Monday, November 18, 2024

 #मतदानकरूया : आपल्या गावाचा शहराचा विकास करणारा चांगला व्यक्ती सभागृहात पाठवण्यासाठी राष्ट्रीय सण असणाऱ्या लोकशाहीतील मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांसह सर्वांनी सहभागी व्हावे.20 नोव्हेंबरला मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे.




#मतदानकरूया : अंदर का शोर अच्छा है थोडा दबा रहे... मगर बेहतर तो ये है कि आदमी कुछ बोलता रहे... आपल्या मनातील मनोगत व्यक्त करण्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान करण्याचे आवाहन नांदेडचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा लेखक डॉ.नंदू मुलमुले यांनी केले आहे.

 


#मतदानकरूया : लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निवडण्याचा हक्क ; तर तो जबाबदार असावा ही जबाबदारी , नागरिकांवर आली आहे. त्यामुळे हक्क जबाबदारी आणि उत्तरदायित्व निभवण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडावे. 20 नोव्हेंबरला मतदान करावे, असे आवाहन लेखक तथा जेष्ठ इतिहास तज्ञ डॉ.प्रभाकर देव यांनी केले आहे.


 

#मतदानकरूया : राष्ट्रीय कर्तव्य म्हणून परंपरेतून आलेली लोकशाही व्यवस्था संविधान संस्कृती म्हणून पुढे जतन करण्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान करण्याचे आवाहन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी केले आहे.



 


मतदानकरूया : लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी मतदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामान्यातील सामान्य नागरिकांना देखील ही जाणीव प्रकर्षाने आहे. हीचआग्रही विनंती केली आहे ऑटोचालक चंद्रकांत गाजरे यांनी.. न चुकता 20 नोव्हेंबरला मतदान करण्याची... चला मतदान करूया !

 

 फोटो कॅप्शन : टपाली मतदानाचा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जवळपास 14 हजार 76 मतदान झाले आहे. सैन्य दलाच्या दोन हजारावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे 19 हजार पैकी 90% टपाली मतदान पूर्ण होईल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.




फोटो कॅप्शन : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार माहिती चिठ्ठी वाटप सुरू आहे. यासाठी मतदारांच्या घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ पोहोचत आहे. ज्यांना ऑनलाइन मतदान माहिती चिट्ठी काढायची आहे. त्यांनी वोटर हेल्पलाइन हा ॲप डाऊनलोड करावा. या ॲपवर वोटर सर्विस या विभागात गेल्यावर आपल्या बीएलओचा नंबर सुद्धा मिळतो. नागरिकांनी आपली मतदान माहिती चिट्ठी हस्तगत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.






फोटो कॅप्शन : टपाली मतदानाचा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जवळपास 14 हजार 76 मतदान झाले आहे. सैन्य दलाच्या दोन हजारावर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे 19 हजार पैकी 90% टपाली मतदान पूर्ण होईल, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.




वृत्त क्र. 1119

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व ६ विधानसभांची मतमोजणी

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात 

ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये मतमोजणी व स्ट्राँग रूमची निर्मिती

 फक्त किनवट, हदगाव, लोहा विधानसभेची मोजणी त्या त्या ठिकाणी 

नांदेड, दिनांक १८ :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6 व विधानसभेसाठी 6 अशा 12 मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी मात्र  त्या-त्या ठिकाणी होणार आहे.   

नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच वेळेस येत असल्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी देखील नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात होणार आहे. अन्य वेळी नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशीच विधानसभेची मतमोजणी शहरात होत होती. मात्र यावेळी दोन्ही निवडणुका सोबत असल्यामुळे भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या लोकसभा क्षेत्रातील विधानसभेची मतमोजणी देखील विद्यापिठामध्ये होणार आहे. यासाठी 12 स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकसभेतील 6 मतदारसंघातील मतपेट्या तसेच 6 विधानसभा क्षेत्रातील मतपेट्या ठेवण्यात येणार आहेत.  

20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी असल्यामुळे केवळ 20 रोजीच्या रात्री पर्यंत पोलिंग पार्टी नांदेडला पोहचतील. 21 व 22 रोजी मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये असेल. 23 नोव्हेंबरच्या पहाटे निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार स्ट्राँग रूममधून मतपेटीतून उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हिएम बाहेर काढल्या जातील. त्यानंतर मतमोजणी होईल. त्यामुळे विद्यापिठाच्या उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये काही अंशिक बदल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील लोहा, हदगाव, किनवट या मतदारसंघातील मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे. लोहा विधानसभेसाठी महसूल हॉल तहसिल कार्यालय लोहा येथे तर हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी समाज कल्याण भवन येथे अनुसूचित जाती मुलींचे शासकीय वसतिगृह तामसा रोड हदगाव येथे होणार आहे. किनवट विधानसभेसाठी येथील आयटीआय कॉलेज येथे मतमोजणी होणार आहे.  

