Wednesday, January 15, 2025

 उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक 

नांदेड दि. 15 जानेवारी : नांदेड येथील मूळ निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथील उपसंचालक अनिल आलूरकर यांच्या मातोश्री श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी अल्पशा आजाराने अमरावती येथे आज निधन झाले. 

श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांच्यावर आज बुधवारी 15 जानेवारी रोजी नांदेड येथील गोवर्धन घाटावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती वनमाला लालोजीराव आलूरकर यांच्या पश्चात महानगरपालिकेतील अधिकारी श्री पवनकुमार आलूरकर, उपसंचालक अनिलकुमार आलूरकर, बँकेचे अधिकारी प्रसाद आलूरकर ही तीन मुले व मुलगी श्रीमती अलका माधवराव चुकेवाड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.  

0000



वृत्त क्रमांक 57

सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न 

नांदेड, दि. १५ जानेवारी : सहय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयाच्या वितीने दिनांक 25.12.2024 रोजी सकाळी 10.00 वा. मादसवार ईस्टेट क्रिडांगण नांदेड येथे  जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर जिल्हा क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन श्रीमती शिवकांता देशमुख, जिल्हा क्रिडा मार्गदर्शक यांचे हस्ते झाले.

जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवानंद मिनगीरे,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन जी.एच. भायेगांकवर, गृहपाल ,श्रीमती लक्ष्मी गायके, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक .पी.जी. खानसोळे, समाज कल्याण निरिक्षक हे होते.  

क्रिकेट स्पर्धेमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण क्रिकेट संघाचे  विजय झाले. तसेच खोखो स्पर्धेमध्ये शासकीय निवासी शाळा संघाचा विजय झाला.व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण संघाचा विजय झाला. तसेच रस्सीखेचमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण संघाचा  विजय झाला. 

वैयक्तीक खेळामध्ये बुध्दीबळ स्पर्धा, 100 मीटर धावणे स्पर्धा ,200 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये शासकीय अनु.जाती निवासी शाळा हदगांवचे कर्मचारी मारोती चरकेवाड यांचा प्रथम क्रमांक आला व शासकीय अनु.जाती निवासी शाळा माहूरचे कर्मचारी सदशिव सुदेवाड यांचा द्व‍ितीय क्रमांक आला. तसेच 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये सहय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील विजय गायकवाड  यांचा प्रथम क्रमांक आला व शिवानंद मिणगीरे,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचा द्व‍ितीय क्रमांक आला.   वसतिगृह भागातील उमाकांत जाधव मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर यांचा 100मीटर धावणे स्पधेत प्रथम क्रमांक आला. तर गंभीर  शेंबेटवार शासकीय वसतिगृह नांयगाव यांचा  द्व‍ितीय क्रमांक आला. महिला 100 मीटर धावणे स्पर्धामध्ये श्रीमती रोहिणी जोंधळे यांचा प्रथम क्रमांक आला तर  श्रीमती लक्ष्मी गायके यांचा द्व‍ितीय क्रमांक आला. 

तसेच 200 मीटर धावणे स्पर्धेमध्ये  शासकीय अनु.जाती निवासी शाळा हदगांवचे कर्मचारी मारोती चरकेवाड यांचा प्रथम क्रमांक आला तर व शासकीय अनु.जाती निवासी शाळा माहूर चे कर्मचारी सदशिव सुदेवाड यांचा द्व‍ितीय क्रमांक आला.सहय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील शेख मेसीन यांचा प्रथम क्रमांक आला व  शेख रहीम यांचा द्व‍ितीय क्रमांक आला. वसतिगृह भागातील श्री राजेश्वर भोसले मुलांचे शासकीय वसतिगृह हदगांव  प्रथम क्रमांक आला तर सचिन श्रीमनवार मुलांचे शासकीय वसतिगृह भोकर यांचा  द्व‍ितीय क्रमांक आला.बुध्दीबळ स्पर्धेमध्ये विजय पकाने याचा प्रथम क्रमांक आला.

