Monday, February 8, 2021

 

पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा

                                                         -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड, (जिमाका) दि. 8:- पाण्याचा एक-एक थेंब महत्वाचा असून पाणी वाचविणे ही काळाची गरज आहे. पाणी व्यर्थ वाया जाऊ न देता पाण्याचा योग्य वापर करावा. पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

जलसंधारण मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 700 जिल्ह्यामध्ये कॅच द रेन ( पावसाचे पाणी साठवा) ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 100 गावाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील गावाचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत गावातील किमान 100 कुटूंबाना छतावर पडणारे, शेतात पडणारे तसेच गावाच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी साठवण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी , चंदा रावळकर  यांनी दिली. 

नेहरू युवा केंद्राच्यावतीने युवा कार्यक्रम व सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला जिल्हास्तरीय कॅच द रेन अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी कॅच द रेनच्या लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वन विभाग, सिंचन विभाग एनजीओ व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

0000

 

14 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

22 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 8:- सोमवार 8 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 14  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 10 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 4 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 22 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 176 अहवालापैकी 161 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 673 एवढी झाली असून यातील 21 हजार 634 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 243 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. सोमवार 8 फेब्रुवारीला व्यंकटेशनगर नांदेड येथील 74 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 589 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 9, माहूर तालुक्यांतर्गत 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, जिल्हा रुगणालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, मुदखेड तालुक्यातर्गंत 1, खाजगी रुग्णालय 3  असे एकूण 22 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, लोहा तालुक्यात 1, कंधार 2 असे एकुण 10 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2, मुखेड तालुक्यात 1, देगलूर 1 असे एकूण 4 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 243 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 5, मुखेड कोविड रुग्णालय 4, किनवट कोविड रुग्णालय 2, महसूल कोविड केअर सेंटर 4, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड  मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 149, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 38,  हैद्राबाद येथे संदर्भित 1, नांदेड खाजगी रुग्णालय 10 आहेत.   

सोमवार 8 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 163, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 93 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 14 हजार 771

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 87 हजार 728

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 673

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 634

एकुण मृत्यू संख्या-589

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-243

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-09          

00000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात

मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड, (जिमाका) दि. 8:- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 9 फेब्रुवारी 2021 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 

 

अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी

रस्ते वाहतुक नियमाचे पालन करा

-         सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले 

नांदेड, (जिमाका) दि. 8:- रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी रस्ते वाहतूक विषयक नियमाचे पालन करावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा जागृतीपर प्रबोधन कार्यक्रम कंधार येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे संपन्न झाला. यावेळी रस्ते अपघातांची कारणे व ते टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शनात ते बोलत होते. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 32 व्या रस्ते सुरक्षा अभियान- 2021 च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रस्ते वाहतूकविषयक नियमांची माहिती दिली. अपघात प्रसंगी जखमींना मदत करण्याचे आवाहन वाहन निरीक्षक मेघल अनासने यांनी केले. रस्ता सुरक्षेची शपथ मुख्याध्यापक  श्री. अंबटवाड यांनी दिली. यावेळी रस्ते सुरक्षा विषयक माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. शेवटी शाळेच्या परिसरात दुचाकी व सायकलला रिफ्लेक्टर लावण्यात आले. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. रेणके यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक, सतीश जोशी, लक्ष्मण मस्के यांनी परिश्रम घेतले.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...