वसतिगृह प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना
अर्ज करण्याचे समाज कल्याणचे आवाहन
नांदेड
दि. 21 :- वसतिगृहातील रिक्त जागांसाठी माध्यमिक
व उच्च माध्यमिक तसेच पदवी व पदव्युतर
प्रथम वर्ष व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम वर्षामध्ये शिक्षण
घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून ऑफलाईन अर्ज मंगळवार 20 जुन 2017 पासून मागविण्यात येत आहेत.
सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागामार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नांदेड , गुणवंत मुलांचे नांदेड, अर्धापूर,
हदगाव, भोकर, उमरी, नायगाव, बिलोली, धर्माबाद तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह
विद्युतनगर नांदेड व गांधीनगर नांदेड,
हदगाव, भोकर, उमरी, देगलूर, मुखेड, भोकर असे एकूण 16 वसतिगृह कार्यरत आहेत. सन
2017-18 या शैक्षणिक वर्षातील वसतिगृहातील 601 रिक्त
जागांसाठी हे अर्ज
मागविण्यात येत आहे.
शालेय
विद्यार्थ्यांनी 20 जुन ते 1 जुलै 2017 पर्यंत.
इयत्ता दहावी व अकरावी नंतरच्या
अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 20 जुन ते
6 जुलै 2017 पर्यंत. बीए, बीकॉम, बीएसस्सी
अशा बारावीनंतरच्या पदविका, पदवी
आणि एमए, एमकॉम, एमएसस्सी असे पदवीनंतरचे
पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी 20 जून ते 20 जुलै 2017 पर्यंत. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांनी 15 जुलै ते 14 ऑगस्ट 2017 पर्यंत संबंधित
शासकीय वसतिगृहातील गृहपालाकडे अर्ज सादर करावेत.
प्रवेश हे गुणवत्ता व आरक्षणावर
आधारित असून प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडिंग
साहित्य, निर्वाह भत्ता आदी सुविधा मोफत पुरविण्यात
येतात. विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑफलाईन अर्ज संबंधित शासकीय
वसतिगृहातील गृहपालाकडे सादर करावेत तसेच अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे
गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड
यांच्या कडून करण्यात येत आहे.
000000