Monday, February 26, 2018


प्रेस नोट

        खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याच्या याद्या निरनिराळया व्हॉटसऍ़प ग्रुपवर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. अनेक पानांची पीडीएफ फाईल व्हॉटसऍ़पवर आल्यावर आपले नाव त्यात आहे का हे पाहण्याचा शेतकरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. परंतु शासनाने अद्याप पीक विमा जाहिर केलेला नाही. खरीप पिकांचा पीक विमा जाहिर करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरु आहेत. लवकरच खरीप पिक विमा जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्या व्हॉटसऍ़पवर फिरत असलेल्या यादीवर विश्वास ठेवू नये असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळवले आहे.

00000

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यात मंगळवार 13 मार्च 2018 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 13 मार्च 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.  
000000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...