0000

वृत्त क्रमांक 56

रस्त्यावरचे 34 टक्के मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळे 

•  रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये हेल्मेट, सीटबेल्ट वापरा मोबाईल पासून सावध रहा 

नांदेड दि. 15 जानेवारी : रस्त्यावर होणाऱ्या अपघातामध्ये 34 टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यापूर्वीच स्वसुरक्षा म्हणून हेल्मेटचा वापर करावा. सीट बेल्ट वापरावा. वाहन चालवतांना भ्रमणध्वनीचा उपयोग करणे टाळावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

एका वर्षामध्ये फक्त नांदेड सारख्या छोट्या जिल्ह्यात 350 वर नागरिकांचा अपघातात मृत्यू होतो. एखाद्या महामारीप्रमाणे हा आकडा आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनधारक एकदा वाहन चालवायला लागला की अपघाताच्या धोक्यामध्ये आला हे निश्चित असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. त्यामुळे या रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये सर्व नागरिकांनी हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट वापरणे, मोबाईल न वापरणे, दारू पिऊन वाहन न चालविणे, ओव्हरस्पिड टाळणे, आपल्या वाहनांना प्रखर प्रकाश असणाऱ्या एलईडी लाईट न वापरणे यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

00000





 वृत्त क्रमांक 55

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी 

आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयात सादर करावी 

नांदेड दि. 15 जानेवारी :  फेब्रुवारी महिन्याचे अनुदान शासन संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहे. मात्र त्यासाठी लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तहसिल कार्यालयात उपलब्ध करण्यात यावी, असे आवाहन सं.गां.नि.योजनेचे तहसिलदार संजय वरकड यांनी केले आहे. 

संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या अद्यावत आधारकार्ड, आधारसंलग्न मोबाईल क्रमांक, बँकखाते दर्शविणारे पासबुक आदी सर्व माहिती तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात सादर करावे. तसेच संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे ही माहिती उपलब्ध करावी, असे आवाहन तहसिलदारांनी केले आहे. 

000

 वृत्त क्रमांक 54

नांदेड समाज कल्याण विभागामार्फत १७ जानेवारीपासून विभागीय क्रीडा स्पर्धा 

नांदेड, दि. १५ जानेवारी :समाज कल्याण विभागांतर्गत नांदेड येथे दिनांक 17  व 18 रोजी सकाळी 8.00 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रांगणात समाज कल्याण अस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांच्या  विभागीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर विभागीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

सदर क्रिडा स्पर्धा करिता समाज कल्याण विभागाती लातूर,उस्मानाबाद,हिंगोली नांदेड जिल्हयातील शासकीय मुला-मुलींचे निवासी शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थीनी तसेच अधिकारी कर्मचारी हे सदर क्रिडा स्पर्धचे स्पर्धक रहणार आहेत.  

समाज कल्याण विभागीय क्रिडा स्पर्धा मध्ये आऊडोअर(क्रिकेट,खोखो,कबड्डी,व्हॉलीबॉल,थाळीफेक,रस्सीखेच, फुटबॉल) व इनडोअर क्रिडा स्पर्धा(बॅडमिंटन,टेबलटेनिस,बुध्दीबळ)घेण्यात येणार आहेत. सदर विभागीय क्रिडा स्पर्धा करिता शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सर्व  विभागाचे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

तसेच वैयक्तीक खेळामध्ये बुध्दीबळ स्पर्धा, 100मीटर धावणे स्पर्धा ,200 मीटर धावणे 400 मी.धावणे , लांब उडी, थाली फेक, या स्पर्धामध्ये महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग रहणार आहे अशी माहिती  शिवानंद मिनगीरे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी दिली आहे.

000000

वृत्त क्रमांक 53

राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे शानदार उदघाटन 

 महाराष्ट्र संघाची विजयी सलामी 

नांदेड दि. १५ जानेवारी : एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे बुधवारी सकाळी नांदेड येथील पिपल्स कॉलेजमध्ये शानदार उद्घाटन झाले. देशातील अनेक राज्यांच्या चमू या ठिकाणी सहभागी झाल्या असून क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. 

