Saturday, May 4, 2024

वृत्त क्र. 407

लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड दि. ४ मे :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 प्रक्रियेदरम्‍यान नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा विधानसभा मतदार संघामध्‍ये 7  मे  रोजी ज्‍याठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्‍याठिकाणा पासून  200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

 पक्षकारांना मंडपे उभारण्‍यास, दुकाने चालू ठेवण्‍यास व मोबाईल, कॉडलेसफोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे यांचा वापर करण्‍यास, संबंधीत पक्षांच्‍या चिन्‍हांचे प्रदर्शन करण्‍यास तसेच सर्व प्रकारचे फेरीवाले, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त इतर व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍यास याद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध करण्‍यात आले आहे.   

नांदेड जिल्‍ह्यातील 88-लोहा या विधानसभा मतदार संघामध्‍ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया 2024 करीता हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्‍हणुन दिनाक 7  मे  2024 रोजी  मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान संपेपर्यंत अंमलात राहील.

00000

वृत्त क्र. 406

८८ - लोहा विधानसभा क्षेत्रासाठी आज बस सुविधा उपलब्ध

 नांदेड महानगर साठी तहसील कार्यालयातून बसची व्यवस्था


नांदेड दि. ४ मे :  निवडणूक कर्तव्‍यासाठी नांदेड जिल्ह्यातील ज्या कर्मचाऱ्यांची   ८८-लोहा विधानसभा मतदार संघात ड्युटी लागली आहे त्यांना घेऊन जाण्यासाठी व आणण्यासाठी ठीक ठिकाणावरून बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

41-लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदान दि ७ मे रोजी पार पडणार आहे.सदरील निवडणुकीसाठी नियुक्‍त केलेल्‍या मतदान केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी,कर्मचारी यांना 88-लोहा विधानसभा मतदारसंघात घेऊन जाण्‍यासाठी प्रशासनाच्‍या वतीने वाहतूक व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.

  ८3-किनवट, 84-हदगांव, 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगांव खै, 90-देगलूर आणि 91-मुखेड या विधानसभा मतदारसंघातून ४१-लातुर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या दिनांक 5 मे रोजी सकाळी 06.00 वाजता खालील ठिकाणी वेळेवर उपस्थित रहावे.प्रशिक्षणासाठी 88-लोहा विधानसभा मतदारसंघा अंतर्गत मतदान केंद्रावर जाण्‍यासाठी खालील प्रमाणे बसेसच्‍या विधानसभानिहाय थांबे निश्चित करण्‍यात आलेली आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...