Monday, September 21, 2020

 

283 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

167 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू    

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सोमवार 21 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 283 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 167 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 99 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 68 बाधित आले. 

आजच्या एकुण 661 अहवालांपैकी  394 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 13  हजार 723 एवढी झाली असून यातील 9  हजार 661 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 633 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 47 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.  

या अहवालात एकुण 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रविवार 20 सप्टेंबर 2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मुदखेड तालुक्यातील डोरनाळी येथील 58 वर्षाच्या एका महिलेचा, विष्णुनगर नांदेड येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा, कंधार तालुक्यातील बाचोटी येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा, इंदिरानगर लोहा येथील 50 वर्षाच्या एका महिलेचा. तर सोमवार 21 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सुंदरनगर नांदेड येथील 65 वर्षाच्या एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 361 झाली आहे.  

 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 7, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 5, किनवट कोविड केंअर सेंटर 10, मुखेड कोविड केंअर सेंटर 20, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 1, खाजगी रुग्णालय 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 21, मुदखेड कोविड केंअर सेंटर 10, कंधार कोविड केंअर सेंटर 8, नायगाव कोविड केंअर सेंटर 7, एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन, होम आयसोलेशन 164, हदगाव कोविड केंअर सेंटर 1, जिल्हा मध्यवर्ती कारागृह 7 असे 283 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 75, कंधार तालुक्यात 2, हदगाव तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 3, देगलूर तालुक्यात 1, परभणी 1, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 5, लोहा तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 3, लातूर 1 असे एकुण 99 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 40,  हदगाव तालुक्यात 3, अर्धापूर तालुक्यात 6, किनवट तालुक्यात 3, बिलोली तालुक्यात 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 2, मुदखेड तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 7, मुखेड तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, यवतमाळ 1 एकुण 68 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 633 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 283, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 666, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 69, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 51, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 130, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 57, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 122,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 73, लोहा कोविड केअर सेंटर येथे 64, हदगाव कोविड केअर सेंटर 59, भोकर कोविड केअर सेंटर 43, कंधार कोविड केअर सेंटर येथे 39, बारड कोविड केअर सेंटर 20, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 44, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 105, मुदखेड कोविड केअर सेटर 46,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 28, किनवट कोविड केअर सेंटर येथे 180, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 40, उमरी कोविड केअर सेंटर 82, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  खाजगी रुग्णालयात दाखल 333, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड 75, औरंगाबाद 2 व निजामाबाद येथे 1 संदर्भित  झाले आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 72 हजार 180,

निगेटिव्ह स्वॅब- 13 हजार 723,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 167,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 13 हजार 723,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,

एकूण मृत्यू संख्या- 361,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 9 हजार 661,

आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 633,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 777, 

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 47,

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 72.67 टक्के  

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 

केळी पिकाच्या संरक्षणासाठी

कृषि कार्यालयाचा संदेश

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- अर्धाप मुदखेड तालुक्यात केळी पिकावर किड रोगाच्या नियंत्रणासाठी  संक्रम झाडे ताबडतोब उपट नष्ट करावीत. शोषक किटकांना नियंत्रित करण्यासाठी पिवळ चिकट टेपचा वापरा करावा. शेताची स्वच्छता करण्यात यावी. शेताच्या बाहेरुन येणारी किटक नियंत्रित करण्यात यावेत. शोषक किड नियंत्रणासाठी रसायनांचा वापर करावा. ॲसिटामिप्रिड 6 ग्रॅम किंवा इमिडाक्लो प्रिड 8 मिली किंवा फिप्रोनिल 20 मिली अधिक ॲसेफेट 15 ग्रॅम) सोबत स्टिकरचा वापर करावा, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

000000

 

गोदावरी, पुर्णा, मानार नदीकाठच्या

गावातील नागरिकांना सर्तकेचा इशारा 

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उर्ध्व, उर्ध्व मानार प्रकल्प व निम्न मानार प्रकल्पही शंभर टक्के भरले असल्याने त्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस / अतिवृष्टी झाल्यास पाणी नदीत सोडण्यात येणार आहे. गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी क्र. 02462-263870 वर मिळू शकेल, असे आवाहन नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी केले आहे. 

जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहचले असून 10 दरवाज्यातून 1 लाख 10 हजार 200 क्युसेकसने विसर्ग चालू आहे. नदीमधून येणारा येवा जास्त असला तरी विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियं‍त्रीत करण्याचा प्रशानाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियं‍त्रीत केला जाईल. जायकवाडी प्रकल्पातून पर्जन्यमानात घट झाल्यामुळे सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी करुन 37 हजार 830 क्युसेकस विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. निम्न दुधना प्रकल्पातून 25 हजार 230 क्युसेकस विसर्ग पुर्णा नदीत सोडण्यात येत आहे. माजलगाव या मोठया प्रकल्पातून 31 हजार 420 क्युसेक्स विसर्ग चालू आहे. पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिध्देश्वर) पाणलोट क्षेत्रातून पुर्णा नदीत 36 हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला मिळते. त्याचा एकूण विसर्ग 1 लाख 30 हजार 480 क्युसेकस आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. 

सद्य:स्थितीत नांदेड शहरात पुर परिस्थिती नियंत्रणात आहे. सद्य:स्थितीत नांदेड शहराच्या खालील बाजूस तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरणसुध्दा 100 टक्के भरले असून तेथून 1 लाख 25 हजार क्युसेकस विसर्ग चालू आहे. पोचमपाड प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने गोदावरी नदीत फुगवटा निर्माण होतो. सध्या जुन्या पुलावर पाणीपातळी 348.82 मीटर आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेकस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेकस आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता स. को. सब्बीनवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000

 जिल्ह्यात लवकरच “ई-ऑफिस” कार्यपद्धतीतून प्रशासनाला गतीमान करु - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


नांदेड (जिमाका) दि. 21 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध शासकीय कार्यालयातील कामकाजावरही विपरीत परिणाम झाला आहे. ज्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्या विभागातील कार्यालयीन कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे “ई-ऑफिस” प्रणाली लवकरच सुरु करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात झूम ॲपद्वारे जिल्ह्यातील विविध कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक संपन्न झाली. त्यात त्यांनी हे सुतोवाच केले.

शासकीय कामकाज करतांना त्या-त्या कामासंदर्भातील नसती (फाईल) अनेक संबंधित विभागांच्या मंजुरीसाठी जात असते. संबंधित विभाग प्रमुख जर रजेवर असेल तर अशास्थितीत विनाकारण शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ शकतो. अशास्थितीत जर विविध कामांच्या नसती अर्थात फाईल डिजीटल स्वरुपात पाठविल्या गेल्या तर याचे जावक क्रमांकासह त्या-त्या प्रकरणांना तात्काळ मान्यता देता येणे शक्य होईल. याचा शासनस्तरावर व्यापक विचार करुन आता “ई-ऑफिस” ही प्रणाली जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तालुकापातळीवरील विभागांशी जोडल्या जाऊन तात्काळ कामांचा निपटारा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
0000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...