Tuesday, November 24, 2020

 

61 कोरोना बाधितांची भर तर

 33 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 61  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 35  तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 26 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 33 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या एकुण 1 हजार 971 अहवालापैकी  1 हजार 853 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  20 हजार 103 एवढी झाली असून यातील  18  हजार 980 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 385 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आज रोजी प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही त्यामुळे आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 545 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3,  मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 16, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, जिल्हा रुग्णालय 13 असे एकूण 33 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.41 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 15, किनवट 5, हिमायतनगर 3, मुदखेड 1, अर्धापूर 1, धर्माबाद 4, कंधार 4, मुखेड 2 असे एकुण 35 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 17, भोकर 1, कंधार 2, लोहा 1 ,  नांदेड ग्रामीण 1, देगलूर 1, नायगांव 2, परभणी 1  असे एकुण 26 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 385 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 39,  मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7,  भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृह विलगीकरण 66, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 133, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 60 आहेत.  

मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 175, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 81 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 41 हजार 598

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 17 हजार 582

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 103

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 980

एकूण मृत्यू संख्या- 545

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.41 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 33

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-587

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-385

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

वृत्त क्र. 875

 

1 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील

आठवडी बाजार बंद

नांदेड, दि. 24 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर, 2020 रोजी मतदान होत आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे या दृष्टीकोनातून नांदेड जिल्ह्यातील कुंटूर ता. नायगाव (खै.), येवती ता. मुखेड, उमरी ता. उमरी, बिलोली, कोंडलवाडी ता. बिलोली, वाई बा. ता. माहूर, कौठा, वाजेगाव, नांदेड शहर (महेबुब नगर, लक्ष्मीनगर) ता. नांदेड व लोहा, मारतळा, कलबंर बु. ता. लोहा येथे भरणार आठवडी बाजार बंद ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदेश काढले आहेत.

पणन संचालक पुणे यांनी दिलेल्या मान्यतेनुसार मार्केट ॲड फेअर ॲक्टर, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुक अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील ज्या गावात मतदान केंद्र आहेत आणि त्या गावातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी मंगळवार, दि. 1 डिसेंबर, 2020 रोजी भरत असल्यास त्या गावचे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. अशा गावचे, ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी बुधवार, दिनांक 2 डिसेंबर, 2020 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

000

 

१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील शाळा आश्रमशाळा वसतिगृह बंदच

नांदेड, दि. 24 :- राज्यातील इयत्ता ०९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग २३ नोव्हेंबर, २०२० पासून  सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असून त्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि कोविड-19 ची स्थिती लक्षात घेवून जिल्हाप्रशासनातर्फे नांदेड जिल्ह्यातील शाळा, आश्रमशाळा,  वसतिगृह १ डिसेंबर, २०२० पर्यंत सुरु न करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  घेतला.  

 १५ जून, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये  स्थानिक परिस्थितीनुसार शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहाय्याने संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सद्यस्थितीत अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ, दिवाळी सणाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यात नागरिकांची ये-जा झाल्याने कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने होणारे संभाव्य परिणाम आणि शालेय व्यवस्थापन समिती व पालक संघ यांचेकडून प्राप्त झालेले अभिप्राय लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील इयत्ता ०९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग, आश्रमशाळा व वसतिगृह अशा परिस्थितीमध्ये सुरु करणे उचित ठरणार नाही, अशी  खात्री झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

१ डिसेंबर, २०२० नंतर शाळा सुरु करावयाच्या कार्यवाहीबद्दलचा निर्णय व सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  

00000

 

वृत्त क्र.  873                    

जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपासून जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  लागू

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यात 26 नोव्हेंबर, 2020 रोजीचे  सकाळी 6 वाजेपासून ते 10 डिसेंबर मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 26 नोव्हेंबर, 2020 रोजीचे  सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 10 डिसेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

