Monday, November 4, 2024

 विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 83-किनवट : 

गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्ट(हत्ती)

जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस)

भिमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी (कमळ)

अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो.रि.पा. (ट्रम्पेट)

डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर)

स. इमरान अली- इंडीयन नॅशनल लीग (शिवण यंत्र)

गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्ष (ऑटो रिक्शा) 


जयवंता केसर पवार-अपक्ष (बॅट)

जाधव सचिन माधवराव (नाईक) –अपक्ष (शिट्टी)

जितेंद्र अनिलराव कुलसंगे-अपक्ष (प्रेशर कुकर)  

दिलीप धरमसिंग जाधव नाईक-अपक्ष (व्हॅक्यम क्लीनर) 

धावारे राजेश नारायण-अपक्ष (ट्रक) 

ॲड. प्रदिप देवा राठोड-अपक्ष (जहाज)

विजय काशीनाथ खुपसे-अपक्ष (दूरदर्शन) 

शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन-अपक्ष (हिरवी मिरची) 

संदिप निखाते-अपक्ष (रोड रोलर) 

संदीप पाटील कऱ्हाळे-अपक्ष (ऊस शेतकरी), 

हे उमेदवार रिंगणात आहेत.

00000


विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 84-हदगाव : 

कोहळीकर बाबुराव कदम- शिवसेना (धनुष्यबाण), 

गणेश देवराव राऊत- बहुजन समाज पार्टी (हत्ती), 

जवळगावकर माधवराव निवृत्तीराव पाटील- इंडीयन नॅशनल काँग्रेस (हात), 

अनिल दिगांबर कदम- प्रहर जनशक्ती पार्टी (बॅट), 

दिलीप आला राठोड- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), 

देवसरकर माधव दादाराव -महाराष्ट्र स्वराज्य पक्ष (पेनाची निब सात किरणांसह), 

बापुराव रामजी वाकोडे- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), 

विलास नारायण सावते- आझाद समाज पार्टी (कांशि राम) (किटली), 


अभिजीत विठ्ठलराव देवसरकर-अपक्ष (खाट), 

प्रा. डॉ. अश्विकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर (प्रा.के-सागर)-अपक्ष (ऑटो रिक्शा), 

आनंद होनाजी तिरमीडे-अपक्ष (सफरचंद), 

गजानन बापुराव काळे-अपक्ष (रोड रोलर), 

गौतम सटवाजी डोणेराव-अपक्ष (अंगठी), 

ॲड.गंगाधर रामराव सावते-अपक्ष (कोट), 

दिलीप उकंडराव सोनाळे-अपक्ष (एअर कंडिशनर), 

दिलिप ग्यानोबा धोपटे-अपक्ष (फणस), 

प्रकाश विठ्ठलराव घुन्नर-अपक्ष (शिवण यंत्र), 

माधव मोतीराम पवार-अपक्ष (मोजे), 

राजु शेषेराव वानखेडे-अपक्ष (फलंदाज), 

लता माधवराव फाळके-अपक्ष (ऊस शेतकरी), 

विजयकुमार सोपानराव भरणे-अपक्ष (ट्रक), 

विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर-अपक्ष (लॅपटॉप), 

शेख अहेमद शेख उमर-अपक्ष (कपाट), 

श्रीनिवास वैजनाथ पोतदार-अपक्ष (बॅटरी टॉर्च)

0000

विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 85-भोकर :  

कदम कोंढेकर तिरुपती उर्फ पप्पु बाबुराव - इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), 

कमलेशकुमार पांडूरंगराव चौदंते- बहुजन समाज पार्टी (हत्ती), 

चव्हाण श्रीजया अशोकरराव- भारतीय जनता पार्टी (कमळ), 

साईप्रसाद सुर्यकांतराव जटालवार- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन), 

