एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कूलमध्ये प्रवेशाबाबत आवाहन
नांदेड
(जिमाका) दि. 22 :- आदिवासी विकास विभागा अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या
एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कुलमध्ये प्रवेशपुर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाईन
पध्दतीने परीक्षा घेऊन गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. परंतु सद्यस्थितीत कोरोना (कोविड-19) विषाणुच्या
वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकलव्य
मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपूर्व ऑनलाईन स्पर्धा परीक्षा रद्द करुन तथापी त्या
ऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या (शैक्षणिक वर्ष 2010-20) पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची
गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.
प्रवेश घ्यावयाची
इयत्ता |
गुण व गुणपत्रकाची
आवश्यकता |
सन 2019-20
च्या प्रथम सत्राचे एकुण 900 गुणांचे गुणपत्रिका
mtpss.org.in या लिंकवर अपलोड करावे. |
इयत्ता 6 वी |
इयत्ता 5 वी प्रथम सत्र |
|
इयत्ता 7 वी |
इयत्ता 6 वी प्रथम सत्र |
|
इयत्ता 8 वी |
इयत्ता 7 वी प्रथम सत्र |
|
इयत्ता 9 वी |
इयत्ता 8 वी प्रथम सत्र |
अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती यांचे अधिनस्त येत असलेल्या
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद यांच्या
कार्यक्षेत्रात असलेल्या 12 जिल्ह्यातील सर्व
शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक
शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित/विनाअनुदानीत
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची मागील शैक्षणिक वर्षातील प्रथम
सत्राच्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. विद्यार्थ्यांचे
प्रवेश हे ज्या वेळी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती नमूद
केल्याप्रमाणे, एकलव्य पब्लीक
स्कुल चिखलदरा, जि.अमरावती, सहस्त्रकुंड जि.नांदेड व बोटोणी
जि.यवतमाळ या ठिकाणी
असलेल्या एकलव्य पब्लीक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
mtpss.org.in
या लिंकवर ज्या जिल्ह्यातील ज्या
शाळेतील विद्यार्थ्याचे आवेदनपत्र यापुर्वी भरलेले आहेत. त्या
विद्यार्थ्यांनी/पालकांनी/संबंधित शाळेतील
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची मार्कलिस्ट वरील लिंकवर अपलोड
करावी. याबाबत
विद्यार्थ्यांस गुणानुक्रमे निवड झाल्यास आयुक्तालयाकडुन एस.एम.एस. द्वारे कळविण्यात
येईल, असे आवाहन अपर
आयुक्त, आदिवासी विकास
अमरावती यांनी केले आहे.
*****