Friday, April 9, 2021

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 650 व्यक्ती कोरोना बाधित 27 जणांचा मृत्यू तर 1 हजार 330 बाधितांना उपचारानंतर सुट्टी जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 650 व्यक्ती कोरोना बाधित

27 जणांचा मृत्यू तर 1 हजार 330 बाधितांना उपचारानंतर सुट्टी

जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 441 अहवालापैकी 1 हजार 650 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 713 तर अँटिजेन तपासणीद्वारे 937 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 53 हजार 992 एवढी झाली असून यातील 41 हजार 448 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 11 हजार 271 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 5 ते 8 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 23 एवढी झाली आहे.   दिनांक 5 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे जयभिम नगर येथील 85 वर्षाचा पुरुष, साई नगर नांदेड येथील 50 वर्षीय महिला, नांदेड येथील 76 वर्षीय पुरुष, श्रीनगर नांदेड येथील 65 वर्षीय महिला, गोवर्धन घाट येथील 65 वर्षीय महिला, शिवराय नगर नांदेड येथील 48 वर्षाचा पुरुष, गजानन नगर नांदेड 48 वर्षाचा पुरुष, दिनांक 6 रोजी उदय नगर नांदेड येथील 65 वर्षीय पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे टाकळी ता. मुखेड येथील 40 वर्षीय पुरुष, दिनांक 7 रोजी मुखेड कोविड रुग्णालय येथे सावरगाववाडी येथील 60 वर्षीय महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथील 45 वर्षीय महिला, किनवट कोविड रुग्णालय येथे आंबेडकरनगर नांदेड येथील 72 वर्षीय महिला, आश्विनी कोविड रुग्णालय येथे तरोडा बु. येथील 58 वर्षीय पुरुष , भगवती कोविड रुग्णालय येथे गांधीनगर बिलोली येथील 75 वर्षीय महिला, भगवती कोविड रुग्णालय उमठाचीवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, आशा कोविड रुग्णालय नांदेड येथील 66 वर्षीय पुरुष, दिनांक 8 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे जुना मोंढा नांदेड येथील 55 वर्षीय पुरुष, आलुवडगाव ता. नायगाव येथील 78 वर्षीय महिला, सिडको नांदेडे येथील 35 वर्षीय पुरुष, उमरी येथील 37 वर्षीय पुरुष, सिडको नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, मुखेड येथील 76 वर्षाचा पुरुष, सोनखेड ता. लोहा येथील 74 वर्षाचा पुरुष, विष्णुपूरी येथील 60 वर्षाची महिला, कारेगाव ता. धर्माबाद येथील 62 वर्षाची महिला, देगलूर येथील 39 वर्षाचा पुरुष, कौठा नांदेड येथील 58 वर्षाचा पुरुष असे एकूण 27 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 330 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 8, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 979, कंधार तालुक्याअंतर्गत 2, किनवट कोविड रुग्णालय 11, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 3, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 32, मुखेड कोविड रुग्णालय 64, नायगाव तालुक्याअंतर्गत 5, धर्माबाद तालुक्याअंतर्गत 5, देगलूर तालुक्याअंतर्गत 1, खाजगी रुगणालय 130, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, हदगाव कोविड रुग्णालय 14, माहूर तालुक्याअंतर्गत  3, बिलोली तालुक्याअंतर्गत  31, लोहा तालुक्याअंतर्गत  29, असे एकूण 1 हजार 330 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.76 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 389, बिलोली 2, कंधार 78, मुदखेड 1, हिंगोली 3, नांदेड ग्रामीण 10, देगलूर 17, किनवट 21, मुखेड 44, परभणी 2, अर्धापूर 13, हदगाव 8, लोहा 16, नायगाव 47, अकोला 1, भोकर 35, हिमायतनगर 19, माहूर 3, यवतमाळ 4 असे एकूण 713 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 335, बिलोली 49, हिमायतनगर 27, माहूर 7, उमरी 17, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 66, देगलूर 41, कंधार 2, मुदखेड 44, यवतमाळ 2, अर्धापूर 27, धर्माबाद 29, किनवट 56, मुखेड 41, लातूर 1, भोकर 56, हदगाव 44, लोहा 43, नायगाव 48, परभणी 1 असे एकूण 937 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 11 हजार 271 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 243, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 113, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 220, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 146, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 123, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 188, देगलूर कोविड रुग्णालय 53, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 117, बिलोली कोविड केअर सेंटर 312, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 23, नायगाव कोविड केअर सेंटर 151, उमरी कोविड केअर सेंटर 35, माहूर कोविड केअर सेंटर 19, भोकर कोविड केअर सेंटर 20, हदगाव कोविड रुग्णालय 34, हदगाव कोविड केअर सेंटर 69, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 104, कंधार कोविड केअर सेंटर 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर 98, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 48, बारड कोविड केअर सेंटर 38, मांडवी कोविड केअर सेंटर 12, महसूल कोविड केअर सेंटर 108, एनआरआय कोविड केअर सेंटर 132, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 160, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 643, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 485, खाजगी रुग्णालय 1 हजार 546 असे एकूण 10 हजार 271 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 61 हजार 948

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 772

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 53 हजार 992

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 41 हजार 448

एकुण मृत्यू संख्या- 1 हजार 23

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-28

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-26

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-390

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11 हजार 271

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.