डॉ. अर्जुनकुमार सीताराम राठोड- जन जनवादी पार्टी (संगणक), 

कौसर सुलताना अलताफ अहमद- इंडियन नॅशनल लीग (एअर कंडिशनर), 

तिरुपती देवीदास कदम- जनता दल (सेक्युलर) (कपाट), 

दिनेश मुक्तीराम लोणे- रिपब्लिकन सेना (किटली), 

नागनाथ लक्ष्मन घिसेवाड- जनहित लोकशाही पार्टी (शिवण यंत्र), 

मखसुद अ. रज्जाक शेख- ऑल इंडिया मजलिस-ई-इन्कलाब-ई-मिल्लत (बॅट), 

साहेबराव बाबा गोरठकर- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), 

सुरेश टिकाराम राठोड- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), 

म. अफसर म. नवाज -अपक्ष (फळांची टोपली),

अलताफ अहेमद एकबाल अहेमद - अपक्ष्ाा (सफरचंद),

अशोक माधवराव क्षीरसागर-अपक्ष (जहाज), 

गौतम अर्जून सावते-अपक्ष (प्रेशर कुकर), 

चंद्रकांत विठ्ठल मुस्तापुरे-अपक्ष (फणस), 

जाकीर सगीर शेख-अपक्ष (बेबी वॉकर), 

दशरथ बाबय्या स्वामी-अपक्ष (नारळाची बाग), 

भिमराव संभाजी दुधारे-अपक्ष (फुगा), 

महानंदा नागोराव मोटेकर-अपक्ष (बांगड्या), 

माधव नरसिंग मेकेवाड-अपक्ष (नागरीक), 

विलास दिगांबर शिंदे-अपक्ष (फलंदाज), 

संतोष प्रभु गव्हाणे-अपक्ष (ऑटो रिक्शा), 

संभाजी रामजी काळे-अपक्ष (खाट)

00000

विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 86-नांदेड उत्तर : 

अब्दुल सत्तार अ गफुर- इंडियन नॅशनल कॉग्रेस (हात), 

बालाजी देविदासराव कल्याणकर- शिव सेना (धनुष्यबाण), 

विठ्ठल किशनराव घोडके- बहुजन समाज पार्टी (हत्ती), 

सदाशिव व्यंकटकराव आरसुळे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन), 

संगीता विठ्ठल पाटील- शिव सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), 

अकबर खॉन- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) (शिवण यंत्र), 

अहेमद रसुल शेख- भारतीय युवा जन एकता पार्टी (ट्रम्पेट), 

ॲड ए. जी. खान - देश जनहित पार्टी (शाळेचे दप्तर), 

गुब्रे प्रदिप रामराव - संभाजी ब्रिगेड पार्टी (स्पॅनर),

धुमाळ गजानन दत्तरामजी - बुलंद भारत पार्टी (ऊस शेतकरी), 

प्रतिक सुनिल मोरे- रिपब्लिकन सेना (पेनाची निब सात किरणांसह), 

प्रभु मसाजी वाघमारे- बहुजन भारत पार्टी (बॅटरी टॉर्च), 

इंजि. प्रशांत विराज इंगोले- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), 

मोहम्मद रियाज मोहम्मद अनवर- ऑल इंडिया नॅशनल रक्षा सेना पार्टी (अंगठी) 


अशोक संभाजीराव ढोले-अपक्ष (गॅस शेगडी), 

इरफान फ्हरुक सईद-अपक्ष (एअर कंडिशनर), 

ज्योती गणेश शिंदे-अपक्ष (टेबल), 

दिपक (बाळू) राऊत-अपक्ष (बॅट),

देशमुख मिलिंद उत्तमराव-अपक्ष (किटली), 

निलेश नरहरी इंगोले-अपक्ष (फुलकोबी), 

प्रदिपकुमार दत्तात्रय जैन-अपक्ष (सफरचंद), 

बालाजी जळबाजी भोसले-अपक्ष (कपाट), 

बालासाहेब दत्तराव देशमुख-अपक्ष (विजेचा खांब), 

मधुकर रघुनाथ केंद्रे-अपक्ष (पेन ड्राईव्ह), 

महमद तौफिक महमद युसूफ-अपक्ष (फुगा), 

मोहम्मद वसीम मोहम्मद एकबाल-अपक्ष (बेल्ट), 

युनुस खॉन हमिदउला खॉन-अपक्ष (शिट्टी), 

रमेश नामदेव भालेराव-अपक्ष (प्रेशर कुकर), 

राहुल वामनराव चिखलीकर-अपक्ष (कोट), 

वैभव प्रकाश सोनटक्के-अपक्ष (नारळाची बाग), 

शेख असलम शेख इब्राहीम-अपक्ष (सीसीटीव्ही कॅमेरा), 

श्याम शंकरराव जाधव-अपक्ष (सोफा), 

कॉ.प्रा.सदाशिव राजाराम भुयारे-अपक्ष (ऑटो रिक्शा).