0000



वृत्त क्र. 1118

पूर्ण दिवस सुटी अथवा किमान 2 तास मतदानाला वेळ द्या !                                                                             

कामगार, मजूर, वेटरपासून ते मेकॅनिकपर्यंत सर्वांना 20 नोव्हेंबरला सवलतीचे आदेश                                        

20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस  

                                                                                                                                                                  नांदेड, दि. 18 नोव्हेंबर- नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे.

                                                                                                                                                                   नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. नांदेड विधानसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांसना निवडणुकीच्यां दिवशी बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क् बजावण्या्साठी भरपगारी सुट्टी देण्यावबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.

ही सुट्टी सर्व आस्था‍पना, कारखाने, दुकाने, इत्यारदीना लागू राहील. उदा. राज्या शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्याट या मधील आस्थाथपना, सर्व दुकाने व इतर आस्था्पना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्या्पार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या , शॉपिग सेंटर, मॉल्सय,रिटेलर इ. अपवादात्म क परिस्थीपतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यासदीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्यट नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्कस बजावण्याकसाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र त्यालबाबत त्यां नी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्या्ही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थासपना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

                                                                                                                                                                       सर्व आस्थांपना,कारखाने, दुकाने इत्यायदींच्याग मालकांनी , व्य वस्थाापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्या‍वी. मतदारांकडून मतदानासाठी योग्य‍ ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त  न झाल्या ने मतदान करणे शक्या न झाल्यावबाबची तक्रार आल्यामस , त्यांसच्याल विरुध्दळ योग्यम ती कारवाई करण्याशत येईल . 

00000

वृत्त क्र. 1117

मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार राहणार बंद 

नांदेड दि. 18 नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट 1862 चे कलम 5 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट, 84-हदगाव, 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 88-लोहा, 89-नायगाव, 90-देगलूर व 91 – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान व मतमोजणी दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास आदेशित केले आहे. 

बुधवार 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका हदगाव-मनाठा, किनवट-माळ बोरगाव, मांडवी,  माहूर-मौ.दहेगाव, अर्धापूर-कामठा, धर्माबाद-निरंक, नायगाव-सोमठाणा, देगलूर-शहापूर, मरखेल, बिलोली-सगरोळी, मुखेड-जाहुर, दापका गु. , सावरगाव पिर, नांदेड- मौ. वाडी अंतर्गत छत्रपती चौक ते डी मार्टपर्यत , मौ. तरोडा बु. व खु (तरोडा नाका), मुदखेड-निरंक, भोकर-निरंक, हिमायतनगर-हिमायतनगर शहर, उमरी-निरंक, लोहा-सोनखेड, उमरा, कंधार-मौ. बारुळ  या ठिकाणची आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्‍हणजे गुरुवार 21 नोव्हेंबर 2024 रोजी भरविण्‍यात यावेत. तसेच मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी परिसरात आठवडी बाजार भरत असल्यास याच आदेशान्वये ते बंद करण्यात येत असून हे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत असे आदेश निर्गमित केले आहे.

००००

वृत्त क्र. 1116

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त 

जिल्हयात पाच दिवसात 70 धडक कारवाई

नांदेड, दि. 18 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 12 ते 17 नोव्हेंबर 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत या विभागाने 70 ठिकाणी धाडी टाकून एकूण 7 लाख 12 हजार 630 रुपयांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

12 ते 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 70 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 67 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 67 गुन्हे, वारस 67, अटक आरोपी 67, देशी मद्य 475.57 लि., विदेशी मद्य 51.12 लि, ताडी 225 लि, जप्त वाहन संख्या 05  जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 7 लाख 12 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.  

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात विभागाला नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

0000

वृत्त क्र. 1115

25 वर्षानंतर एकाचवेळी लोकसभा व विधानसभा

निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा सज्ज: जिल्हाधिकारी                                       

• प्रचार तोफा थंडावल्या; बुधवारी मतदान 

•  जिल्हा प्रशासनाची जय्यत तयार

• 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 ला मतमोजणी

• एका शाईत दोनदा मतदान

• मतदान कालावधीत कोणीही कायदा हातात घेवू नये

• शेवटच्या प्रशिक्षणानंतर आज पोलींग पाटर्या होतील रवाना

• आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 


नांदेड, दि. 18 नोव्हेंबर :- येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लगेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाच्यावतीने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असून उद्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना शेवटचे प्रशिक्षण देवून मतदानासाठी साहित्यासह पोलींग पाटर्या रवाना करण्यात येणार आहे. तरी मतदारानी जास्तीत जास्त मतदानासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मतदानाच्या कालावधीत काय करावे व काय करु नये याबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी राजकुमार माने आदीची उपस्थिती होती. 

मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्ह्यात सर्व मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत . त्यामुळे कोणीही कायदा हातात घेवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यावी पाच व पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येणे प्रतिबंधित केले आहे. 

मतदारांना मतदान करताना जी विहित कार्यपध्दती आखून दिलेली आहे, त्यानुसार मतदान करावे. ज्या मतदाराकडून मतदान करतानाच्या प्रक्रीयेची छायाचित्र, व्हिडीओ, रिल्स, केल्या जातील त्या समाज माध्यमावर प्रसारित केल्या जातील, अशा मतदाराविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 128 नुसार तात्काळ, पोलीस कारवाई केली जाईल, याची सर्वानी नोंद घ्यावी. मतदारांनी गोपनीयता राखणे हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अन्वये मतदारांना बंधनकारक आहे. उक्त अधिनियमाच्या कलम 61 अ अन्वये एखाद्या व्यक्तीने मतदान केंद्रामधून मतदान यंत्र लबाडीने किंवा अनाधिकृतपणे बाहेर नेले अथवा तसा प्रयत्न केला किंवा अशा कृत्यास जाणूनबजून सहाय्य केले किंवा त्यासाठी उद्युक्त केले तर ती व्यक्ती एका वर्षाचा कारावासास किंवा पाचशे रुपयापर्यत दंडास किंवा दोन्हीही शिक्षेस पात्र ठरतील यांची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.                                                                                             

                                                                                                                                                                   एका शाईत दोनदा मतदान                                                                                                                                

येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असून यावेळी 27 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा उभी केली आहे. यामध्ये 3088 मतदान केंद्राची स्थापना केली आहे. या सर्व मतदार बुथवर सर्व आवश्यक असणारी व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे मतदार लवकर कसे मतदान करतील यासाठी विशेष प्रशिक्षण अधिकारी, कर्मचारी यांना दिले आहे. यावेळी सर्व मतदाराना वेगळा अनुभव येणार असून २५ वर्षानंतर नांदेडला एका शाईमध्ये दोनदा मतदान करता येणार आहे. तरी नागरिकांनी 20 नोव्हेंबरला आपले अमुल्य मत देशासाठी द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. या निवडणुकीत 15 हजार 886 अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रीया घडवून आणार आहेत.  8 हजार सुरक्षा व पोलीस कर्मचारी असणार आहेत.                                                                                                                                                                 

20 तारखेला सार्वजनिक सुट्टी

येत्या 20 तारखेला मतदानासाठी सर्व आस्थापनाना शासकीय सुटी देण्यात आली आहे. तसेच खाजगी आस्थापनावरील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना दोन तासाची सुटी मतदानाबाबत देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा उद्योग विभागाने देखील सर्व अत्यावश्यक यंत्रणाना सूचना दिल्या आहेत.                                                                           

48 तास मद्य विक्री बंद                                                                                                                                  आज सायंकाळी 6 वाजेपासून ते 20 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यत किंवा मतदान संपेपर्यत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

00000






 २० नोव्हेंबरच्या मतदानासाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज ; नांदेडमध्ये 25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा एकत्र निवडणूक मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानातून प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन🙏🏻








वृत्त क्र. 1114

कर्णबधिर / मुकबधिर मतदारांसाठी साईन लँगवेजच्या माध्यमातून मतदार जनजागृती 

नांदेड, दिनांक १८ नोव्हेंबर :- नांदेड 16 लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत लोकशाही बळकटीकरणासाठी व मतदानाचा टक्का वाढाविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात येत आहे. 

याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या स्पीप टिमच्या माध्यमातून कर्णबधिर मतदारांसाठी साईन लँगवेज च्या माध्यमाने मतदान जनजागृती करण्यात येत आहे. सुरेश गुंडे या मुकबधिर कर्मचाऱ्यांच्या साईन लॅगवेजच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. मी मतदान करणार आहे आपणही मतदान करुन राष्ट्रीय उत्सवात तथा राष्ट्रीय कार्यास योगदान दया असा संदेश देण्यात आला. सदर माहिती साईन लँगवेजमध्ये दिल्यामुळे कर्णबधिर/ मुकबधिरांमध्ये मतदान जनजागृतीचा संदेश पोहचविणे सोपे झाले आहे. यावेळी वामने एच पी, ढवळे एस के,देवकर,रनविरकर, लबडे  आदी कर्मचारी उपस्थित होते.