वृत्त क्र.  872                   

आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी केंद्राला मंजुरी

  नांदेड (जिमाका) 24 :- धान खरीप पणन हंगाम 2020-21 साठी किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ या खरेदी केंद्राला धान खरीप पणन हंगाम 1 ऑक्टोंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत खरेदी करण्यासाठी अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये भरडधान्य खरेदी करण्याकरीता नेमणूक केलेल्या अभिकर्ता संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक -2 प्रादेशिक व्यवस्थापक यवतमाळ यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे किनवट तालुक्यातील हे केंद्र अटी व शर्तीनुसार मंजूर करण्यात आले आहे. यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचा दृष्टीने खरेदीच्या वेळी सर्व खरेदी केंद्रावर सुरक्षितरित्या खरेदी होण्यासाठी सामाजिक अंतर सोशल डिस्टस्न्सिग निर्जतुकीकरण इत्यादी बाबीचे पालन होणे आवश्यक आहे. याकरीता अभिकर्ता संस्थानी 4 मे 2020 अन्वये दिलेल्या सूचनाचे पालन करुन सर्व खरेदी करण्याची दक्षता घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्यक्ष खरेदी प्रक्रीया आदिवासी क्षेत्रासाठी महामंडळ नाशिक या अभिकर्ता संचामार्फत करण्यात यावी असेही निर्देशित आहे.

धानाची खरेदी करताना संबंधित तालुक्यातील तहसिलदारांनी खरेदीच्या कालावधीत दर्जा नियंत्रण व दक्षता पथकांची स्थापना करावी असे जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे.

000000

 

वृत्त क्र.  871                    

उर्ध्व पेनगंगा सिंचनासाठी रब्बी हंगाम

प्रथम पाणीपाळी 27 नोव्हेंबरला  

नांदेड (जिमाका) 24 :- उर्ध्व पेनगंगा प्रकल्प रब्बी व उन्हाळी हंगाम सन 2020-21 मधील उपलब्ध साठ्यानुसार पाणीपाळ्याच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांचे अध्यक्षतेखाली 19 नोव्हेंबर 2020 रोजी कालवा सल्लागार समितीच्या सर्व शासकीय सदस्यांची बैठक झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याऐवजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सर्व शासकीय सदस्यांची बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे (VC)  संपन्न झाली असे वाचावे. या बैठकीमध्ये सिंचनासाठी रब्बी हंगाम सन 2020-21 मधील प्रथम पाणीपाळी 27 नोव्हेंबर 2020 रोजी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. रब्बी हंगामातील उर्वरीत 2 पाणीपाळ्या व उन्हाळी हंगामातील 4 पाणीपाळ्या सोडणेबाबतचा अंतीम निर्णय  कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र.1 चे उप कार्यकारी अभियंता, ए.एच.गोकुळे यांनी कळविले आहे.

00000

 

वृत्त क्र.  870                       

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी

महाडीबीटी पोर्टलवर अचूक माहिती भरावी

 

नांदेड (जिमाका) 24 :- सन 2018-19 2019-20 मधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, फ्रिशीप रक्कम अद्याप त्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क करुन त्वरीत त्रुटीची पुर्तता करावी. त्यानंतर महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या आधार संलग्निकृत बँक खात्यावर रक्कम जमा होईल. संबंधित विद्यार्थी व महाविद्यालये संयुक्तपणे ही कार्यवाही पूर्ण करावी. अन्यथा महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना अनुज्ञेय शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त  तेजस माळवदकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

सन 2018-19 2019-20 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती/फ्रिशिप योजनेच्या अदायगीची रक्कम विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांच्या बँक खात्यावर जमा करतांना येणाऱ्या अडचणी, त्रुटींची पुर्तता संबंधित विद्यार्थ्यांकडून करुन घेण्यात यावी . सन 2018- 19 या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांकडून राबविल्या जाणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या विविध योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना अदा करावयाची शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर जमा करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणालीमार्फत www.mahadbtmahait.gov.in संकेतस्थळ शासनांकडून कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन अर्जाची प्रींट व आवश्यक कागदपत्रे महाविद्यालयांकडे सादर केल्यानंतर संबंधित महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे या कार्यालयाच्या लॉगीन वर फॉरवर्ड केली जातात. या कार्यालयाच्या लॉगिन वर प्राप्त झालेल्या अर्जांपैकी छाननीप्रक्रियेअंती पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जाना महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये मंजुरी देण्यात येते. तद्नंतर , या कार्यालयाच्या लॉगिन मधून समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचे स्तरावरुन मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जावर पुढील कार्यवाही होऊन वर नमुद योजनाअंतर्गत निर्धारित केलेली लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर नियमाप्रमाणे जमा करण्यात येते.