000


विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 87-नांदेड दक्षिण : 

आनंद शंकर तिडके- शिव सेना (धनुष्यबाण), 

मोहनराव मारोतराव हंबर्डे- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), 

श्रीहरी गंगाराम कांबळे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), 

एजाज अहमद अब्दुल कादर- सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया (ऑटो रिक्शा),

खमर बिन बदर अलजाबरी- ऑल इंडीया मज्लीस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत (जहाज), 

फारुक अहमद - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), 

सचिन गोविंदराव राठोड- जन जनवादी पार्टी (शिवण यंत्र), 

सय्यद मोईन सय्यद मुखतार- ऑल इंडिया मजलीस-ए-इतेहादुल मुस्लीमीन (पतंग), 

संजय दिगांबर आलेवाड- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), 


अदित्य लक्ष्मीकांत देशमुख-अपक्ष (दूरदर्शन), 

अमोल पांडुरंग गोडबोले-अपक्ष (कपाट), 

गौतम हिरावत-अपक्ष (फुलकोबी), 

जनार्धन गौतम सरपाते-अपक्ष (संगणक), 

दिलीप व्यंकटराव कंदकूर्ते-अपक्ष (गॅस शेगडी), 

बाळासाहेब दगडुजी जाधव-अपक्ष (एअर कंडिशनर), 

महारुद्र केशव पोपलाईतकर-अपक्ष (सफरचंद),

मोहम्मद मुज्जमील मोहम्मद खालिक-अपक्ष (बॅट), 

यज्ञकांत मारोती कोल्हे-अपक्ष (कढई), 

संजय शिवाजीराव घोगरे-अपक्ष (अगंठी), 

संतोष माधव कुद्रे-अपक्ष (ट्रम्पेट). 

000


विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 88-लोहा :

एकनाथ रावसाहेब पवार- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल), 

चिखलीकर प्रतापराव गोविंदराव- नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (घडयाळ), 

आशाबाई श्यामसुंदर शिंदे-पिझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडीया (शिट्टी), 

चंद्रसेन ईश्वर पाटील-जनहित लोकशाही पार्टी (बॅट),  

शिवकुमार नारायणराव नरंगले-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),

सुभाष भगवान कोल्हे-संभाजी ब्रिगेड पार्टी (शिवण यंत्र), 


आशा श्यामसुंदर शिंदे-अपक्ष (ट्रक), 

एकनाथ जयराम पवार-अपक्ष (चिमणी), 

पंडीत सुदाम वाघमारे-अपक्ष (कपाट), 

प्रकाश दिगंबर भगनुरे-अपक्ष (सफरचंद), 

बालाजी रामप्रसाद चूकलवाड-अपक्ष (अंगठी), 

प्रा. मनोहर बाबाराव धोंडे-अपक्ष (प्रेशर कुकर), 

सुरेश प्रकाशराव मोरे-अपक्ष (ऑटो रिक्शा),

संभाजी गोविंद पवळे-अपक्ष  (फुगा)

00000


विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 89-नायगाव : 

डॉ. मीनल पाटील खतगावकर- इंडीयन नॅशनल कॉग्रेस (हात), 

राजेश संभाजीराव पवार- भारतीय जनता पार्टी (कमळ), 

अर्चना विठ्ठल पाटील- पिजन्स ॲण्ड वर्कस पार्टी ऑफ इंडीया (ऊस शेतकरी), 

गजानन शंकरराव चव्हाण- प्रहर जनशक्ती पार्टी (बॅट), 

डॉ. माधव संभाजीराव विभुते- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), 

मारोती लचमन्ना देगलूरकर- लोकराज्य पार्टी (जहाज), 


गंगाधर दिंगाबरराव कोतेवार-अपक्ष (ऑटो रिक्शा), 

भगवान शंकरराव मनूरकर-अपक्ष (शिवण यंत्र), 

मुंकुदराव नागोजी बेलकर-अपक्ष (रोड रोलर), 

शिवाजी दामोदर पांचाळ-अपक्ष (एअर कंडिशनर).

0000


विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 90-देगलूर : 

अंतापूरकर जितेश रावसाहेब - भारतीय जनता पार्टी (कमळ), 

निवृत्ती कोंडीबा कांबळे सांगवीकर- इंडियन नॅशनल कॉग्रेस (हात), 

अनुराधा शंकर गंधारे (दाचावार)-महाराष्ट्र विकास आघाडी (ट्रम्पेट), 

देगलुरकर सुशिलकुमार विठ्ठलराव - वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),  

भीमयोद्धा श्याम निलंगेकर-राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), 

साबणे सुभाष पिराजीराव -प्रहर जनशक्ती पक्ष (बॅट),  


कुंडके मुकिंदर गंगाधर- अपक्ष(एअर कंडिशनर), 

धनवे शिवानंद रामराव- अपक्ष (हिरा),

मधू गिरगांवकर (सगरोळीकर)- अपक्ष (ऊस शेतकरी) , 

प्रा. मोराती भारत दरेगांवकर- अपक्ष (ॲटो रिक्शा), 

मंगेश नारायण कदम- अपक्ष (शिवण यंत्र).

