Sunday, July 26, 2020

वृत्त क्र. 688


   
जिल्ह्यात 72 बाधितांची भर
कोरोनातून 21 व्यक्ती बरे तर एकाचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 26 :-  जिल्ह्यात आज 26  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 72 व्यक्तींचे अहवाल बाधित आले तर 21 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 243 अहवालापैकी 161 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 1 हजार 324 एवढी झाली असून यातील 693 एवढे बाधित बरे झाले आहेत. 562 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 4 महिला व 6 पुरुषांचा समावेश आहे. रविवार 26 जुलै रोजी भोकर येथील 50 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 57 एवढी झाली आहे.  
आज बरे झालेल्या 21 बाधितांमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 5, बिलोली कोविड केअर सेंटर मधील 2, कंधार कोविड केअर सेंटर मधील 2, मुखेड कोविड केअर सेंटर मधील 2, नायगाव कोविड केअर सेंटर मधील 5, गोकुंदा कोविड केअर सेंटर मधील 1 व खाजगी रुग्णालयातील 4 बाधितांचा  यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 693 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
नवीन बाधितांमध्ये  पंचायत समिती परिसर नांदेड 85 वर्षाचा 1 पुरुष, इतवारा येथील 65 वर्षाची 1 महिला, काबरानगर नांदेड येथील 19 वर्षाचा 1 पुरुष, शिवशक्ती नांदेड येथील 10 बाधित यात अनुक्रमे 3,7,25,30,52 वय वर्षाचे 5 पुरुष तर अनुक्रमे 12,25,29,42,48 वय वर्षाच्या 5 महिला, एसपी ऑफीस परिसर 60 वर्षाची 1 महिला, पाठक गल्ली येथील अनुक्रमे 7,24,28 वय वर्षाचे 3 पुरुष, कलामंदीर नांदेड येथील 26 वर्षाचा 1 पुरुष, बाबानगर नांदेड येथील 34 आणि 36 वर्षाचे 2 पुरुष, एमजीएम कॉलेज परिसर येथील 32 वर्षाची 1 महिला, आशिर्वाद गार्डन परिसरातील 37 वर्षाचा 1 पुरुष, मीलगेट येथील 59 वर्षाचा 1 पुरुष, महाविर सोसायटी नांदेड येथील 30 वर्षाचा 1 पुरुष, जुना कौठा येथील 30 व 34 वर्षाचे 2 पुरुष तर 53 वर्षाची 1 महिला, हडको नांदेड येथील 73 वर्षाचा 1 पुरुष व 45 वर्षाची 1 महिला, सिडको नांदेड येथील 68 वर्षाचा 1 पुरुष, चौफाळा नांदेड येथील 35 वर्षाचा 1 पुरुष, सगरोळी बिलोली येथील 62 वर्षाचा 1 पुरुष, मोहमंद नगर भोकर येथील 50 वर्षाची 1 महिला, हदगाव येथील 38 वर्षाचा 1पुरुष व 35 वर्षाची 1 महिला, तामसा येथील 18,27,28,33 वय वर्षाचे 4 पुरुष, शारदानगर देगलूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, 40 वर्षाची 1 महिला, मुछी गल्ली देगलूर येथील 57 वर्षाचा 1 पुरुष, रफिक कॉलनी येथील 53 वर्षाची 1 महिला, सत्यमनगर देगलूर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष, हत्तीपुरा कंधार येथील 65 वर्षाची 1 महिला, नायगाव येथील 72 वर्षाची 1 महिला, कोलंबी येथील 35 वर्षाची 1 महिला, धर्माबाद येथील 36 वर्षाचा 1 पुरुष, 20 व 54 वर्षाचे 2 पुरुष, फुलेनगर मुखेड येथील 8 वर्षाचा एक मुलगा व 25 वर्षाची 1 महिला, 15 व 35 वर्षाचे 2 पुरुष, अनुक्रमे 12,28,55 वर्षाच्या 3 महिला, 70 वर्षाचा 1 पुरुष, 65 वर्षाची 1 महिला, अंबुलगा येथील 32 व 39 वर्षाच्या 2 महिला, वडगाव येथील 22 वर्षाचा 1 पुरुष व 41 वर्षाची 1 महिला, जहूर येथील 5,7,25 वय वर्षाच्या 2 महिला, संतगाडगेबाबानगर येथील 60 वर्षाची 1 महिला, खरबखेड येथील 55 वर्षाचा 1 पुरुष, परभणी जिल्ह्यातील बरबडी येथील 80 वर्षाचा 1 पुरुष, गंगाखेड येथील 50 वर्षाचा 1 पुरुष हे सर्व आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे बिके हॉल श्रीनगर नांदेड येथील 16 व 47 वर्षाचे 2 पुरुष बाधित आढळले.
जिल्ह्यात 562 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 104, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 213, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 27, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 3, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 77, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 32, उमरी कोविड केअर सेंटर 10, लोहा कोविड केअर सेंटर येथे 10, हदगाव कोविड केअर सेंटर 9, भोकर कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 8, खाजगी रुग्णालयात 45 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 522,
घेतलेले स्वॅब- 12 हजार 281,
निगेटिव्ह स्वॅब- 9 हजार 814,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 72,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 324,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 8,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1,
मृत्यू संख्या- 57,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 693,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 562,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 309. 
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


वृत्त क्र. 687   
अंतिम मुदतीच्या दिवशी पोर्टलवर ताण येण्याची शक्यता
पीक विमा भरण्यास विलंब करु नये
नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रधानमंत्री पिक विमा भरण्यास शुक्रवार 31 जुलै 2020 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विलंब न करता जवळच्या सी.एस.सी. सेंटरवर, बँकेत किंवा स्वतः पोर्टलवर पिक विमा भरण्यास प्राधान्य देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी व्हावे असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत फक्त 50 टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. परंतु सध्या शेवटचे 5 दिवस उरलेले असून शेवटच्या 2-3 दिवसात पिक विमा पोर्टलवर प्रचंड ताण येतो. मागील काही दिवसात लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पिक विमा भरु न शकल्यामुळे पिक विमा भरण्यासाठी सीएससी सेंटर 24 तास चालू ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले असून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा लवकर भरावा, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
000000





नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 8.15 मि.मी. पाऊस
नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात रविवार 26 जुलै 2020 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 8.15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 130.34 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 387.63 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 43.49 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 26 जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 4.50 (451.47), मुदखेड- निरंक (288.00), अर्धापूर- 11.00 (374.33), भोकर- निरंक (403.23), उमरी- 6.67 (269.30), कंधार- 10.33 (294.50), लोहा- 1.17 (358.99), किनवट- निरंक (433.39), माहूर- निरंक (389.75), हदगाव- 1.14 (377.86), हिमायतनगर- निरंक (584.66), देगलूर- 27.83 (415.77), बिलोली- 22.20 (363.60), धर्माबाद- 15.33 (396.31), नायगाव- 15.60 (352.40), मुखेड- 14.57 (448.55). आज अखेर पावसाची सरासरी 387.63 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6202.11) मिलीमीटर आहे.
000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...