Friday, August 16, 2024

 'महाराष्ट्र माझा’ छायाचित्ररिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

 

            मुंबई दि. १६ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीनऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित 'महाराष्ट्र माझा’ छायाचित्ररिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत ही स्पर्धा जाहीर केली आहे.

       'महाराष्ट्र माझाया संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषीशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिकजलसंधारणजलसंपदापायाभूत सुविधाआरोग्यपर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्ररिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील.

            प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्ररिल्स आणि लघुपटांना अनुक्रमे २५ हजार रुपये२० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असूनतीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचेमंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांचीप्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

स्पर्धेची नियमावली

१. छायाचित्रण स्पर्धा.

* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.

* छायाचित्राची थीम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या थीमशी सुसंगत असावी.

* छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.

* छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित व्हिज्युअल नसावेत.

* कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.

* छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

 

२. रिल्स स्पर्धा.

* रील्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.

* असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही

* कोणतेही कॉपीराईटचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल

* मानक रील्स स्वरूप अपेक्षित आहे.

* रील्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

 

३. लघुपट स्पर्धा.

* लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.

* या स्पर्धेत १८ वर्षावरील कोणीही... भाग घेऊ शकतात.

* लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.

* अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.

* कोणतेही कॉपीराईट उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* मानक व्हिडिओ स्वरूप MP४ HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / स्वरूप असावे.

* लघुपट मराठीहिंदीइंग्रजी या भाषेत बनवला आहे याची खात्री करावी.

* लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.

             भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क कडे असतील.

            स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावीत. सोबत आपले नावसंपूर्ण पत्तामोबाइल नंबर आणि छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे.

०००००

 वृत्त क्र. 729

बनावट विदेशी मद्यावर मुखेड तालुक्यातील

हिब्बट शिवार येथे धडक कारवाई

नांदेड दि. 16 ऑगस्ट :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदशनाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांची बनावट विदेशी मद्यावर मुखेड तालुक्यातील हिब्बट शिवार येथे धडक कारवाई करण्यात आली. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या टोल क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. ०२४६२- २८७६१६ वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक (अं व द) सुनिल चव्हाण, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त व्ही. एच.तडवी, अधीक्षक गणेश  पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेड यांच्या पथकाने मुखेड तालुक्यातील बोरगाव फाटा ते एकलारा रोड, हिब्बट शिवार येथे अवैधपणे बनावट मद्याची चोरटी वाहतुक, विक्री केली जात असल्याची नुकतीच माहिती मिळाली होती.

 राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक नांदेड जिल्हा व त्यांच्या पथकाने बोरगाव फाटा ते एकलारा रोड, मौ. हिब्बट शिवार ता. मुखेड येथे सापळा रचून आरोपी प्रशांत लक्ष्मण श्रीरामे व गंगाधर भोसले (फरार) यांना बनावट विदेशी मद्याची वाहतुक करतांना तपासणी केली. यावेळी यांचे ताब्यातील एक दुचाकी व एक चार वाहनात 180 मि.ली. क्षमतेचे मॅकडॉल नं.-1 व्हिस्कीच्या या विदेशी दारुचे 6 सिलबंद बाटल्या, 180 मि.ली. क्षमतेचे रॉयल स्टॅग व्हिस्की बनावट विदेशी दारुचे 414 सिलबंद बाटल्या, बनावट हॅपेरियर ब्ल्यु व्हिस्की नावाचे विदेशी मद्याच्या 156 सिलबंद बाटल्या असा मुद्देमाल जप्त करून आरोपी प्रशांत लक्ष्मण श्रीरामे याला अटक केली. परंतू मुळ सुत्रधार गंगाधर भोसले हा घटनास्थळावरून फरार झाला.

