Saturday, November 3, 2018

लेख


कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन
                                    - रविकुमार सुखदेव,
उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड
         द्यस्थितीत कपाशीचे पीक बोंडे पक्वता वेचणीच्या अवस्थेत आहे. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान 29.ते 32. सें रात्रीचे तापनान 11. ते 14. से तर दिवसाची आर्दता 71 ते 80 टक्के तर रात्रीची आर्दता 26 ते 35 टक्के तर अत्यंत पोषक आहे. यावर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयापासून ते ऑक्टोबरच्या तिस-या आठवडयापर्यत सरासरी दिवसाचे तापनामान 35 से. असल्यामुळे या अळीचा प्रादूर्भाव वाढण्यास अटकाव झाला होता. परंतू आता यापुढे तापमान जसे जसे कमी होत जाईल हे तापमान वरिल तापमानाच्या श्रेणीमध्ये (टप्यामध्ये) येईल तशी गुलाबी बोंडअळीच्या प्रादूर्भावात वाढ होईल.
        गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी नियमित र्वेक्ष करुन फेरोमोन सापळयामधील पतंग दर आठवडयाने मोजून नष्ट करावे. शेतामध्ये लावलेल्या सापळयामधील पतंग दर आठवडयाने मोजून नष्ट करावे. शेतामध्ये लावलेल्या सापळयामधील कामगंध वडया (ल्यूर) वेस्टनामधील सुचनेनुसार बदलाव्यात प्रत्येंक शेतकरी बंधूनी एकरी कमीतकमी आठ फेरामोन सापळे लावून सापळयात अडकलेले पतंग नष्ट करण्याची मोहीम राबवावी.
तसेच प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनिधीत्व करतील अशी 20 झाडे निवडावीत. निवडलेल्या झाडावर मध्यम आकाराचे, मध्यम पक्व झालेले बाहेरून किडके नसलेले एक बोड अशी 20 बोंडे तोडून त्यामधील जींवत अळयांची संख्या मोजून, त्यामध्ये जर दोन किडकी बोडे किेंवा दोन पांढरी / गुलाबी रंग धारण कर असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे समजून झाडावर पुरेशी हिरवी बोंडे असल्यास शेतकरी बंधूनी खालीलप्रमाणे रासायानिक किटकनाशकाची फवारणी करावी आवश्यता भासल्या परत 12 ते 15 दिवसाचे अंतराने (आर्थिक नुकसान संकेत पातळीवर आधरित) दुसरी फवारणी करावी.प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळे रासायानिक किटकनाशके वापरावे.
 द्यस्थितीत बागाईत कपाशीवर प्रादूर्भावास नुकतीच सुरुवात झालेल्या क्षेत्रावर टायझेाफॉस 40 टक्के प्रवाही 30 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 10 मिली  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  जेथे प्रादूर्भाव 10 टक्याच्यावर आहे अशा ठिकाणी मिश्र किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामध्ये टायझाफॉस 35 टक्के+ डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17  मिली किंवा क्लोरेट्रेनिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा इंडॉक्झीकार्ब 14.5 टक्के + सीटामाप्रीड 7.7 टक्के 10 मिली किंवा क्लोपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली.
      कोरडवाहू पिकाची स्थिती, पाण्याचा ताण पिकाची उर्वरित कालावधी लक्षात घेवूनच फवारणीचा निर्णय घ्यावयाचा आहे. जेथे ओलीताची सोय आहे त्यांनी हलके पाणी देऊनच फवारणी करणेपूर्वी उमलेल्या बोंडातील कापूस वेचूनच फवारणी करावी शेतकरी बंधूनी कोणत्याही परिस्थितीत कपाशीची फरदड घेऊ नये. सर्वसाधारण  तीन ते चार वेचण्या झाल्याबरोबर कपाशीचे पिक काढून टाकावे.
कापूस साठवणूक संकलन केंद्र ,जिनींग मिल्स .ठिकाणी सुध्दा कापूस यावयास सुरूवात झाली. तेथे आता पासूनच साफ सफाई मोहिम राबून परिसरामधील कापूस जिंनीग नंतर चाळणीवरच्या अळया,कोश खराब कापूस .ची वेळोवेळी त्वरित विल्हेवाट लावावी त्या परिसरात प्रत्येकी 15 ते 20 फेरोमन सापळे लावावेत तसेच प्रकाश सापळयाव्दारे अडकलेले पत वेळोवेळी नष्ट करणे गरजेचे आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...