0000


विधानसभेसाठी उमेदवार, पक्ष व चिन्ह 91-मुखेड : 

अहिल्याबाई हणमंत मामीलवाड ठाणेकर- बहुजन समाज पार्टी (हत्ती) 

तुषार गोविंदराव राठोड- भारतीय जनता पार्टी (कमळ) 

बेटमोगरेकर हनमंतराव व्यंकटराव पाटील- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात) 

कल्पना संजय गायकवाड- बुलंद भारत पार्टी (माईक), 

गोविंद दादाराव डुमणे- पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इण्डिया (ऊस शेतकरी), 

रावसाहेब दिगांबरराव पाटिल- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), 

राहूल राजू नावंदे- प्रहर जनशक्ती पक्ष (बॅट),

रुक्मीणबाई शंकरराव गीते- जनता दल (सेक्युलर)- (ट्रक),

विजयकुमार भगवानराव पेठकर- राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी),


बालाजी पाटील खतगांवकर- अपक्ष (शिवण यंत्र), 

संतोष भगवान राठोड-अ पक्ष (ऑटो रिक्शा).

0000








 वृत्त क्र. 1026 

सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे #दूरध्वनी जाहीर

नागरिकांनी आवश्यकतेनुसार #संपर्क साधण्याचे आवाहन
#नांदेड दि. ४ नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले असून नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटताही येणार आहे. ते सर्व नांदेड विश्रामगृहात थांबले आहेत.
सामान्य निवडणूक #निरीक्षक
सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84-हदगाव या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. त्यांचा निवडणूक काळात संपर्क मेाबाईल क्र. 7499127265 हा आहे. तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8483990380 असा आहे. 87-नांदेड दक्षिण व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 8237960955 असा आहे. तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांचा संपर्क क्रमांक 7385842084 असा आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील.
निवडणूक निरीक्षक कालु राम रावत
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत हे नांदेड येथे दाखल झाले आहेत. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे.
मयंक पांडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर व दक्षिणसाठी निरीक्षक
आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक विधानसभा मतदारसंघासाठी 8483845220 हा आहे.
ए गोविंदराज लोहा, नायगाव, देगलूर, मुखेडसाठी खर्च निरीक्षक
तामिळनाडू कॅडरचे चेन्नई येथील ए गोविंदराज यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या विधानसभा क्षेत्राच्या खर्च निरीक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा स्थानिक संपर्क क्रमांक 7249048040 आहे.
लोकसभा मतदारसंघासाठी मृणालकुमार दास
लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून मृणालकुमार दास आयआरएस यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 8626095922 असा आहे. या भ्रमणध्वनी क्रमांकावर काही तक्रार किंवा माहिती द्यायची असेल तर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.
00000

 वृत्त क्र. 1025 

गुरुवारी नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांची प्रथम #तपासणी

#नांदेड दि. 4 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने 86 नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत कै. डॉ. शंकरराव चव्हाण, नियोजन भवन, कॅबिनेट हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, परिसर नांदेड येथे खर्च निरीक्षकासमोर आयोजित केली आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे असे 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

 वृत्त क्र. 1024 

उमेदवारांनी खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशाेब ठेवावा

#किनवट मतदारसंघातील उमेदवारांची #खर्च निरीक्षकासमोर बुधवारी प्रथम तपासणी
नांदेड दि. 4 नोव्हेंबर : विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवारांला निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला किवा तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन निवडणुक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशाेब ठेवावा.
भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 83 किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी बुधवार 6 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत खर्च निरीक्षकासमोर होणार आहे. ही तपासणी निवडणूक खर्च तपासणी कक्ष, आयटीआय किनवट येथे होणार असून या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे, असे 83 किनवट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

महत्त्वाचे विशेष वृत्त 1023

उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

* लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अंतिम 19 उमेदवार  

* नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार रिंगणात 

* लोकसभेसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार

* विधानसभेसाठी 27 लाख 87 हजार 947 मतदार 

* जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी तयार 

नांदेड दि. 4 नोव्हेंबर :- महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्याची सुरूवात आज पासून झाली आहे. नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार मैदानात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात याचवेळी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत. 14 दिवस प्रचारासाठी मिळणार असून 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पुढच्या रणधुमाळीत उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांनीच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच भयमुक्त व पारदर्शी वातावरणात मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 