या गुन्ह्यातील ठिकाणाहून एक ह्युंदाई कंपनी निर्मित पांढऱ्या Verna चार चाकी वाहन, एक होंडा कंपनी निर्मित दुचाकी वाहन, बनावट विदेशी दारुच्या 576 सीलबंद बॉटल्या असा एकुण रूपये ५,००,३८० इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जवान गिरीधर भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  दुय्यम निरीक्षक एस.टी. कुबडे यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५(A),(B),(D),(E) ८०,८१,८३,९०,१०३ भारतीय न्याय संहिता चे कलम 123 अन्वये गुन्हा नोंद केला असून ज्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रा एस. टी. कुबडे हे करीत आहेत. या ठिकाणाहून 1 आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने गुन्ह्यांतील अटक आरोपींस 16 ऑगस्ट पर्यंतची एक्साईज कोठडी सुनावली आहे.

 या कारवाईत अधीक्षक गणेश पाटील यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत उपअधीक्षक मुपडे, देगलुर विभाग निरीक्षक ए. महिंद्रकर, एस. बोरुडे, सचिन शेटे, अमित वालेकर,एस. टी कुबडे, बी. बी. ईथ्थर सर्व दुय्यम निरीक्षक तसेच बालाजी पवार, मो. रफिक, शिवाजी कोरनुळे, सर्व स.दू. नि व जवान सर्वश्री विकास नागमवाड, गणेश रेनके, मुरलीधर आनकाडे, गिरीधर भालेराव, आर बी. फाळके, श्रीनिवास वजिराबादे, मारोती सुरनर, प्रवीण इंगोले, शिदास नंदगावे व जवान निवा. चा. रावसाहेब बोदमवाड एफ. के. खतीब, एस. जी. संगेवार तसेच महिला जवान श्रीमती ए. जी. घुगे यांचा सहभाग होता.

00000

वृत्त क्र. 728

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन

नांदेड, दि. 16 ऑगस्ट :-  इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इमाव, विजाभज व विमाप्र या समाजासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या विभागामार्फत महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जाती विकास महामंडळ ही महामंडळे कार्यरत आहेत. या मंडळातर्गत उपकंपन्या तसेच महाज्योती, अमृत यासारख्या संस्थामार्फत देखील अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनाची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जिल्ह्यात तालुकास्तरावर मेळावे आयोजित केले आहेत.

दिनांक 17 ऑगस्ट रोजी भोकर आश्रमशाळेत, 18 ऑगस्ट आश्रमशाळा पळसा, हदगाव , 19 ऑगस्ट आश्रमशाळा हिमायतनगर, 20 ऑगस्टला आश्रम शाळा दहेली तांडा, किनवट,  21 ऑगस्ट आश्रमशाळा कुटूंरतांडा नायगाव, 22 ऑगस्ट आश्रमशाळा दगडापूर बिलोली, 23 ऑगस्ट आश्रम शाळा भुतन हिप्परगा देगलूर, 24 ऑगस्टला आश्रम शाळा कुंडलवाडी तालुका बिलोली, 26 ऑगस्ट आश्रमशाळा कमळेवाडी ता. मुखेड, 27 ऑगस्ट आश्रम शाळा नेहरुनगर नागलगाव तांडा, कंधार, 27 ऑगस्ट आश्रम शाळा विठ्ठलनगर लोहा, 28 ऑगस्टला आश्रमशाळा, मुदखेड, 29 ऑगस्टला आश्रम शाळा उमरी, 30 ऑगस्टला आश्रमशाळा पळशी तांडा किनवट येथे मेळावे आयोजित केले आहेत.

या मेळाव्यासाठी नोडल अधिकारी म्हणून समाज कल्याण अधिकारी बी.एस. दासरी यांची नियुक्ती केली आहे. हे मेळावे त्या- त्या तालुक्याच्या आश्रमशाळेत आयोजित केले आहेत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी व या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहायक संचालक बी.एस. दासरी यांनी केले आहे.  

00000

 वृत्त क्र. 727

समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा

नांदेड, दि. 16 ऑगस्ट :-  समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंग यांच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला.  