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले आहे. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी या राज्य क्रीडा दिनाचे औचीत्य साधून या राष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वा. उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेड डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग,लातूर जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा स्पर्धा निरीक्षक जयकुमार टेंभरे, राजेंद्र इखनकर सचिव, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन,रावसाहेब जाधव प्राचार्य, पिपल्स कॉलेज, नांदेड, लक्ष्मण शिंदे, (प्राचार्य, सांयन्स कॉलेज, नांदेड), इंद्रजीत नितरवार, संजय कुमार (सदस्य, एस.जी.एफ.आय.) आदी मान्यवर उपस्थीत होते.

सर्व राज्याच्या संघानी त्यांच्या राज्याच्या झेंडा फडकवत संचलन केले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते एस.जी.एफ.आय. व महाराष्ट्र राज्याच्या झेंडा फडकवून व दिपप्रज्वजलन करुन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. तसेच महात्मा फुले शाळेच्या लेझीम पथकानी त्यांच्या कलेतून विविध राज्यातून आलेल्या संघाची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या प्रस्तावीक जयकुमार टेंभरे यांनी केले. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी अबिनाश कुमार यांनी म्हणाले की, शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंचा शारीरिक, बौध्दीक व संघटनात्मक विकास होतो. खेळातून शारीरिक लवचिकता दिसून येते. शालेय जिवनातून विद्यार्थ्यानी एक तरी खेळ खेळावा व आपले करीअर घडवावे असे सांगीतले व या स्पर्धेकरीता देशातील विविध राज्यातुन आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 

डॉ.महेशकुमार डोईफोडे (आयुक्त) यांनी प्रथम नागरीक म्हणून नांदेड नगरी आलेल्या राष्ट्रीयस्तर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडू, व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक यांचे स्वागत करुन राज्य क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडूंना व राष्ट्रीय स्पर्धामध्ये उत्कृष्ट खेळ दाखविण्याच्या शुभेच्छा दिल्या.

जगन्नाथ लकडे (उपसंचालक, लातूर) यांनी सर्व खेळाडूंना खेळ भावनेने व उत्कृष्ट प्रदर्शन करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी, असे शुभेच्छा व आवाहन केले. राज्य क्रीडा दिनानिमीत्य सर्व खेळाडूंना दिवंगत ऑलिम्पिकवीर श्री.खाशाबा जाधव यांच्या स्मृतीला उजाळा दिला व खेळाडूंना श्री.खाशाबा जाधव सारखे पदक प्राप्त करुन राज्य व राष्ट्राचे नांव मोठे करण्याकरीता शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेकरीता तांत्रीक समिती सदस्य इंद्रजित नितनवार (अमरावती), शंकर शहाणे (परभणी), संतोष खेंडे (सोलापूर) आदींची तर महाराष्ट्र राज्याच्या संघाचे क्रीडा मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश काळे व आनंदा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज झालेल्या सकाळ सत्रातील सामन्यांचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.

19 वर्षे मुले- 1) छत्तीसगड – चंदीगड (3-2 गुण), 2) महाराष्ट्र-आंध्रप्रदेश (16- 2 गुण),  3) मध्यप्रदेश–गुजरात (1-11 गुण) तर 19 वर्षे मुली- 1) केरला- आसाम (11-1 गुण), 2) विद्याभारती- मध्यप्रदेश (10-10 गुण- टाय) 

सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा.जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी श्री. संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री.बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, (क्रीडा अधिकारी) श्री. राहुल श्रीरामवार, श्री. विपुल दापके, वरिष्ठ लिपीक श्री.संतोष कनकावार, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, कपील सोनकांबळे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, कृष्णा परिवाले, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बेसबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि सहकार्य करीत आहेत. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन  विष्णु शिंदे व सुभाष धोंगडे यांनी केले. 

सदर राष्ट्रीय स्पर्धा पिपल्स कॉलेज व सायंन्स कॉलेज, नांदेड येथील मैदानावर आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी, रसीक यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000





 


 उपसंचालक अनिल आलूरकर यांना मातृशोक  नांदेड दि. 15 जानेवारी : नांदेड येथील मूळ निवासी असणारे व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अमरावती येथ...