Friday, August 2, 2024

 वृत्त क्र 666

लोहा येथे बोगस खते विक्री करणाऱ्या  कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल

 

शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन

 

नांदेडदि. 2 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने खतेबियाणेरासायनिक औषधी व अन्य कृषी सामग्रीची जोरदार तपासणी सुरू केली आहे. लोहा तालुक्यात लोहा येथील बनावट युरिया व खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्यात आली आहे. विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

   

लोहा पंचायत समितीमध्ये शेतकरी ज्ञानेश्वर शंकर खैरे यांनी लोहा येथील संगम कृषी सेवा केंद्रातून बनावट (बोगस) खताची विक्री होत असल्याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर 24 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक निरीक्षक शैलेश हरी वाव्हळे यांनी रामदास गंगाधर बामणे यांच्या मालकीच्या लोहा येथील संगम कृषी सेवा केंद्रात जाऊन प्रत्यक्ष तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले कीइफको कंपनीचे बनावट खते आरसीएफ कंपनीचा बनावट युरिया अवैध या संग्रही केलेला आहे .

 

प्राथमिक अंदाजावरून इफको कंपनीच्या तपासणी अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी नमुने तपासले. त्यानंतर सदर नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोग शाळेमध्ये पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेने हे सर्व खते बनावट असल्याचे स्पष्ट केल्यामुळे तालुका कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रक निरीक्षक शैलेश वाव्हळे यांनी यासंदर्भात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रासायनिक खते नियंत्रण 1985 , अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाने या संदर्भात रामतीर्थ येथील रहिवासी असणारे रामदास गंगाधर बामणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारीची वाट बघू नका

दरम्यानया घटनाक्रमानंतर कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची खतेरासायनिक औषधीबियाणे याबाबत फसवणूक होणार नाही यासाठी सर्व गुण नियंत्रक निरीक्षकांनी कृषी केंद्रांची तपासणी करावी. या संदर्भातील नियमित अहवाल सादर करावेअसे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार करण्याची वाट न बघता या तपासण्या झाल्या पाहिजेत. कोणत्याही अधिकाऱ्याच्या क्षेत्रात असे काही आढळून आल्यास संबंधितांना ही जबाबदार पकडण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही ठिकाणी बनावट विक्री होऊन फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी कृषी विभागाला सूचना केल्या आहेत.

00000




वृत्त क्र 665

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी

इच्छूक मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 2 :- राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या मदरसांना या योजनेत अनुदान घेण्याची इच्छा आहेअशा इच्छूक नोंदणीकृत मदरसांनी 11 ऑक्टोंबर 2013 व 22 डिसेंबर 2023 च्या तरतुदीनुसार आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन समितीजिल्हाधिकारी कार्यालयनांदेड येथे 15 सप्टेंबर 2024 पर्यत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राहय धरले जाणार नाहीत.

पात्र मदरसांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत मदरशांकडून अल्पसंख्याक विकास विभाग अर्ज मागवित आहे. हे मदरसे धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. ही योजना सन 2024-25 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमध्ये जिल्ह्यातील पात्र मदरसांना पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करून जास्तीत जास्त 10 लक्ष रुपये इतक्या  मर्यादेपर्यंत अनुदान देण्यास मान्यता आहे. या योजनेची अंमलबजावणी करतेवेळी खालील अटींची पूर्तता करणाऱ्या  मदरसांना प्राधान्य देण्यात येईल.

मदरसा चालविणारी संस्था राज्यातील वक्फ बोर्डकडे नोंदणीकृत झालेली असावी. मदरसामध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे नियमित शिक्षण घेण्यासाठी नजिकच्या शाळेत प्रवेशित असावेत.  तसेच ज्या मदरसांमध्ये  कंत्राटी पध्दतीने नेमण्यात आलेल्या शिक्षकांद्वारे गणित व विज्ञान हे  विषय शिकविले  जातीलअशा मदरसांना प्राधान्य दिले जाईल व तसे  शिक्षणाधिकारी यांनी प्रमा‍णीत करणे आवश्यक राहील. एका इमारतीत एकच मदरसा असावा. या व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णय 11.10.2013 मधील इतर सर्व बाबी/अटी  व शर्ती कायम राहतील.

ज्या  मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्कृरत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ह्या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2013 व अर्जाचा नमुनाआवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेअसे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक विकास विभागाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र 664

शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड दि. 2 ऑगस्ट :- पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचे लाभ सुलभतेने मिळावे. पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विहीत कालावधीत आपल्या मोबाईलमध्ये‍ ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकाची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा  प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

क्षेत्रीय स्तरावरुन (Real Time crop data) पीक पाहणी रियल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर डाटा/ माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा  सक्रीय सहभाग घेणे,  पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणेकिमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध  करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य‍ प्रकारे मदत करणे शक्य  व्हावे  या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपचालू करुन त्यात पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पध्दत शासनाने सुरु केली आहे. 

