Friday, May 7, 2021

 

1 हजार 63 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 538 व्यक्ती कोरोना बाधित

15 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 864 अहवालापैकी 568 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 482 तर अँटिजेन तपासणीद्वारे 86 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 84 हजार 127 एवढी झाली असून यातील 75 हजार 901 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 6 हजार 255 रुग्ण उपचार घेत असून 194 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक 5 ते 7 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 15 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 683 एवढी झाली आहे. दिनांक 5 मे रोजी देगलूर कोविड रुग्णालय येथे हनेगाव ता. देगलूर येथील 70 वर्षाची महिला, दिनांक 6 मे रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे तामसा ता. हदगाव येथील 45 वर्षाचा पुरुष, मुक्रामाबाद ता. मुखेड येथील 73 वर्षाचा पुरुष, जनता कॉलनी नांदेड येथील 80 वर्षाची महिला, अर्सजन नांदेड येथील 64 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे श्रीनगर नांदेड येथील 75 वर्षाची महिला, मगनपुरा नांदेड येथील 55 वर्षाची महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे दापका ता. मुखेड येथील 70 वर्षाची महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे आयप्पा मंदिर किनवट येथील 62 वर्षाची महिला, हदगाव कोविड रुग्णालय येथे पळस ता. हदगाव येथील 80 वर्षाचा पुरुष, निर्माया कोविड रुग्णालय येथे चौफाळा नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, अपेक्षा कोविड रुग्णालय येथे मंठा ता. हदगाव येथील 59 वर्षाचा पुरुष, दिनांक 7 मे रोजी भावसार चौक नांदेड येथील 33 वर्षाची महिला, नांदेड येथील 55 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 176, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 5, भोकर 21, बिलोली 43, देगलूर 21, धर्माबाद 4, हदगाव 28, हिमायतनगर 15, कंधार 9, किनवट 31, लोहा 2, मुदखेड 15, मुखेड 23, नायगाव 17, उमरी 14, माहूर 22, परभणी 3, हिंगोली 10 व्यक्ती बाधित आढळले तरॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 12, माहूर 4, अर्धापूर 4, भोकर 3, देगलूर 2, बिलोली 1, धर्माबाद 1, हदगाव 11, हिमायतनगर 12, कंधार 1, किनवट 3, लोहा 3, मुदखेड 1, मुखेड 11, नायगाव 1, उमरी 6, लातूर 3, यवतमाळ 1, हिंगोली 5, पुणे 1 असे एकूण 568 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 1 हजार 63 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 16, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 636, धर्माबाद तालुक्यातंर्गत 19, देगलूर कोविड रुग्णालय 7, अर्धापूर तालुक्यातंर्गत 11, उमरी तालुक्यातंर्गत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 23, मुखेड कोविड रुग्णालय 25, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, किनवट कोविड रुग्णालय 14, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 7, बिलोली तालुक्यातंर्गत 65, खाजगी रुग्णालय 162, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, नायगाव तालुक्यातर्गत 1, कंधार तालुक्यातर्गत 18, लोहा तालुक्यातर्गंत 6, हदगाव तालुक्यातर्गत 11, मालेगाव टिसीयू कोविड रुग्णालय 7, मांडवी कोविड केअर सेंटर 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली . 

आज 6 हजार 255 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 145, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 70, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 132, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 62, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 59, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 12, बिलोली कोविड केअर सेंटर 94, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 6, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 29, माहूर कोविड केअर सेंटर 28, भोकर कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 34, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 38 , मुदखेड कोविड केअर सेंटर 12, अर्धापूर कोविड केअर सेंटर 16, बारड कोविड केअर सेंटर 32, मांडवी कोविड केअर सेंटर 5, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 6, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 21, एनआरआय कोविड केअर सेंटर 58, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 792, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 38, खाजगी रुग्णालय 1 हजार 454 असे एकूण 6 हजार 255 उपचार घेत आहेत. 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 50, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 60, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 79 हजार 297

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 85 हजार 219

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 84 हजार 127

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 75 हजार 901

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 683

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.22 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-22

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-390

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 6 हजार 255

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-194

00000

 

