Thursday, May 25, 2023

 योजनांचे लाभधारक व कार्यान्वयीन यंत्रणेसाठी

“शासन आपल्या दारी” अभियान मोलाचे
- जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर
नांदेड (जिमाका) दि. 25 :- “शासन आपल्या दारी” हे अभियान शासकीय योजनांच्या लाभधारकांचे मनोबल, आत्मविश्वास आणि शासकीय योजनांप्रती सकारात्मकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या योजना अधिकाधिक सकारात्मक भावनेने पोहोचविण्यासाठी कटिबध्द असले पाहीजे. या अभियानाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्तावित दौरा व इतर मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता सर्व विभागप्रमुखांनी मिशन मोडवर येऊन काम करावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले.

“शासन आपल्या दारी” या अभियानानिमित्त आज येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अपर पोलीस अधीक्षक अबिनेश कुमार, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या अभियानाच्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन परवाना शिबीर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा, आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक तपासणी शिबीर, कृषी विभागाच्या वतीने प्रगतशील शेतकऱ्यांचे आपल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाबाबतचे स्टॉल्स, महिला बचतगटांच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे स्टॉल्स यााबाबत बैठकीत प्र. जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी निर्देश दिले.
00000




शेतकऱ्यांनी उपकर योजनेतंर्गत अनुदानावर कृषि साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी उपकर योजनेतंर्गत अनुदानावर कृषि साहित्याचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 25 :- सन 2023-24 मध्ये जिल्हा परिषद उपकर योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डी.बी.टी. व कॅशलेस पध्दतीचा अवलंब करुन ताडपत्री, 3 एचपी / 5 एचपी ओपन वेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), ट्रॅक्टरचलित रोटाव्हेटर, सोयाबीन प्लॅन्टर सोलार फेन्सीग एनरगायझर, बिजप्रकियेसाठी अनुदान, सेंद्रीय खत निर्मितीसाठी लागणारे बेड इ. कृषि साहित्याचा लाभ देण्यासाठी कृषी साहित्यांचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी गरजू शेतकऱ्यांनी अनुदानावर औजारे / कृषि साहित्य मिळणेसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह प्रस्ताव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा परिषद कृषि विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. या योजने अंतर्गत औजाराचा, कृषि साहित्याचा लाभ देण्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांचा अर्ज, स्वत:चे नावे जमीन असल्याबाबत चालू आर्थिक वर्षाचा सात/बारा व 8- अ (होल्डींग) चा उतारा, आधार सलग्न बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकीत प्रत, आधार कार्डची छायांकीत प्रत, शेतकऱ्याकडे जनावरे असल्याबाबत पशुसंवर्धन विभागाचे प्रमाणपत्र. (कडबा कटरचा लाभ घेणेसाठी), ओलीताची सोय (विहीर/शेततळे/नाला) असल्याबाबत तलाठी यांचे प्रमाणपत्र. (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी), अधिकृत विद्युत कनेक्शन असल्याबाबत लाईट बिलाची छायांकित प्रत अथवा कोटेशन भरलेल्या पावतीची छायांकित प्रत. (विद्युत पंप संचचा लाभ घेणेसाठी) , जातीच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत. (लाभार्थी शेतकरी मागास वर्गीय असल्यास), अपंग असल्यास प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अपंग प्रमाणपत्र, अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील असल्यास तहसिलदार यांचे प्रमाणपत्र, घरघुती बियाणे उपलब्ध असलेले/स्वयंघोषणापत्र व उन्हाळी बियाणे उत्पादित केले स्वयंघोषणापत्र (सोयाबिन प्लॅन्टर घेणेसाठी), कुटुंबाचे रेशन कार्ड इ.कागदपत्राची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. 000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...