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारावर विविध पिकाची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.  महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प ऑगस्ट 2024 पासून राज्यभर राबविण्यात येत आहे.  खरीप हंगाम 2024 साठी ऑगस्ट  ते 15 सप्टेंबर 2024 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी 3.0.2 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करून घ्यावे. तसेच ई-पिक पाहणी नोंदणीसाठी काही अडचण आल्यास ई पीक पाहणी राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्षाच्या 020 25712712 क्रमांकावर किंवा आपल्या गावचे तलाठीकृषी सहाय्यक संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे

00000

 वृत्त क्र 663

मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत

महाडीबीटी पोर्टलवर ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड, दि. ऑगस्ट :- सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत सन 2024-25 मध्ये चालू खरीप हंगामामध्ये निविष्ठा 100 टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहेत. मागील 10 दिवसापासुन अर्ज करण्याची प्रक्रिया पोर्टलवर सुरू असुन सद्यस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्जाची संख्या  कमी प्रमाणात असल्याने ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

शंभर टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप शंभर टक्के अनुदानावर लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in - farmer login या वेबसाईटवर ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावेत व या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.


अर्ज करणेची पध्दत mahadbt.maharashtra.gov.in - farmer login लाभार्थी शेतकरी यांचे युजर आयडी व पासवर्ड टाकावाअर्ज करा बाबीवर क्लिक करणेकृषि यांत्रिकीकरणबावी निवडा यावर क्लिक करणेमुख्य घटक बाबीवर क्लिक करणेकृषि यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यतपशिल बाबीवर क्लिक करूनमनुष्यचलीत औजारे घटक निवडणेयंत्र/औजारे व उपकरणे बाबीवर क्लिक करूनपिक संरक्षण औजारे निवडणेमशीनचा प्रकार बाबीवर क्लिक करून बॅटरीसंचलीत फवारणी पंप (गळीतधान्य) निवडणे जतन करा याप्रमाणे आहे.

00000

 विशेष लेख :    दि. 2 ऑगस्ट 2024

 

मरावे परी शरीर मागे उरावे...

आज अवयवदान दिवस

 

रीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे... अशी मान्यता आहे. मात्र आता शरीरही अमर होऊ शकते. आपल्या अमूल्य अशा दायित्वाच्या भावनातून शरीराचे अनेक अंग आपण दान करू शकतो. अनेकांना दृष्टी देऊन हजारोंना सृष्टी बघायला कारणीभूत ठरू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराची राख करायची की जातानाही दातृत्वाचा परमोच्च आनंद घ्यायचा याचा निर्णय घेणे म्हणजे अवयवदान करणे आहे. जेंव्हा एखादा व्यक्ती किंवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या जवळचा नातेवाईक अवयवदान करून गरजू व्यक्तीला ज्याला जगण्यासाठी अवयवांची गरज असते त्याला वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून अवयवाची मदत करतात त्याला अवयवदान म्हणतात.

 

18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या स्वेच्छेने शासनाला सांगून अवयव दान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत:निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

 

अवयव दान का करावे.. ?

जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे कीआपण एके दिवशी जग सोडून जाणार आहोत. आपला मृत्यू अटळ आहे. तो कोणालाही टाळता येणार नाही. आयुष्यभर आपण स्वतःसाठी जगलो. मृत्यूनंतर आपले शरीर जाळून राख करताना देखील आपण तीन क्विंटल लाकडासाठी तेरा वर्षे वयाची झाडे नष्ट करतो. प्रदूषण वाढविण्यात कारणीभूत ठरतो. हे आता परवडणारे नाही. त्यामुळे काही ठिकाणी मृतदेह लाकडाने जाळण्याऐवजी व्हाईट् कोलने जाळला. पुणे, नागपूरने व्हाईट कोलचा प्रयोग यशस्वी केला. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात 2019 मध्ये 589 मृतदेह व्हाईट कोलने दहन केले. तसा प्रयोग नांदेड महानगरपालिकेने करावा अशी अपेक्षा आहे.

 

परंपरा, रूढीचे अडथळे दूर सारा 

अवयवादांना दुसरा मोठा अडथळा परंपरा, रुढी, अंधश्रद्धेचा आहे. आपला समाज परंपरा प्रिय असला तरी बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून मानसिकता बदलली तर सर्वांचे कल्याण होईल. शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेला अवयवदानाच्या विषयी प्रचंड गैरसमज आणि अज्ञान आहे. परंपरा आणि रूढीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक अवयदानाविषयी तर्क वितर्क मांडून अवयवदान करण्याला बगल देतात. शिवाय विविध धर्माच्या रीती रिवाजानुसार अंत्यविधीचे प्रकार ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे अवयवदानाला अडथळे येतात. देशातील सर्वच धर्मगुरूंनी जरी अवयवादानाला समर्थन दिले असले तरी सर्वसामान्य जनतेची मानसिकता सहजासहजी बदलणार नाही. मानसिकता बदलासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची गरज आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामसभेत यासाठी ठराव होणे आवश्यक आहे. शाळांपासून अवयवदानाच्या चर्चेचा विषय मना-मनामध्ये रुजविण्याचे कार्य गरजेचे आहे.