जिल्हा रूग्णालयात सिंगापूरचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर

तातडीने रूग्णसेवेत वापरण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- राज्य शासनाने येथील जिल्हा रूग्णालयाला सिंगापूरचे 10 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. हे कॉन्स्ट्रेंटर तातडीने रूग्णसेवेसाठी वापरण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सिजनचे उत्पादन आणि साठवणुकीची क्षमता वाढवली जाते आहे. दरम्यान, या आणिबाणीच्या परिस्थितीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून, सिंगापूरच्या टेमासेक फाऊंडेशन या संस्थेने राज्य शासनाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी 10 कॉन्स्ट्रेंटर नांदेडच्या जिल्हा रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आले आहेत. या सहकार्यासाठी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी सार्वजनिक  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत. 

नांदेड जिल्हयातील कोरोनाबाधितांवर तातडीने योग्य उपचार सुरु व्हावेत, त्यांची बेड, ऑक्सिजनसाठी धावपळ होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नांदेड येथे तत्परतेने जंबो कोविड केअर सेंटर उभारले. त्याशिवाय एसडीआरएफमधून जिल्ह्याला 52 नव्या रुग्णवाहिका मिळवून दिल्या. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्याला नवे दहा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध झाल्याने रूग्णांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे.

00000

 

गरज भासलीच तर लहान मुलांच्या आरोग्यासाठी

जिल्ह्यातील विविध रुग्णालयात पाचशे खाटांचे नियोजन

-  पालकमंत्री अशोक चव्हाण

 

जर तिसरी लाट आलीच तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी

 

नांदेड, (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात कोविड बाधितांचे वाढलेले प्रमाण बऱ्याच अंशी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या लाटेत तरुण व युवावर्ग मोठ्या प्रमाणात बाधित झाला. भविष्यात जर तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवलाच तर जिल्हा प्रशासनातर्फे वयोवृद्धांसह आता प्रामुख्यांने लहान मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करुन नियोजन केले जात आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपणे आवश्यक असून कोरोनाबाबतची काळजी व सुरक्षित वर्तण मुलांकडूनही होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक काळजीचे कारण जरी नसले तरी भविष्यात वेळेवर धावपळ होण्यापेक्षा आतापासूनच लहान मुलांसाठी कोविड व्यवस्थापन विशेष वार्ड व खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

 

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यात लहान मुलांसाठी सद्यस्थितीत विविध रुग्णालयात 500 खाटांचे विशेष नियोजन करुन याबाबत पूर्वतयारी करण्यात आली. या बैठकीस शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सिरसीकर, बालरोग तज्ज्ञ असोसिएशनचे सचिव डॉ. राजेश नुने, डॉ. संदिप पाटील, डॉ. श्रीरामे यांची उपस्थिती होती.

 

नांदेड जिल्ह्याची एकुण लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 33 लाख 61 हजार एवढी आहे. यात शुन्य ते 6 वयोगटातील लोकसंख्या ही जिल्ह्याच्या एकुण लोकसंख्येच्या 13.67 टक्के एवढी आहे. शुन्य ते 17 या वयोगटातील संख्या विचारात घेता हे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळपास येते. या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी व तसे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यादृष्टिने आजच्या बैठकीत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मुलांसाठी उपचारांच्या सेवा-सुविधा बाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासाठी स्वतंत्र बालरोग तज्ज्ञांचा स्वतंत्र टास्क फोर्स निर्माण करुन व्हेंटिलेटर व इतर उपकरणांच्या सुसज्जतेसाठी कृति आराखडा तयार केला आहे. पुढील एक महिन्यांमध्ये याचे नियोजन करण्याचे प्रस्तावित आहे.

 

मुलांसाठी लागणारी औषधी, त्यांचे वयोगट लक्षात घेता उपचारा समवेत शाररिक व माणसिक तंदुरुस्तीसाठी उपाय योजना, लक्षण विरहित कोविड जर मुलांमध्ये आढळला तर त्यादृष्टिने नियोजन याचाही साकल्याने या बैठकीत विचार करण्यात आला.      

000000




महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...