Friday, October 31, 2025

वृत्त क्रमांक  1145

दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त एकता रॅलीत जनजागृती साहित्याचे वाटप 

माहूर तालुक्यात विविध उपक्रमाद्वारे जनजागृती  

नांदेड, दि. 31 ऑक्टोबर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा या मार्गावरील एकता रॅलीमध्ये व रेल्वे डिव्हिजन कार्यालय नांदेड येथे आयोजित एकता रॅलीमध्ये पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे व पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदवून रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना जनजागृतीचे स्टीकर्स, बॅनर्स, पॉम्पलेटस वाटप करून भ्रष्टाचाराबाबत काही तक्रार असल्यास तक्रार कशी करावी याबाबत ला.प्र.वि.चे संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

राज्य शासनाकडून 27 ऑक्टोबर ते 2  नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह-2025 “दक्षता आपली सामायिक जबाबदारी” आयोजित करण्यात आला आहे. याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम आज विविध ठिकाणी घेण्यात आला.

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय येथे पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार, राहुल तरकसे पोलीस निरीक्षक, करिम खान पठाण, श्रीमती प्रिती जाधव, श्रीमती अनिता दिनकर, श्रीमती अर्चना करपुडे व सर्व पोलीस अंमलदार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवस "राष्ट्रीय एकता दिवस" म्हणून एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. 

ला.प्र.वि.चे पोकॉ/1487, चापोहेकॉ / 1889 साईनाथ आचेवाड हे नांदेड जिल्हयातील माहुर तालुक्याचे तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, बसस्थानक तसेच सारखणी व सिंदखेड याठिकाणी जावून तेथे बोर्डवर व दर्शनी भागावर दक्षता जनजागृती सप्ताह 2025 चे फलक व स्टीकर लावून तेथे उपस्थित असलेले नागरिकांना जनजागृती संबधाने प्रचार साहित्य वाटप केली.  

नांदेड जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांच्या भेटी घेवून सर्व शासकीय इमारतीमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी दर्शनीय भागावर भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीबाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बॅनर व स्टिकर लावून जनजागृती मोहिम राबविली जात आहे. सर्व नागरिकांनी शासकीय अधिकारी / कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात खालील क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक संदीप पालवे : 02462-255811, मो. नंबर 9226484699.

अपर पोलीस अधीक्षक अशोक कदम : 02462-255811

पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार : मो नंबर 9359056840.

टोल फ्रि : 1064.

ला.प्र.वि. नांदेड दुरध्वनी क्रमांक : 02462-253512.

वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in

मोबाईल ॲप : www.acbmaharashtra.net

फेसबुक पेज : www.facebook.com/maharashtraACB

टिव्टर : @ACBnanded

इन्स्ट्राग्राम :  acb_nanded

युट्यूब : @Anti Corruption BureauNanded.

000000








सुधारित वृत्त

वृत्त क्रमांक  1144

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी दौडचे आयोजन

जुना मोंढा ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत दौड

नांदेड, दि. ३१ ऑक्टोबर : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘सरदार @ 150 एकता अभियान’ अंतर्गत 31 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात आज पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत रन फॉर युनिटी दौडचे आयोजन जुना मोंढा ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या उपक्रमात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर,जिल्हाधिकारी राहुल कर्डीले,पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे,अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, आदरणीय धर्मगुरु आदीची उपस्थिती होती.

या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली ‘सरदार@150 युनिटी मार्च’ या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. याचे उद्दिष्ट देशातील युवकांमध्ये एकता, देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे. या मोहिमेद्वारे युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि नागरी सहभागातून ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल.

या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे, तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवा पिढीला सक्रिय योगदान देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

000000









वृत्त क्रमांक  1143

अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 31 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग मुंबईचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

गुरूवार 6 नोव्हेंबर 2025 रोजी सोयीनुसार परभणी येथून बायरोडने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे रवाना व मुक्काम.

शुक्रवार 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग मुंबईचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड महानगरपालिका येथील सभागृह हॉलमध्ये आयुक्त नांदेड महानगरपालिका यांच्यासोबत नांदेड महानगरपालिका यांचेकडे प्राप्त होणाऱ्या महसूलाचे एकूण 5 टक्के निधी आस्थापना, वजा खर्च, आर्थिक दुर्बल घटकावर केलेल्या खर्चाची मागील 5 वर्षाचा आढावा व कामाची तपासणी तसेच अनुसूचित जातीसाठी प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व तपासणी. लाडपागे, दलितवस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना व अनुकंपाबाबत आढावा बैठक. दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथील सभागृहामध्ये जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत संविधान-5 निधीबाबत आढावा बैठक. सोयीनुसार नांदेड येथून बायरोडने पुणेकडे रवाना होतील.

00000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...