Saturday, October 19, 2019


मतदार ओळखपत्र नसल्यास
11 पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी ग्राह्य
            मुंबई, दि. 19 : येत्या सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (ईपीक) नसल्यास 11 पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
            मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 11 पुरावे :  पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबु, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार,आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणत्याही एका पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.
००००



मतदान केंद्र परिसरात 144 कलम
नांदेड, दि. 19 :- मतदानाच्यादिवशी सोमवार 21 आक्टोंबर 2019 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागु राहील. ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यातीरीक्तव्यक्तीस प्रवेश करण्याकरीता सोमवार 21 आक्टोंबर, 2019 रोजी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. हा आदेश मतदानाच्या दिवशी सोमवार 21 ऑक्टोंयबर 2019 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यन्त अंमलात राहील.
00000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 19 :- जिल्ह्यात बुधवार 30 ऑक्टोंबर  2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 16 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 30 ऑक्टोंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000



मतदान जनजागृती शपथ
मतदानाच्या दिवशी मतदानासाठी
 सुट्टी अथवा दोन तासांची सवलत  
             नांदेड, दि. 19 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत विविध आस्थापनात मतदान जनजागृती शपथ देण्यात आली आहे.
            विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी शासनाने सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदानासाठी भर पगारी सुट्टी कामगारांसाठी जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व खाजगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मौल्स व्यापारी संकूल इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याकरिता भरपगारी सुट्टी द्यावी व त्यांच्या वेतनातून वेतन कपात करण्यात येवू नये तसेच सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांना सवलत देणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वेतन कपात केल्यास जिल्हा कामगार कार्यालयास तक्रार नोंदविता येणार आहे. खाजगी क्षेत्रातील आस्थापणातील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी सोमवार 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन अ. सय्यद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील विविध आस्थापनांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून भेटी देऊन कामगारांनाकडून मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती करुन शपथ देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील पायोनिर डिस्ट्रिलिज, व्यंकेज इंडिया लि. सिट्रस प्रा. लि. कृष्णुर व साई सिमरन ऑईल इंडस्ट्रीज, श्रीनिवास कॉटल फिड्स व कोहिनुर कॉटल फिड्स लि. एमआयडीसी नांदेड तसेच डीमार्ट फरांदे होंडा सर्व्हीस प्रा. लि. कासलीवाल  कलेक्शन बाफना ज्वलर्स इत्यादी आस्थापनांना भेटी देण्यात आल्या, सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...