डिजीधन.. निजीधन व्हावे.. : प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी
नागपुरातील डिजीधनच्या थेट प्रक्षेपण कार्यक्रमात
नांदेडमध्ये पीओएस, पीडीएमस मशिन्सचे वितरण
नांदेड दि. 14 :- डिजीधन यापुढे निजीधन व्हावे. याद्वारे डिजीटल इंडियासाठी तरूण पुढे येतील,
अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर येथे निती आयोगाच्यावतीने
आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि त्यानिमित्ताने
नांदेड येथे डिजीधन उपक्रमाच्या समारोपाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय
प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी
प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील होते. यात डिजीधन उपक्रमाच्या निमित्ताने
घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरणही करण्यात आले. तसेच व्यावसायिकांना
पीओएस मशिन्स, रास्तभाव दुकानदारांना ईपीडीएमएस उपकरणांचेही वितरण करण्यात आले.
नियोजन भवनमधील कॅबिनेट हॅालमध्ये झालेल्या या कार्यक्रमास मनपा आयुक्त समीर
उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, कोषागार
अधिकारी मनोज गग्गड, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, अप्पर कोषागार अधिकारी
एन. पी. पाचंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, जिल्हा अग्रणी बँकेचे
व्यवस्थापक विजय उशीर, राष्ट्रीय विज्ञान सुचना कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी
सुनील पोटेकर, उद्योजक हर्षद शहा यांच्यासह विविध बँकाचे अधिकारी यांची उपस्थिती
होती.
डिजीधन मेळाव्याच्या अनुषंगाने आयोजित घोषवाक्य व वक्तृ्त्व स्पर्धेतील
विजेते पुरुषोत्तम व्यंकटराव बरडे, ऋषिकेश डांगे, गजानन शिंदे, जाकीर अहेमद अली,
उमर जिबरन फारूकी, अश्विनी आप्पाराव जाधव, सरस्वती मकरंद दिवाकर तसेच नांदेड तहसिलस्तरावरील
स्पर्धेसाठी विदीशा हनमंते, किशन टोणगे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. तसेच
डिजीधन मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल ॲक्सीक बँकेचे अविनाश देवरे, एचडीएफसीचे
स्वप्नील पाटणी, जनजागृतीसाठी व्हिएलई नायगावचे शेख सलिम, लोहाचे माधव फुलवरे,
अर्धापुरचे मिर्झा अबुझर ऊल्लाबेग यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने श्रीमती स्वाती अलोने तसेच अप्पर कोषागार अधिकारी श्री. पाचंगे
तसेच उद्योजक श्री. शहा यांची समयोचित भाषणे झाली. नागपूर येथे निती
आयोगाच्यावतीने आयोजित भिम ॲप आधारच्या अवतरणानिमित्त (लाँचिग) आयोजित
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीतील कार्यक्रमाचे थेट
प्रक्षेपणही करण्यात आले. नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी सुत्रसंचालन केले व
आभार मानले. कार्यक्रमास बँकीग क्षेत्रातील अधिकारी, तसेच विविध शासकीय
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, व्यावसायीक, नागरिक आदी
उपस्थित होते.
0000000