20 नोव्हेंबरला मतदान 

निवडणूक प्रक्रियेतील आपल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत मोठ्यासंख्येने तरुणांनी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच येणाऱ्या 20 नोव्हेंबरला आपल्या भविष्याचा निर्णय घेतांना कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील 6 मतदारसंघामध्ये एकाचवेळी लोकसभा व विधानसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. अवघ्या काही सेकंदामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व लागणाऱ्या मतदान यंत्रणांची उपलब्धता विपूल प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच दिवस छोटा असल्यामुळे सर्व मतदान केंद्रावर सायंकाळीच दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

एकूण मतदार 

यावेळी त्यांनी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 9 लाख 78 हजार 234 पुरूष तर 9 लाख 30 हजार 158 महिला व 154 तृतीयपंथीय मतदार असल्याची आज पर्यंतची यादी जाहीर केली. ज्या सहा विधानसभा क्षेत्रात ही निवडणूक होणार आहे त्याची मतदार संख्याही जाहीर करण्यात आली. लोकसभेमध्ये भोकर विधानसभा क्षेत्रात 3 लाख 3 हजार 103, नांदेड उत्तर 3 लाख 58 हजार 918, नांदेड दक्षिणमध्ये 3 लाख 16 हजार 821, नायगावमध्ये 3 लाख 10 हजार 375, देगलूरमध्ये 3 लाख 12 हजार 237, मुखेडमध्ये 3 लाख 7 हजार 92 एवढे मतदार आहेत. त्यामुळे एकूण 19 लाख 8 हजार 546 मतदार मतदान करणार आहेत.   

तर विधानसभेसाठी आणखी तीन तालुके यामध्ये वाढले असून किनवटमध्ये 2 लाख 78 हजार 65, हदगावमध्ये 2 लाख 99 हजार 86, लोहामध्ये 3 लाख 1 हजार 650 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 9 विधानसभा क्षेत्रामध्ये 27 लाख 87 हजार 947 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी येत्या 20 नोव्हेंबरला मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

रिंगणातील उमेदवार 

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वैध 39 उमेदवारांपैकी 20 उमेदवारांनी अर्ज परत घेतला. त्यामुळे 19 उमेदवार रिंगणात आहेत. 

किनवट विधानसभेसाठी 29 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 17 जण रिंगणात आहेत.  

हदगाव विधानसभेसाठी वैध असणाऱ्या 63 उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 24 उमेदवार रिंगणात आहेत.

भोकर विधानसभेमध्ये 140 वैध उमेदवारांपैकी 115 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 25 उमेदवार रिंगणात आहेत. 

नांदेड उत्तरमध्ये 72 वैध उमेदवारांपैकी 39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 33 उमेदवार रिंगणात आहेत. 

नांदेड दक्षिणमध्ये एकुण 51 वैध उमेदवारांपैकी 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 20 उमेदवार रिंगणात आहेत.

लोहा विधानसभा क्षेत्रात वैध 33 उमेदवारांपैकी 19 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 14 उमेदवार रिंगणात आहेत. 

नायगाव विधानसभा क्षेत्रात 26 वैध उमेदवारांपैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 10 उमेदवार रिंगणात आहेत. 

देगलूर विधानसभा निवडणुकीत 27 वैध उमेदवारांपैकी 16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 11 उमेदवार रिंगणात आहेत.

मुखेड विधानसभेमध्ये 17 वैध उमेदवारांपैकी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 11 उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्ह्यामध्ये 9 विधानसभेसाठी एकूण 458 उमेदवारांपैकी 293 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे एकूण 165 उमेदवार रिंगणात आहेत.  

पाच केंद्रे संवेदनशील

जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या 3 हजार 88 असून मतदान केंद्रांची ठिकाणे 1 हजार 992 आहेत. यामध्ये शहरी 396 तर ग्रामीण 1 हजार 596 मतदान केंद्र आहेत. अनेक जागेवर एका ठिकाणी अनेक मतदान केंद्र आहेत. शंभर टक्के मतदान अधिकारी महिला असलेले मतदान केंद्र 9 आहेत तर शंभर टक्के अधिकारी दिव्यांग असलेले मतदान केंद्र 9 आहेत. शंभर टक्के मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र 9 आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 5 असून यामध्ये पांगरपहाड (किनवट), चोरंबा (हदगाव), पाकीतांडा (भोकर), रामतीर्थ (देगलूर), कोलेगाव (मुखेड) यांचा समावेश आहे. याठिकाणच्या सर्व मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष असणार आहे. 

00000 







  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...