Tuesday, March 9, 2021

 राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यासाठी 1408 कोटींच्या निधीची तरतूद

- पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण

मुंबई, दि. 9 : राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या सन 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील 206 कामांसाटी सुमारे 1408 कोटी 93 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील विविध कामांना भरीव निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. पालकमंत्री म्हणून केलेल्या मागण्यांना अर्थमंत्री श्री. पवार यांनी भरीव तरतूद केल्याचे अर्थसंकल्पात दिसून आले आहे. 

यानुसार, नांदेड जिल्ह्यात नाबार्ड अंतर्गत 46 कांमासाठी 134 कोटी 55 लाख, राज्यमार्गाच्या 32 कामांसाठी 356 कोटी 25 लाख, प्रमुख जिल्हा मार्गाच्या 86 कामांना 488 कोटी 63 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन  इमारतींच्या 9 कामांसाठी 216 कोटी 38 लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानांच्या 14 कामांसाठी 41 कोटी 64 लाख, विश्रामगृहांच्या 11 कामांसाठी 47 कोटी 92 लाख, महसूल विभाग इमारती/निवासस्थानाच्या 2 कामांसाठी 11 कोटी 84 लाख, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 2 कामांसाठी 35 कोटी 86 लाख आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या इमारतीच्या 4 कामांसाठी 75 कोटी 86 लाख निधी अर्थसंकल्पित झाला आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पात नांदेड जिल्ह्यातील या विविध कामांना निधीची तरतूद केल्यामुळे पुढील वर्षभरात या कामांना वेग येईल व ती लवकर पूर्ण करण्यात येतील, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. 
--

 नांदेड जिल्ह्यात 225 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्यू 

1 हजार 432 अहवालापैकी 1 हजार 163 निगेटिव्ह

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- मंगळवार 9 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 225  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 86 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 139 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 119  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

 

आजच्या 1 हजार 432 अहवालापैकी 1 हजार 163 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 971 एवढी झाली असून यातील 23 हजार 41 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 108 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 22 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

 

सोमवार 8 मार्च रोजी महसूल कॉलनी तरोडा बु नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 607 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 69, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 5, मुखेड कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 12, माहूर तालुक्याअंतर्गत 3, खाजगी रुग्णालय 10, किनवट कोविड रुग्णालय 9 असे एकूण 119 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.27 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 69,  बिलोली तालुक्यात 1, किनवट 1, मुखेड 2, अर्धापूर 1, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 1, लोहा 5, मुदखेड 4, उमरी 1 असे एकूण 86 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 83, अर्धापूर तालुक्यात 2, बिलोली 1, धर्माबाद 6, हिमायतनगर 1, किनवट 9, माहूर 3, उमरी 4, परभणी 1, नांदेड ग्रामीण 7, भोकर 5, देगलूर 4, हदगाव 3, कंधार 2, लोहा 4, मुखेड 1, यवतमाळ 2, नागपूर 1 असे एकूण 139 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 108 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 53, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 78, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 65किनवट कोविड रुग्णालयात 33, मुखेड कोविड रुग्णालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 7, महसूल कोविड केअर सेंटर 68, देगलूर कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 477, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 195, खाजगी रुग्णालय 112 आहेत.

 

मंगळवार 9 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 135, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 15 एवढी आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 42 हजार 374

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 12 हजार 896

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 24 हजार 971

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 41

एकुण मृत्यू संख्या-607

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 92.27 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-31

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-259

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 108

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-22.

0000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...