Tuesday, November 17, 2020

 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या

राष्ट्रीय माध्यम पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

            मुंबई, दि. 17 :मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया अवॉर्ड) देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रसारमाध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे दि. 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

            विविध माध्यमातून मतदार जनजागृती करणाऱ्या माध्यम संस्थांसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये वर्तमानपत्र (प्रिंट मीडिया), इलेक्ट्रॉनिक (दूरचित्रवाहिनी) मीडिया, इलेक्ट्रॉनिक (रेडिओ) मीडिया व ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया अशा चार विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. माध्यमांद्वारे सुलभ मतदान, मतदान प्रक्रियेसंदर्भात जागृती, मतदानाचे महत्त्व आदी विषयांवर विविध माध्यमातून जनजागृतीचे उत्कृष्ट काम करणाऱ्या माध्यमांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

          भारत निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पुरस्कारांसाठी माध्यम संस्थांची निकषांच्या आधारे शिफारस करण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी व माध्यम संस्थांनी आपले अर्ज 18 नोव्हेंबरपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, 6 वा मजला, मंत्रालय विस्तार, मुंबई 400032 ईमेल ceo_maharashtra@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत. पुरस्कारांचे निकष आणि अटींबाबत अधिक माहिती आयोगाच्या https://eci.gov.in/files/file/12547-national-media-award-for-best-campaign-on-voters-education-awareness-2020-memorandum-reg या लिंकवर उपलब्ध आहे.

          माध्यम संस्था भारत निवडणूक आयोगाकडे थेट अर्जसुद्धा करू शकतात. त्यासाठीचे अर्ज दि. 20 नोव्हेंबरपर्यंत श्री. पवन दिवाण, अवर सचिव (संवाद), भारतीय निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रस्ता, नवी दिल्ली 110001, फोन नं. 011-23052133, ई मेल media.election.eci@.com, pppaaawandiwan@eci.gov.in या पत्त्यावर पाठवावेत.

००००

 

18  बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

    तर 32 कोरोना बाधितांची भर   

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 18 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 32 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 19 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. 

आजच्या एकुण 419 अहवालापैकी  386 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  19 हजार 694 एवढी झाली असून यातील  18  हजार 719 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 243 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 18 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज रोजी प्राप्त अहवालानुसार एकाही रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही. तर आज बरे झालेल्या बाधितांमध्ये खाजगी रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 6, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3 असे एकूण 18 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 16, देगलूर तालुक्यात 1, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1 असे एकुण 19 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 13  बाधित आढळले. 

जिल्ह्यात 242 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 32, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 28, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 14, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 71, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 3, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 14, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, खाजगी रुग्णालय 24, औरंगाबाद येथे संदर्भित 2, अकोला येथे संदर्भित 1, लातूर  येथे संदर्भित 4, हैदराबाद येथे संदर्भित 1 आहेत.  

मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 168, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 82 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 29 हजार 70

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 5 हजार 840

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 694

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 719

एकूण मृत्यू संख्या- 541

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-406

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-243

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 18. 

फटाक्यांच्या धुरामुळे कोविड बाधित  रुग्णांना व श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना त्रास अधिक वाढवू शकतो. त्यामुळे ही दिवाळी फटाके विरहित दिवाळी म्हणून साजरी करावी. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त

खालील पुरावे असतील ग्राह्य 

नांदेड, दि.17 (जिमाका):-  आगामी 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पुढील कागदपत्र ग्राह्य धरले जातील. यात 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) पॅन कार्ड 4) पारपत्र 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. 

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणूक आयोगाचे दि.10.11.2020 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील, असे उप आयुक्त (सा.प्र.) तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, 5-औरंगाबाद‍ विभाग पदवधीर मतदारसंघ औरंगाबाद यांनी कळविले आहे.

****

 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

औरंगाबाद ,दि.17 (विमाका):-  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10  उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. 1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद 2) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड 3) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद 4) जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद 5) प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड 6) विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना 7) विवेकानंद शशीकांत उजळंबकर, लातूर 8) शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद 9)  संजय शहाजी गंभीरे ,बीड 10) संदिप बाबुराव कराळे, नांदेड.

05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) बोराळकर शिरीष (पक्ष : भारतीय जनता पाटी) औरंगाबाद 2) सतीश भानुदासराव चव्हाण (पक्ष: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) औरंगाबाद 3) अब्दुल रऊफ (पक्ष : समाजवादी पार्टी) औरंगाबाद 4) अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष : राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर 5) कुणाल गौतम खरात (पक्ष : ऑल इंडिया मजलिस इस्तेहादुल मुस्लमीन (AIMIM) औरंगाबाद 6) ढवळे सचिन राजाराम (पक्ष : प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद 7) प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (पक्ष : वंचित बहुजन आघाडी) परभणी 8) डॉ.रोहित शिवराम बोरकर (पक्ष : आम आदमी पार्टी) पुणे 9) शे.सलीम शे.इब्राहिम (पक्ष : वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी 10) सचिन अशोक निकम (पक्ष : रिपब्लिकन सेना) औरंगाबाद 11) अशोक विठ्ठल सोनवणे (पक्ष : अपक्ष ) औरंगाबाद 12) ॲड./प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ' के.सागर ' (पक्ष : अपक्ष ) नांदेड 13) आशिष आशोक देशमुख (पक्ष : अपक्ष) बीड 14) उत्तम बाबुराव बनसोडे (पक्ष : अपक्ष) नांदेड 15) काजी तसलीम निजामोद्दीन (पक्ष : अपक्ष) उस्मानाबाद 16) कृष्णा दादाराव डोईफोडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 17) ॲड.गणेश नवनाथ करांडे (पक्ष : अपक्ष) बीड 18) घाडगे राणी रवींद्र (पक्ष : अपक्ष) बीड 19) दिलीप हरिभाऊ घुगे (पक्ष : अपक्ष), हिंगोली 20) पोकळे रमेश शिवदास (पक्ष : अपक्ष) बीड 21) भारत आसाराम फुलारे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 22) ॲड. (डॉ.) यशवंत रामभाऊ कसबे (पक्ष : अपक्ष) परभणी 23) रमेश साहेबराव कदम (पक्ष : अपक्ष) नांदेड 24) राम गंगाराम आत्राम (पक्ष : अपक्ष) लातूर 25) वसंत संभाजी भालेराव (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 26) विलास बन्सीधर तांगडे (पक्ष : अपक्ष) जालना 27) डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 28) विशाल उध्दव नांदरकर (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 29) ॲड.शरद बहिणाजी कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 30) ॲड.शहादेव जानू भंडारे (पक्ष : अपक्ष) बीड 31) ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (पक्ष : अपक्ष) बीड 32) शेख हाज्जू हुसेन पटेल (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद 33) समदानी चॉदसाब शेख (पक्ष : अपक्ष) नांदेड 34) सिध्देश्वर आत्माराम मुंडे (पक्ष : अपक्ष) बीड 35) संजय तायडे (पक्ष : अपक्ष) औरंगाबाद.

****

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...