Monday, December 12, 2022

 जिल्हाधिकारी कार्यालयात

मंगळवारी पेन्शन अदालत

 

नांदेड (जिमाका) दि. 12  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 13 डिसेंबर 2022 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

0000

 मोटार कार पसंती क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु 


नांदेड (जिमाका) दि. 12  :-  मोटार कार साठी एमएच-26-सीइ ही नविन मालिका शुक्रवार 16 डिसेंबर 2022 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्डपॅन कार्डमोबाईल नंबर  ईमेल सह) अर्ज गुरुवार 15 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीतअसे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

 

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास शुक्रवार 16 डिसेंबर 2022  रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल  टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावीअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारीयांनी केले आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...