 

अवयव दान तीन प्रकारे करता येते

जीवंतपणी : रक्त, यकृत ,स्वादुपिंड, फुफ्फु, मूत्रपिंड आणि आतड्याचा काही भाग दान केल्या जाऊ शकतो.

नैसर्गिक मृत्यूनंतर : नेत्र आणि त्वचा याशिवाय हृदयाची झडपत्वचेखालील आवरण, बंद कानातील हाडे, रक्तवाहिन्या दान केल्या जाऊ शकतात.

 

ब्रेनडेथ नंतर : नेत्र पटलेकर्ण पटल, मूत्रपिंड, त्वचा, हाडे, हा, पाय, गर्भाशय, यकृतहदय स्वादुपिंड आणि आतडे

ब्रेन डेडचा निर्णय घेणारी सरकारी समिती छत्रपती संभाजीनगर येथे आहे. झोनल ट्रान्स प्लांट को-ऑर्डिनेशन समिती पाच तासात रुग्णालयाशी, प्रशासक निवासी डॉक्टर, उपचार करणारे डॉक्टर यांची व्यवस्था करते. ज्यांना अवयवदानाची करण्याची इच्छा आहे त्यांनी या समितीकडे नाव नोंदणी गरजेचे आहे.

 

शासन स्तरावरही प्रयत्न सुरू

1984 ला भारत सरकारने अवयवदानाच्या कार्यालयाला मंजुरी दिल्यानंतर पंधरा वर्षानंतर 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन देशाला अवयव दानाचे आवाहन केले. त्यांना प्रतिसाद देत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या परिवारासह मुंबईतून या महाअभियानाला सुरूवात केली. राज्यात सध्या अवयवादानासाठी कार्य करणाऱ्या 25 सेवाभावी संस्था आहेत. यामध्ये  फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आणि सुनील देशपांडे यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. त्यांनी अवयवदानासाठी नऊ पदयात्रा काढल्या. 4 हजार किलोमीटर प्रवास केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, प्रत्येक अवयवदात्याच्या अंत्यसंस्काराला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्याला शहिदाचा सन्मान द्यावा. दुखी परिवाराचे सांत्वन करून भावनिक आधार द्यावा. त्यामुळे शासन, प्रशासन या चळवळीच्या पाठीशी आहे. राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना अवयवादानाची प्रक्रिया सुलभ करावीप्रत्येक रुग्णालयात अवयवदानाचा स्वतंत्र कक्ष सुरू करून तज्ञाची नेमणूक करावीलोकांना अवयवदान करण्यासंदर्भातील पत्रे उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर देखील मोठ्या प्रमाणात यासंदर्भातील जनजागृती होत असून नांदेडमध्ये आम्ही यासाठी झटत आहोत. या आमच्या अवयवदान यज्ञाला आपल्या स्वीकृतीचे दान मिळावे ही अपेक्षा आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. आपल्याला स्वतः सुरुवातीला यासंदर्भात स्वीकृती द्यावी लागते. त्यानंतर मृत्यू पश्चात नातेवाईकांनी याबाबत संबंधितांना माहिती देणे आवश्यक आहे.

 

नांदेडची मोहिमेत आगेकूच

17 ऑक्टोंबर 2016 रोजी नांदेड पहिले अवयवदान सुधीर रावळकर यांचे झाले. त्यानंतर 3 जुलै 2024 रोजी अभिजीत ढोकेचे अवयदान झाले. अवयवदानाच्या प्रचारात आपण स्वतःही 2017 पासून वाहून घेतले आहे. या मोहिमेत जिल्ह्याच्या  यशात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची यंत्रणा व शहरातील खासगी वैद्यकीय संस्थांनी देखील आपले दायित्व निभवले आहे. नांदेड मधील एका खाजगी हॉस्पिटलने तर परवा सहावे अवयव दान करून ग्रीन कॉरिडोर यशस्वी केला. शहरातील खासगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. नांदेडमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी अवयदानाला स्वीकृती दिली आहे. नांदेडमध्ये सामान्य नागरिकाला कोणालाही अवयव दान करायचे असेल तर आपल्या हयातीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय विष्णुपुरी याठिकाणी आपला अर्ज देता येतो. आपल्या पश्चात आपल्या नातेवाईकांच्या परवानगीने मृतदेह देण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. यासंदर्भातले स्वतंत्र व विस्तृत लिखाण मी स्वतः केले आहे. याबाबतचे विपुल साहित्य माझ्याकडे उपलब्ध आहे. नागरिकांना ते दिले जाऊ शकते. मात्र या एका अभियानात अगदी शाळकरीवयापासून प्रबोधन होण्याची गरज वाटत असून आजच्या अवयवदान दिनाला याबाबतची वचनबद्धता मनामनात व्हावी हीच अपेक्षा.

 

माधव अटकोरे

ज्येष्ठ पत्रकार, नांदेड

00000




  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...