Wednesday, April 20, 2022

 आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी

भरती मेळाव्याचे गुरुवारी आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने तसेच डीजीटी यांच्या मान्यतेने गुरुवार 21 एप्रिल 2022 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे सकाळी 9 ते सायं. 5 या कालावधीत भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. या भरती मेळाव्यासाठी विविध नामांकित कंपन्या भाग घेणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावाअसे आवाहन अंशकालिन प्राचार्य एम. एस. बिरादार आणि सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. एस. परघणे यांनी केले आहे.

 

या भरती मेळाव्यासाठी उमेदवारांनी पुढीलप्रमाणे आवश्यक मुळ कागदपत्रे व सत्यप्रत घेवून उपस्थित रहावे. यात आधार कार्ड,  दहावी उत्तीर्ण गुणपत्रकआय.टी.आय. उत्तीर्ण गुणपत्रकइडब्लुएस / जात प्रमाणपत्र आणि फोटो इत्यादी तसेच काही अडचणी किंवा शंका असल्यास मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्रद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे संपर्क साधावाअसेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...