्याध्यापक आश्रमशाळा बोधडी येथे सादर करण्याचे आवाहन केले आहे.

00000  

जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा

 जिल्ह्यात वंधत्व व उशिरा गर्भधारणा समस्येवर 'फर्टिलिटी ओपीडी ' सुरू   नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या सुविधेचा लाभ घ्यावा  नांदेड दि....