Thursday, May 18, 2017

वृ.वि.5560                                                                               28 वैशाख, 1939 (सायं.6.15 वा.)                                                                                             दि. 18 मे, 2017

एबीसीची मोहोर
लोकराज्य मराठीतील सर्वाधिक खपाचे मासिक
पुन्हा एकदा सिद्ध

मुंबई दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित 'लोकराज्यहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे मासिक ठरले आहे. ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन (एबीसी) ने नुकताच जुलै ते डिसेंबर 2016 चा देशातील सर्व वृत्तपत्रे / नियतकालिके यांच्या अधिकृत खपाचा अहवाल प्रकाशित केला असून यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. एबीसीच्या यादीत देशातील एकमेव शासकीय नियतकालिक आणि एकमेव मराठी मासिक हा मानही लोकराज्यने पटकाविला आहे. जुलै ते डिसेंबर 2016 या कालावधीत लोकराज्यचा खप 4 लाख 3 हजार 164 प्रती असा आहे.
महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे स्थान प्राप्त करतानाच 'लोकराज्यने देशातील सर्वाधिक खपाच्या मासिकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. पहिल्या क्रमांकावर मल्याळम भाषेतील 'वनिथाहे मासिक असून त्याचा खप 5 लाख 58 हजार 978 प्रती आहे. तिसऱ्या क्रमांकावर 'मल्याळम मनोरमाहे मासिक असून त्याचा खप 3 लाख 44 हजार 573 प्रती आहेत.
'लोकराज्यमासिकाने सातत्याने आपला पहिला क्रमांक कायम ठेवला असून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जाणारे हे एकमेव मासिक आहे. शासनाची अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहिती तसेच निर्णयधोरणेयोजना,यशकथामुलाखती यांचा समावेश या मासिकात करण्यात येतो. तरुण वाचकांमध्ये या मासिकाची लोकप्रियता असून विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या स्पर्धकांना हे मासिक अतिशय उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. या मासिकाचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांनी लोकराज्यचा खप पुढील काळात आणखी वाढवून देशात पहिला क्रमांकाचे नियतकालिक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मराठी सोबतच आता लोकराज्य उर्दूगुजरातीहिंदी भाषेतही प्रकाशित केले जाते. त्याचबरोबर 'महाराष्ट्र अहेडहे इंग्रजी भाषेत प्रकाशित केले जाते.
००००
संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी
सतर्कता, समन्वय, तत्परतेने प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 18 :-  आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी संघटीत आणि वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, अशा सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिल्या.  
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात मान्सून 2017 पूर्व तयारी आढावा बैठक श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य आदी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनात तातडीने माहिती उपलब्ध होणे आणि त्यावर लगेच कार्यवाही करणे अपेक्षित असते. त्यासाठी संपर्क व दळणवळणाच्या अनुषंगाने सशक्त यंत्रणा कार्यान्वीत करावी. पुरेशा मनुष्यबळ व साधनसामग्री सज्ज ठेवावी. आपत्ती काळात वित्त व जिवीत हानी टाळता आली पाहिजे. यासाठी तालुका व गावस्तरावर सर्वंकष कृती आराखडे तयार करावीत. हे कृती आराखडे तयार करताना मागील घटनांचा अभ्यास करावा. सामाजिक बदलाचे प्रतिबिंबाबरोबर आपत्तीच्या अनुषंगिक इतर घटनांचा विचार करुन हे आराखडे सर्व विभागाने वेळेत करावेत. प्रशिक्षीत व्यक्तींच्या नावांची यादी तयार करावी. नियंत्रण कक्ष स्थापन करावेत,  असे निर्देश त्यांनी दिले.
येत्या मान्सुनच्यादृष्टीने नाले सफाई दुरुस्तीवर भर देण्यात यावा. धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करावे, धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करावी. नदी, नाले, खोल पातळीचे डोह निर्माण झाले आहे अशा ठिकाणी धोक्याच्या इशाऱ्याचे फलक लावावेत. जिल्ह्यात पाऊस झाल्याने परिस्थिती निर्माण होते असे नाही तरी वरील भागात अतिवृष्टी झाल्याने तेथील धरणातून पाणी सोडल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होते. याचा विचार करुन योग्य नियोजन व सतर्कता बाळगली पाहिजे असेही श्री. डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता डी. के. शेटे यांनी ही जिल्ह्यातील आपत्तकालीन परिस्थिती नियंत्रणासंबंधी माहिती देवून करावयाच्या उपाययोजना संबंधी माहिती दिली.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजना संबंधी सादरीकरणातून माहिती देतांना नियंत्रण कक्ष स्थापन करुन 24 तास कार्यांन्वीत राहणार आहेत, असे सांगितले. संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासंबंधी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...