जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 11 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक समतापर्व अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी 1 ते 30 एप्रिल या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन व ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकारण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश खपले, उपायुक्त तथा सदस्य अनिल शेंदारकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बापू दासरी यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्यात येत आहे. नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत जातीचे दाखले व जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षातील प्रवेशित इयत्ता आकरावी व बारावी विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप समितीकडे ऑनलाईन भरलेले अर्ज दाखल केली नाहीत अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व सर्व महाविद्यालयांमध्ये स्थापन केलेल्या समानसंधी केंद्राचे नियुक्त केलेले प्रमुख प्रतिनिधी (नोडल ऑफिसर) यांना मंडणगड पॅटर्नप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकृतीसाठी दिनांक 1 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान जिल्ह्यात तालुका ठिकाणी महाविद्यालय स्तरावर पुढीलप्रमाणे एक दिवसीय जातवैधता प्रमाणपत्र मार्गदर्शन व ऑनलाईन भरलेले अर्ज स्विकृतीसाठी विशेष मोहिम अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तालुक्याचे नाव, दिनांक-वेळ व शिबिराचे ठिकाण पुढील प्रमाणे राहिल. नांदेड शहरासाठी 13 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत यशवंत महाविद्यालय नांदेड येथे तर लोहा-कंधार तालुक्यासाठी 13 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 वाजेपर्यंत महात्मा फुले महाविद्यालय शेकापूर ता. कंधार. अर्धापूर 17 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 मिनाक्षी देशमुख मेमोरियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अर्धापूर. भोकर 18 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 वाजेपर्यंत श्री शाहू महाराज महाविद्यालय बोरगाव रोड भोकर. देगलूर 18 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते दु. 2.30 देगलूर महाविद्यालय देगलूर. मुदखेड 19 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 महात्मा गांधी माध्य. व उच्च माध्य.विद्यालय मुदखेड.धर्माबाद व बिलोली 19 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 लाल बहादूरशास्त्री महाविद्यालय धर्माबाद. किनवट 20 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय गोकुंदा किनवट. हदगाव 21 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते दु. 2.30 पंचशिल महाविद्यालय हदगाव. माहूर 24 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 श्री रेणुकादेवी कनिष्ठ महाविद्यालय माहूर. नायगाव 25 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 जनता हायस्कूल नायगाव. उमरी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 यशवंत विद्यालय उमरी. हिमायतनगर 27 एप्रिल रोजी सकाळी 11.00 ते दु. 2.30 हुतात्मा जयवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, हिमायतनगर. मुखेड 27 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दु. 2.30 महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व प्राचार्य, कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांनी सन 2022-23 या वर्षातील प्रवेशीत इयत्ता 11 व 12 विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप समितीकडे जात पडताळणीचे ऑनलाईन भरलेले अर्ज सादर केली नाहीत अशा विद्यार्थ्यांनी तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य / प्रतिनिधी, समान संधी केंद्राचे नियुक्त प्रमुख प्रतिनिधी व नोडल ऑफिसर यांनी वरीलप्रमाणे तालुका ठिकाणी महाविद्यालय स्तरावर आयोजित केलेल्या शिबिराच्या ठिकाणी माहितीसह उपस्थित राहण्याबाबत कळवावे, असेही आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
000000