समाज कल्याण कार्यालयात सद्यस्थित " मुख्यमंत्री वयोश्री योजना  व  मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनासाठी नांदेड जिल्हयातील 60 ते  65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरीक यांची कार्यालयात ये-जा सुरु आहे.  ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तींच्या सोईसाठी सामाजिक न्याय भवनमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या लिफ्टचा लाभ ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तीसाठी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय भवनातील लिफ्टच्याच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी उपस्थित राहल्यामुळे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले .

00000



वृत्त क्र. 726

सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 

नांदेड, दि. 16 ऑगस्ट :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024  रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी महिला लोकशाही दिनाच्या दिवशी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 ऑगस्ट 2024  रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

***

 वृत्त क्र. 725

भोकर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा आज मुख्य सोहळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे येथून राज्यस्तरीय शुभारंभ करणार;नांदेड जिल्हयात भोकर येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती

नांदेड, दि. 16 ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) बालेवाडी (पुणे) येथून होणार आहे. यानिमित्त नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण व अन्य मान्यवर लोकप्रतिनिधी तथा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय समारंभामध्ये नांदेड जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना सहभागी होता यावे, यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बालेवाडी येथील समारंभाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचाही यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गौरव करण्यात येणार आहे.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय कार्यक्रमातील नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम भोकर बाजार समितीच्या परिसरातील हॉलमध्ये होणार आहे. याशिवाय पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध लोकार्पण कार्यक्रमाचे भोकर शहरात आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये भोकर विश्रामगृहाचे लोकार्पण,राज्य मार्गाचे हुडूको अंतर्गत सुधारणा, पिंपळडोह तलाव उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन, सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयाचे लोकार्पण, तहसील व उपविभागीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचे भूमिपूजन, शंभर खाटांच्या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन, अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम, भोकर येथील तलावाचे सुशोभीकरण, आयटीआय इमारतीचे लोकार्पण, संत सेवालाल महाराज स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद मैदानावर सभा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
0000



 वृत्त क्र. 724  

पालकमंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड दौरा

 

नांदेड दि. 16 ऑगस्ट :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन हे शनिवार 17 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. शनिवार 17 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातील शिन्नर येथून सकाळी 6 वा. नांदेडकडे प्रयाण करतील. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सकाळी 10.45 वा. आगमन होईल. त्यानंतर ते भोकर येथील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

0000 

#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण योजनेच्या प्रभावाची प्रचिती कालपासून संपूर्ण महाराष्ट्राला सुरू झाली आहे #नांदेड जिल्ह्यातील महिलांनी रक्षाबंधनापूर्वी आलेल्या या ओवाळणीचे स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.



 #नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबाहिणयोजना महिलांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान व महिलांचा आर्थिक विकास यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार व्यक्त करणारी ही बोलकी प्रतिक्रिया योजनेचे यश सांगून जाते.


#नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिणयोजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करून आमच्या प्राथमिक गरजा भागविण्याची सोय निर्माण केली. योजना अशीच सुरू ठेवावी अशी एका भगीनीची विनंती.

#नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबाहिणयोजना महिलांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान व महिलांचा आर्थिक विकास यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल आभार व्यक्त करणारी ही बोलकी प्रतिक्रिया योजनेचे यश सांगून जाते.
























 #नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना अंतर्गत काल महिलांच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्याची एकूण तीन हजार रुपये रक्कम जमा झाली आहे आज महिलांनी ही योजना अशीच पुढे चालू ठेवण्याच्या अपेक्षेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.







 #नांदेड एकदम आनंदी ! राखीच्या पूर्वीच ओवाळणी !! #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिणयोजना अंतर्गत काल 3 हजाराचा मेसेज असे चेहरे प्रफुल्लीत करून गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी टाकल्याच्या आनंद असा टवटवीत व्यक्त झाला.






  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...