बेसबॉल छायाचित्र
Thursday, January 16, 2025
वृत्त क्र. 66
राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत
दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्र
राज्याच्या संघाचे वर्चस्व
नांदेड दि. 16 जानेवारी : राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र संघाने आपली आगेकूच कायम ठेवली आहे. शहरातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड व सायंन्स कॉलेज नांदेड येथे सुरु आहे.
या स्पर्धेत दि.16 जानेवारी,2025 रोजी झालेल्या सामन्याचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे. 19 वर्षे मुले- आंध्रप्रदेश- विद्याभारती (06-05 गुण), तामीलनाडू- पंजाब (00-13 गुण), आंध्रप्रदेश- सीबीएसईडब्लूएस (05-07 गुण), दिल्ली- हरीयाणा (04-01 गुण), चंदीगड- जम्मू कश्मिर (11-01), मध्यप्रदेश- आसाम (11-01), केरला- गुजरात (12-01), आसाम- केरला (00-10), दिल्ली-पंजाब (05-06), आसाम- गुजरात (05-06), मध्यप्रदेश- केरला (01-06), महाराष्ट्र- सीबीएसईडब्लूएस (01-01 गुण) तर 19 वर्षे मुली- छत्तीसगड- मध्यप्रदेश (10-00), आंध्रप्रदेश- जम्मु कश्मिर (12-02), आंध्रप्रदेश- हरियाणा (01-10), आसाम-पंजाब (00-12), चंदीगड- केरला (03-02), महाराष्ट्र- जम्मु कश्मिर (10-00), केरला- पंजाब (04-05), दिल्ली- गुजरात (13-02), चंदीगड- आसाम (16-01), चंदीगड-पंजाब (05-06) असा आहे.
या स्पर्धेकरीता तांत्रीक समिती सदस्य इंद्रजित नितनवार (अमरावती),शंकर शहाणे (परभणी), संतोष खेंडे (सोलापूर) हे आहेत तर पंच म्हणुन गणेश बेतुडे (छ.संभाजीनगर), आकाश साबणे (परभणी), मनिष मोकल (मुंबई शहर), राहुल खुडे (लातूर), विशाल कदम (हिंगोली), रोहित ठाकोर (पुणे), पवन सैरासे (अमरावती), प्रफुल वानखेडे (बुलढाणा), गौस शेख (नांदेड), हरिश डोनगांवकर (नांदेड), बालाजी गाडेकर (नांदेड), सायमा बागवान (परभणी), अर्चना कोलोड (नांदेड) आदी काम करीत आहेत.
सदर राष्ट्रीय स्पर्धा
पिपल्स कॉलेज व सायंन्स कॉलेज, नांदेड येथील मैदानावर आयोजीत करण्यात आले
असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं,
क्रीडाप्रेमी, रसीक
यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.
जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 65
व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला
कृषिक्षेत्रातील विविध योजनेचा आढावा
नांदेड दि. 16 जानेवारी :- सामुहिक शेततळे, हरितगृह, शेडनेटगृह, पॅहहाऊस, कांदाचाळ, प्लास्टिक मल्चींग बाबींची शेतकऱ्यांना माहिती देऊन त्यांना कृषि क्षेत्रातील विविध योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, अशी सूचना कृषि विभागाचे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी दिली.
13, 14 जानेवारी रोजी दोन दिवसीय नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, देगलूर उपविभागीय कृषि अधिकारी विठ्ठल गीते, किनवट उपविभागीय कृषि अधिकारी राजकुमार रणवीर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके, शेतकरी प्रतिनिधी प्रसाद देव, जिल्ह्याती तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
फळे, भाजीपाला व फुले क्लस्टर तयार केल्यास यातून स्थानिक उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. काढणीत्तोर व्यवस्थापन घटकातून रोजगार निर्मिती होईल. एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या विविध बाबींचा प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी केली. जेणे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनेच्या खर्चाचा व नविन कृति आराखड्याचाही आढावा त्यांनी घेतला.
व्यवस्थापकीय संचालक श्री. महिंद्रकर यांनी 14 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या. त्यात नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील शेतकरी बापुराव पुयड यांच्या शेतातील हरितगृहाची व त्यातील जर्बेरा लागवडीची पाहणी केली. त्यानंतर मुदखेड तालुक्यातील बारड येथील शेतकरी बालाजी उपवार यांच्या शेतातील शेडनेट हाऊस, शेडनेट हाऊस मधील रोपे उत्पादन व जिल्ह्यातील प्रथमच स्ट्रॉबेरीची लागवड केली असल्याचे त्यांनी पहाणी केली. त्यानंतर अर्धापुर तालुक्यातील धामदरी येथील श्रीमती गंगाबाई रामदास कदम यांच्या शेतातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी रोपवाटीका व त्यातील भाजीपाला रोपे उत्पादन याची पहाणी केली.
या दौरा कार्यक्रमात नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नांदेडचे तालुका कृषि अधिकारी संजय चातरमल, अर्धापूरचे तालुका कृषि अधिकारी विशाल बिऱ्हाडे हे उपस्थित होते.
00000
वृत्त क्र. 64
समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी
20 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिन
नांदेड दि. 16 जानेवारी :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 63
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड दि. 16 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यात 17 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपासून ते 31 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 जानेवारी सकाळी 6 वाजेपासून ते 31 जानेवारी 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील.