00000

 

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा केंद्रीय पथकाकडून आढावा

 

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा केंद्रीय पथकाकडून आढावा

 


नांदेड
, (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ग्राम पातळीपर्यत ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्याची केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. या पथकात पाँडेचरी येथील जवाहरलाल इस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडीकल एज्युकेशन ॲड रिसर्च (जीपमर) चे कम्युनिटी हेल्थ विभागाचे प्रमूख डॉ. पलनिवेल सी सहभागी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यंत्रणेमार्फत कोरोना उपाययोजनाबाबत जे नियोजन केले जात आहे त्यांची प्रत्यक्ष भेट देवून हे पथक आढावा घेत आहे.

 आज दि. 9 एप्रिल रोजी या पथकाने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचा आयडीएसपी सेल येथे भेट देवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासमवेत चर्चा करुन जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तालुक्याची संख्या, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तालुका पातळीवरील रुग्णालय, या सर्वामार्फत केले जाणारे उपचार, ऑनलाईन डाटा फिडींग प्रणाली याबाबी समजून घेतल्या. त्यानंतर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आरटीपीसीआर लॅंब, कोविड केंअर सेंटर यांची पाहणी करुन माहिती घेतली. रुग्णांची अधिक संख्या असूनही उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात जिल्हा प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

या पथकाने लोहा तालुक्यातील कोविड केअर सेंटरला भेट देवून काही बाधितांशी चर्चा केली. याचबरोबर कारेगाव येथे भेट देवून गावातील परिस्थिती समजून घेतली. या गावात होम आयसोलेशन अर्थात गृहविलगीकरण अंतर्गत उपचार घेणाऱ्या एका बाधिताची भेट घेवून चौकशी केली. गृहविलगीकरणाचे महत्व आणि यात डॉक्टराच्या निर्देशाप्रमाणे औषधोपचार होत असल्याची खातरजमा त्यांनी करुन घेतली. जिल्हा आरोग्य विभागातर्फे मोबाईल टेस्टींग व्हॅन, लसीकरण आदीची माहिती त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी  डॉ. मुंडे यांच्याकडून समजून घेतली.  

हे पथक काल दिनांक 8 एप्रिल 2021 पासून जिल्हा दौऱ्यावर आहे. 8 एप्रिल रोजी पथकाने नांदेड शहरातील जिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर आदि ठिकाणी भेट देवून पाहणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्याकडून आढावा घेतला.

00000

 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन सेवांचा वापर करावा

 

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी

दुय्यम निबंधक कार्यालयातील ऑनलाईन सेवांचा वापर करावा

 

नांदेड, (जिमाका) दि. 9 :- सध्या सर्वत्र कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढलेला आहे. यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागिाकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्त नोंदणीच्या सोईसाठी विभागात काही सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत. या सेवांचा नागरीकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी. तसेच पुढीलप्रमाणे सेवा सुविधांचा वापर अनिवार्य केला असून त्याचा वापर करुन दस्त नोंदणीबाबत सहकार्य करावे असे, आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी वि.प्र. बोराळकर यांनी केले आहे.

 

नागरीकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्त नोंदणी करीता PDE द्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एट्री किंवा दुरुस्त्या पुर्णपणे थांबविण्यात येत आहेत. नागरीकांनी या PDE डाटा एंट्री करुन दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर इस्टेप इन या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करुन किंवा कार्यालयात दुरध्वनीवर समक्ष संपर्क साधुन वेळ आरक्षित केली नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी. नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे. प्रत्येक व्यक्तीने सह्यासाठी स्वत:चे पेन आणावा. एकच पेन एकमेकात सह्यासाठी वापरु नये. आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे. मास्क लावल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही यांची नोंद घ्यावी. विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह ॲड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजीकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यत थांबवण्यात येत आहे. सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठया शहरात म्हणजेच जिल्ह्याचे ठिकाणी व तालुक्याचे ठिकाणी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात 9.45 ते 6.15 या वेळेत सुरु राहील. जिल्ह्यातील सर्व कार्यालयाचे कामकाज शनिवार, रविवार व शासकीय सुटी वगळता सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरु राहतील. यांची नागरीकांनी नोंद घ्यावी असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...