Tuesday, October 10, 2023

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 100 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

 गत 24 तासात 100 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 

·         48  रुग्णांवर शस्त्रक्रिया 

·         1 हजार 165 रुग्णांवर उपचार 

·         रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 726

 

 नांदेड, (जिमाका) दि. 10 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 1 हजार 165  रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 726 रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 8 ऑक्टोंबर ते  9 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण  191 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात  100 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,  याचबरोबर या 24 तासात 11 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात बालक 1 (स्त्री जातीचे 1) व प्रौढ 10 (पुरुष जातीचे 6, स्त्री जातीचे 4) यांचा समावेश आहे. 

 

गत 24 तासात एकूण 48 शस्त्रक्रिया झाल्या. यात 35 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 13 रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 24  प्रसुती करण्यात आल्या. यात  सीझर होत्या तर 17 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

 00000

जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

 जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध

·         पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत 

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :-  नांदेड शहरातील जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत रा.मा.256 (कि.मी 42/200 ते 75/700) व (2) नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदीवरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा.247 (कि.मी.0/00 ते 4/500) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा करण्यात येत असल्यामुळे जुना मोंढा ते गोदावरी नदीवरील पुल शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करुन इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.  प्रतिबंध  करण्यात आलेल्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.  


पॅकेज 154 नांदेड शहरातील (1) जूना मोंढा गोदावरी नदीवरील पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यत रा.मा.256 (कि.मी 42/200 ते 75/700) व (2) नांदेड लातूर रस्ता भगतसिंह चौक गोदावरी नदी वरील नवीन पुल (पश्चिम वळण रस्ता) रा.मा.247 (कि.मी.0/00 ते 4/500) रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटकरण, नाली बांधकाम, रस्ता दुभाजकासह संगमस्थळाची सुधारणा करण्याचे काम सुरु असल्यामुळे जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा या प्रतिबंधीत मार्गाऐवजी जुना मोंढा –वजीराबाद –कौठा-रवीनगर-शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा) या पर्यायी मार्गाने ये-जा करतील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 11 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.

00000

मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे 

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्रगावातील कृषि सहाय्यकतालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

लाभार्थी पात्रता

अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी निवड

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची पध्दत

महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.

शेततळयासाठी आकारमान

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी (34x34x03 ते 15x15x03) कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. या योजनेअंतर्गत अस्तरीकरणासह (प्लास्टिक फिल्मसह) शेततळयासाठी 1 लाख 50 हजार प्रति शेततळे अनुदान देय आहे. शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील. जिल्ह्यात आज 9 ऑक्टोंबर 2023 अखेर  सन 2022-23  व 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 591 शेतकऱ्यांची निवड झाली आहे. यापैकी 650 अर्ज प्रक्रीयेत असून 362 शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी पूर्वसंमती देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत मागेल त्याला शेततळयाच्या धर्तीवर लाभार्थ्यांनी अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्याबरोबर त्यांना या योजनेतून पूर्व संमती मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी  या योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...