त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000
वृत्त क्र. 62
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे
शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी आवाहन
· शुक्रवार 17 जानेवारीला स्थानिक सुट्टी
नांदेड दि. 16 जानेवारी :- शुक्रवार 17 जानेवारी रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स निमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दैनंदिन सर्व कामकाज बंद राहणार आहे. त्याअनुषंगाने 17 जानेवारी रोजी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी घेण्यात आलेली अपॉईमेंट पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स्थलांतरीत करण्यात आली आहे.
अर्जदारांनी आपले अपॉईटमेंट ऑनलाईन सारथी प्रणालीवर तपासून सदर दिवशी कार्यालयीन वेळेत शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 61
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे
माहूर येथील शिबीर 21 जानेवारीला
नांदेड दि. 16 जानेवारी :- शुक्रवार 17 जानेवारी रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स निमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दैनंदिन सर्व कामकाज बंद राहणार असल्याने माहूर येथे आयोजित शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीचे मासिक शिबिर मंगळवार 21 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.
शुक्रवार 17 जानेवारी रोजी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता अपॉईमेंट घेतलेल्या अर्जदारांनी 21 जानेवारी रोजी माहूर येथील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 60
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2023-24
नांदेड जिल्ह्यातून अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि 16 जानेवारी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्अ क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी व संघटकांनी अर्ज करण्याच्या जिल्हा क्रीडा विभागाने केले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय दि.29 डिसेंबर,2023 अन्वये व शासननिर्णय दि.25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू/ व्यक्ती यांच्याद्वारा दि.14 जानेवारी ते 26 जानेवारी,2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.
00000
वृत्त क्र. 59
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे निवडणूक अधिकारी पॅनेलसाठी
31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड दि. 16 जानेवारी :- “ई” वर्गातील संस्था म्हणजे 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत 20 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत निवडणुक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात आली आहेत. अर्जदारांनी हे अर्ज शुक्रवार 31 जानेवारी अखेर पुढील संबंधित कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी केले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 20 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळु शकतील. यासंदर्भातील विहित नमुन्यातील अर्ज जाहिर नोटीस बोर्डावरही प्रसिद्ध केले आहेत.
हे अर्ज शासकीय विभागातील (सहकार विभागातील कार्यरत अधिकारी-कर्मचारी वगळुन), स्थानिक स्वराज्य संस्थेतील / सहकार संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी-कर्मचारी (वरिष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या कर्मचारी), प्रमाणित लेखापरीक्षक. वकील (पाच वर्षाचा कामाचा अनुभव). शासकीय सेवेतून, स्थानिक स्वराज्य संस्थेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचारी (वयाची 65 वर्षपेक्षा जास्त नसलेल्या) यांच्याकडुन मागविण्यात येत आहे.
याबाबतची जाहीर सुचना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातुर यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहकार भवन भूविकास बँक इमारत दुसरा मजला आयटीआय समोर नांदेड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला लातूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सहकार शक्ती इमारत जालना रोड बीड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहिला मजला धाराशिव या संबंधीत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 58
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सहकार्य ; नागार्जुना पब्लिक स्कुलचा गौरव
नांदेड दि.१६ जानेवारी : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रशिक्षण व अन्य निवडणूक कार्यासाठी मदत करणाऱ्या नागार्जुन पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला.
नागार्जुना पब्लिक स्कुल ,कौठा,नांदेड या शाळेने निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी तथा मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्या संपूर्ण प्रशिक्षणासाठी शाळेची इमारत, परिसर,सर्व सुविधा, साधनसामग्री, डिजिटल व्यवस्था आणि मनुष्यबळ पुरविले होते. अशा सर्व बाबींचे भरीव सहकार्य केल्यामुळे शाळेस गौरव सन्मानपत्र देवून अभिजीत राऊत, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या हस्ते नुकतेच जिल्हाप्रशासन कार्यालयात सन्मानित करण्यात आले.
डॉ. सचिन खल्लाळ, निवडणूक निर्णय अधिकारी 087 विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्या संकल्पनेतून नितेशकुमार बोलोलू,नायब तहसीलदार यांनी लेखन केलेले सुबक गौरव सन्मानपत्र तयार करण्यात आले होते. यावेळी अभिजीत राऊत यांनी असा उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन करुन शाळेचे कौतुक करुन आभार व्यक्त केले. भविष्यात असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. सदरील गौरव सन्मानपत्र नागार्जुना शाळेचे सचिव केशव गड्डम,प्रिसिंपाँल प्रा.शैला आर. पवार, लेखाविभाग प्रदीप पवार, सहसचिव श्रीकांत गड्डम,संचालिका श्रीमती दुर्गा श्रीकांत गड्डम,प्रशासनिक कार्यवाह मनोज महाराज, सुशील माळवतकर व मोईन खान यांनी स्विकारले. यावेळी नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलू,प्रशिक्षण कक्ष सदस्य संजय भालके,राजेश कुलकर्णी व मकरंद भालेराव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आर.जी.कुलकर्णी यांनी केले तर आभार एस.व्हि.भालके यांनी व्यक्त केले.
0000
बेसबॉल छायाचित्र
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...