सन 2018-19 2019-20 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जाती प्रवर्गातील कांही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यासंबंधी त्रुटी वा अडचणी जसे विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्निकृत नसणे, बँक खाते बंद असणे, ऑनलाईन अर्ज भरताना आधार क्रमांक नोंदविलेला नसणे. फॉर्म भरतांना चुकीचे आधार क्रमांक नोंदविणे इ.कारणांमुळे आयुक्तालय पुणे यांचे स्तरावरुन विद्यार्थ्यांच्या,महाविद्यालयांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करतांना महाडीबीटी पोर्टल प्रणालीद्वारे अडचणी येत असल्याचे कळवून ज्या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रात चुका आहेत. त्या लगेच दुरुस्त करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सदरील डेटा या कार्यालयांकडून संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात आला असून महाविद्यालयांनी डेटामधील विद्यार्थ्यांच्या नावासमोर नमुद केलेली अडचण व त्रुटीबाबत संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करुन घेण्यासाठी पाठपुरावा करावा असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

00000

 

वृत्त क्र.  869                                  रास्तभाव धान्य दुकानात

नोव्हेंबर महिन्याची साखर उपलब्ध

 

नांदेड (जिमाका) 24 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी व एपीएल (केशरी) शेतकरी कुटूंब लाभार्थीसाठी दिवाळी निमित्त शासनाने नोव्हेंबर 2020 साठी नियमित नियतन साखर प्राधान्य कुटुंब योजनेसाठी प्रति शिधापत्रिका (प्रति कुटूंब) एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी  5 हजार 172 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.

तालुका निहाय नियतन क्विंटलमध्ये पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड - 758,अर्धापूर- 163, मुदखेड-202  कंधार-408, लोहा-454, भोकर-245, उमरी-194, देगलूर-292, बिलोली-282.5, नायगाव-346, धर्माबाद-151, मुखेड-461, किनवट- 344.5, माहूर-178, हदगाव-475.5, हिमायतनगर-217.5, असे एकूण 5 हजार 172 क्विंटलचे साखरेचे नियतन जिल्ह्यासाठी करण्यात आले आहे. याची सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गंत  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व एपीएल (केशरी ) शेतकरी  कुटूंब शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून या परिमानानुसार मंजुर साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

0000

 

पदवीधर निवडणूकीच्या प्रक्रीयेत

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी

-डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) 24 :- निवडणूकाबाबतचे प्रशिक्षण हे आपली जबाबदारी व कर्तव्य अचूक पार पाडता यावीत यासाठी असतात. नेहमीच्या निवडणूकापेक्षा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी असलेली निवडणूक ही  बॅलेट बॉक्‍सचा वापर करुन होत असून मतदान केंद्रावर गोंधळ गडबड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी केले. शंकरराव चव्‍हाण सभागृह येथे नुकतेच पदवीधर मतदान प्रक्रीयाबाबतचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न झाले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पदवीधर मतदारसंघ निवडणुकचे पालक तथा समन्‍वयक आर. एस. अहीरे, अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक जिल्‍हाधिकारी किर्तीकुमार पुजारा, निवडणूक उपजिल्‍हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार सारंग चव्‍हाण, उर्मीला कुलकर्णी उपस्थित होते.

दुसऱ्या प्रशिक्षणाचे वैशिष्‍टये म्‍हणजे निवडणुक प्रशिक्षणासाठी प्रत्‍यक्ष व्‍यासपिठावर मतदान कक्ष तयार करुन तहसिलदार किरण अंबेकर यांनी अत्‍यंत अभ्‍यासपुर्ण पध्‍दतीने प्रशिक्षण दिले. यामध्‍ये मतदान केंद्रात मतदार आल्‍यापासुन मतदान करुन जाईपर्यंत कोणकोणत्‍या बाबी करणे आवश्‍यक आहे. याची बारकाईने माहिती देण्‍यात आली. या प्रसंगी प्रशिक्षण घेणाऱ्यांनी विविध प्रश्‍न विचारले याचे समर्पक व योग्‍य उत्‍तरे किरण अंबेकर यांनी देऊन शंकेचे पुर्ण निरसन केले .

प्रथमच अशा नाविन्‍यपुर्ण पध्‍दतीचा वापर केल्‍यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्यांनी समाधान व्‍यक्त केले व जिल्‍हाप्रशासनाचे कौतुक केले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नायब त‍हसिलदार मुगाजी काकडे यांनी केले तर आभार सारंग चव्‍हाण यांनी व्‍यक्त केले. हे प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍यासाठी कुणाल जगताप, शोभा माळवतकर , कविता जोशी, दशरथ आडेराघु, जि.आर. शिवरात्री, राजेश कुलकर्णी, हणमंत जाधव व स‍य्यद युसुफ यांनी सहकार्य केले .

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...