Monday, February 1, 2021
लेख
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 2 फेब्रुवारी पासून लागू
नांदेड (जिमाका) दि. 1 :- नांदेड जिल्ह्यात 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 16 फेब्रुवारी, 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार, 2 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मंगळवार 16 फेब्रुवारी, 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा
जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक
वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना
तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना
राहतील.
000000
मध्यप्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पिकर
रामेश्वर शर्मा यांचा नांदेड जिल्हा दौरा
नांदेड, (जिमाका) दि. 1:- मध्यप्रदेश विधासभेचे प्रोटेम स्पिकर रामेश्वर शर्मा हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.
सोमवार, दि. 1 फेब्रुवारी 2021 रोजी शिर्डी येथून सकाळी 8 वाजता निघून औरंगाबाद-परतूरमार्गे मोटारीने नांदेड येथे सायं. 5 वाजता आगमन. मंगळवार 2 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजता नांदेड येथून निघून हिंगोली-कारंजा-मुलताई-बैतूल-होशंगाबादमार्गे भोपाळकडे मोटारीने प्रयाण करतील.
0000
26 कोरोना बाधितांची भर
28 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 1:- सोमवार 1 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 26 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 20 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 6 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 28 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 403 अहवालापैकी 373 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 563 एवढी झाली असून यातील 21 हजार 450 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 323 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 12 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 586 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 15, गोकुंदा कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, बिलोली तालुक्यातंर्गत 3, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 28 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.06 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 13, भोकर तालुक्यात 1, कंधार 1, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 1, नायगाव 1 असे एकुण 20 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 1, उमरखेड 1, मुखेड 4 असे एकूण 6 बाधित आढळले.
जिल्ह्यात 323 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 9, मुखेड कोविड रुग्णालय 7, हदगाव कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर 13, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 207, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 35, खाजगी रुग्णालय 12 आहेत.
सोमवार 1 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 91 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख
11 हजार 723
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 84
हजार 836
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार
563
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21
हजार 450
एकुण मृत्यू संख्या-586
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.06
टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-02
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-396
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-323
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-12.
0000
रेतीचा अवैध साठा रिकाम्या जागेवर असल्यास
जागा मालकांवरही गुन्हे होतील दाखल
-
जिल्हादंडाधिकारी
डॉ. विपीन इटनकर
नांदेड (जिमाका) दि. 1 :- जिल्ह्यातील गोदावरी पात्र व इतर नदी क्षेत्रातील अवैधरित्या होणाऱ्या रेती उत्खननाला आळा बसण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तराफे उध्वस्त करण्यासमवेत रेतीचे वाहने जप्त केली जात आहेत. अवैध रेती उत्खननाला आळा बसावा यासाठी आता आम्ही अधिक कठोर पावले उचलत असून नांदेड महानगर पालिका, जिल्ह्यातील नगर परिषदा व ग्राम पंचायतीच्या हद्दीत जिथे कुठे मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा उपलब्ध असेल तो जिल्हा प्रशासनातर्फे जागच्या जागीच जप्त करुन जाच्या मालकीची ती जागा / प्लॉट आहे त्या प्लॉटधारकाविरुध्द गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिला.
त्यांच्या अध्यक्षतेखाली आज अवैध रेती उत्खनाना बद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार किरण अंबेकर उपस्थित होते. सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभाग घेतला.
रेतीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता ज्या नागरिकांनी बांधकासाठी रेती घेवून ठेवलेली आहे. त्यांनी रेतीच्या पावत्या तपासणी पथकाला दाखवाव्यात. रेतीच्या पावत्या देणे हे कायद्याने बंधनकारक असून अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी महसुलच्या पथकांना जनतेने सहकार्य करावे असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.
0000
वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...