00000




वृत्त क्र. 1113

87-नांदेड दक्षिणची निवडणूक तयारी पूर्ण

नांदेड, दि. १८ नोव्हेंबर:- 16 नांदेड लोकसभा पोट निवडणूक व 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आदेश,साहित्य व इतर सर्व बाबींसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या भव्य प्रांगणात तयारी पूर्ण झाली असून निवडणूक प्रक्रियेतील कार्यासाठी सुसज्ज झाले आहे. 

नांदेड दक्षिण मतदारसंघात एकूण मतदार 316821 असून मतदान केंद्रांची संख्या 312 एवढी आहे. एकूण नियुक्त केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी 1560 चे आदेश तयार करण्यात आले आहेत.  केंद्रांना 34 झोनमध्ये वितरित करण्यात आले आहेत. या झोनचे एकूण 103 रुट निर्माण करुन तेवढ्याच रुट गाईडची नेमणूक करण्यात आली आहे. आदेश वाटपासाठी 10 टेबल तर मतदान यंत्र, व्हिव्हिपँटसह इतर साहित्य वाटपाचे 31 टेबल करण्यात आले आहेत. या मतदान क्षेत्रात 20 मतदान केंद्रे हे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. ज्यामध्ये केंद्र क्रमांक 19,84,88,90,94,98,102,55,124,129,204,223,255,289,49,147,186,233,114,210 यांचा समावेश आहे. 

या प्रत्येक केंद्रासाठी सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन येथे विशाल व भव्य मंडप उभारुन नियंत्रण करण्यात येत आहे.  याशिवाय सर्व मतदान केंद्रावर वीज,पिण्याचे पाणी,यथायोग्य फर्निचर, दिव्यांगासाठी रँम्पसह आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना नाष्टा, जेवण व चहापाण्याची  व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ०८७ नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ .सचिन खल्लाळ, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु, संजय नागमवाड यांनी दिली आहे. 

या व्यवस्थापनासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार, प्रशिक्षण कक्षाचे सदस्य संजय भालके, राजेश कुलकर्णी व विजयकुमार चोथवे , बी.एस.पांडे,मकरंद भालेरावसह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

००००००







वृत्त क्र. 1112

87 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाचा अनोखा उपक्रम

मतदान जनजागृती विविध स्पर्धेतील प्रमाणपत्राचे वितरण 

 नांदेड, दि. १८:- 87-नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी घोषवाक्य, चित्रकला, निबंध, वक्तृत्व, पोस्टर रंगवा,रांगोळी व मतदान करण्याच्या आवाहनाचे पत्रलेखन अशा विविध खुल्या स्पर्धांचे मतदार जनजागृती साठी आयोजन करण्यात आले होते. 

या सर्व खुल्या स्पर्धांना भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या सर्व स्पर्धेत एकूण नांदेड दक्षिणसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा क्षेत्रातील 166 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमुळे मतदान जनजागृती होण्यास  मदत झाली आहे. या सर्व स्पर्धकांचा 087 नांदेड दक्षिण स्वीप कक्षाच्यावतीने सन्मान करुन प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या प्रमाणपत्रांचा वितरण सोहळा तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात ०८७ नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ, तहसीलदार प्रविण पांडे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु, पेशकार संजय नागमवाड, राजकुमार कोटुरवार,स्वीप सदस्य राजेश कुलकर्णी व संजय भालके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  

यावेळी मतदान जनजागृती घोषवाक्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त आशिष विजयराव कल्याणे,मुगट,ता.मुदखेड, द्वितीय क्रमांक प्राप्त अतुल अशोकराव कुलकर्णी, काबरा नगर,नांदेड व तृतीय पुरस्कार प्राप्त सौ.उज्ज्वला  अभयकुमार भावसार-दांडगे, पुंडलीकवाडी, नांदेड यांच्यासह विविध स्पर्धेतील नितिका बेद्रे, सौ.अरुणा विकास लामतूरे,सौ.प्रियदर्शनी सोनवणे,रोहिणी राजेश पोहरे, मतांशा बानो, अंजली पोहरे,पलक शिवाजी बैनवाड,फुरखान अशा यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करुन प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .सचिन खल्लाळ यांनी सर्वांचे अभिनंदन करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग घेवून मतदान जनजागृती केल्याबद्दल आभार व्यक्त केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी.कुलकर्णी यांनी तर आभार विजयकुमार चोथवे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वीप सदस्य डॉ घनश्याम येळणे,संजय भालके, राजेश कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, कविता जोशी व सारिका आचमे यांनी विशेष परिश्रम घेतले.

००००००








    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...