Friday, April 19, 2024

 वृत्‍त क्र. 366

एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, दि. 19 :- एमएच-सीईटी परीक्षा-2024  ही 22 एप्रिल ते 17 मे 2024 (25,26 एप्रिल व 5,6,7,8,12,13,14 मे 2024 हे दिवस वगळून)5,6.

ध्वीला ष्‍श्‍ कालावधीत दोन  या कालावधीत जिल्ह्यात 8 परीक्षा केंद्रावर घेण्‍यात येणार आहे. या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही.

दर्शविलेल्‍या या वेळेत परीक्षा केंद्राच्‍या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी,  भ्रमणध्वनी, पेजर, फॅक्स,  झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंध आदेश निर्गमीत केले आहेत.

00000

 वृत्‍त क्र. 365

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या जिल्‍ह्याबाहेरील भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

वृत्‍त क्र. 364

 

कृपया सुधारित बातमी घ्यावी

 

निवडणूक कर्मचा-यांसाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था

 

नांदेड दि. 19 :  नांदेड व हिंगोली लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचा-यांना नऊ विधानसभा मतदार संघात 24 एप्रिल 2024 रोजी नेऊन सोडणे व 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक मतदान प्रक्रीया पार पाडल्‍यानंतर परत त्‍यांना त्‍यांच्‍या विधानसभा मतदार संघात घेवून येण्‍यासाठी 108 बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी त्‍या-त्‍या मतदार संघातील नेमून दिलेल्‍या केंद्रावर 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी ७ वाजता उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.


निवडणुकीच्‍या कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्‍या वाहतुकीसाठी  44  सिटर बसेस आहेत. दि. 24 एप्रिल 2024 रोजी सकाळी ७ वाजता संबंधित विधानसभा मतदारसंघात बस उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. 83 किनवट विधानसभा मतदार संघासाठी 14, 84-हदगाव मतदार संघासाठी 11 , 85-भोकर मतदार संघासाठी 12, 86- नांदेड उत्‍तर व 87- नांदेड दक्षिण मतदार संघासाठी 19,  88-लोहा मतदारसंघासाठी 14, 89-नायगाव मतदार संघासाठी  12,  90 देगलूर मतदार संघासाठी 13 बसेस तर 91- मुखेड मतदार संघासाठी 13 अशा एकूण 108 बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याबाबत जिल्‍हा प्रशासनाने परिवहन विभागाशी करार केला आहे.24 एप्रिल रोजी खालील दिलेल्या ठिकाणी तिसरे प्रशिक्षण होणार आहे. व 25 एप्रिल रोजी मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना होणार आहेत 24 एप्रिल रोजी तिसऱ्या प्रशिक्षणाला मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना त्यांना नेमून दिलेल्या मतदार संघात घेऊन जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे.


मतदान अधिकारी कर्मचा-यांना जाण्‍या - येण्‍यासाठी पुढीलप्रमाणे ठिकाणे नेमून दिलेली आहेत. निवडणूक साहित्‍य घेवून या कर्मचा-यांना ए‍क दिवस आधीच मतदान केंद्रावर पोहोचणे सोपे व्‍हावे यासाठी ही व्‍यवस्‍था आहे. निवडणूक चमुना पुढील केंद्रावरुन बसेसची व्‍यवस्‍था त्‍या-त्‍या ठिकाणी करण्‍यात आली आहे. 83- किनवट मतदार संघासाठी साठी शासकीय आयटीआय गोंकुदाकिनवट येथे तर 84- हदगाव साठी समाज कल्‍याण विभागाचे मागासवर्गीय शासकीय मुलीचे वसतिगृहबुध्‍दभुमी  वसाहततामसा रोडहदगाव 85- भोकर मतदार संघासाठी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर, 86-नांदेड उत्‍तर व 87-नांदेड दक्षिण साठी शासकीय तंत्रनिकेतन नांदेड, 88-लोहा मतदार संघासाठी पंचायत समितीतहसिल कार्यालय परिसर लोहा 89-नायगाव  मतदार संघासाठी शासकीय आयटीआय  नायगाव, 90- देगलूर मतदार संघासाठी तहसिल कार्यालय देगलूर, 91-मुखेड मतदार संघासाठी मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालयमुखेड येथे राहणार आहे. यामुळे निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी याची नोंद घ्‍यावीअसे निवडणूक विभागाने कळविले आहे.

००००



 

 वृत्‍त क्र. 363

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती

‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर

उमेदच्या वतीने सेल्फी पॉईंट

नांदेड दि. 19 :  मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले स्टिकर्स विविध विभाग प्रमुखांच्‍या वाहनांवर लावण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदेजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकलेसामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावारग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसेमहिला बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम- कदमप्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगेमाध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर आदींची उपस्थिती होती.

यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेले टी शर्टटोपी व सेल्फी पॉइंटचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मतदानाविषयी शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे विविध खाते प्रमुखअधिकारीकर्मचारी यांच्यासह बालाजी नागमवाडशुभम तेलेवारनंदलाल लोकडेस्वीपचे प्रलोभ कुलकर्णीसहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. विलास ढवळेतंत्रस्नेही शिक्षक सुनील आलूरकरआर.जी. कुलकर्णीरवी ढगेसारिका आचनेउमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवारअधीक्षक द्वारकादास राठोडजिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवारमाधव भिसेरमेश थोरातजिल्हा कौशल्य समन्वयक अतिश गायकवाडबालाप्रसाद जंगिलवाडलेखापाल हणमंत कंदुरके आदींची उपस्थिती होती.

000000





 वृत्‍त क्र. 362

निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल

साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा

नांदेड दि. १९ : मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालयातून येणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण पूर्ण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये आवश्यक साहित्य वितरण वेळेत व्हावे, याला अधिक महत्त्व दिले जाते. यासाठी आचारसंहिता लागल्यापासून साहित्य वितरण कक्ष स्थापन केला जातो. नांदेड साठी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रूपाली चौगुले यांच्या मार्गदर्शनात नियोजन भावनांमध्ये या साहित्य कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

निवडणुकांमध्ये अधिक सुबक, प्रगत असे साहित्य सध्या वापरण्यात येत आहे. ईव्हीएमचे बॅलेट युनिट कव्हर करणारे कंपार्टमेंट, पोस्टर, सूचना पत्र,ओळखपत्रे,लेखन सामग्री, स्टेशनरी, विविध नमुने, लिफाफे, कागदी सील, वोटर स्लिप, बॅलेट पेपर आदी साहित्य या कक्षामार्फत दिले जाते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह त्यांची मोठी टीम या कार्यामध्ये सहभागी झाली आहे.
00000





  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...